लवकर विवाह होण्यासाठी उपाय…खुशखबर नक्की मिळेल..!

नमस्कार मित्रांनो,

मुलामुलींचे विवाह त्वरित जुळण्यासाठी आणि योग्य स्थळाची प्राप्ती होण्यासाठी आपण खालील मत्रांचा जप करू शकता आणि काही तोडगे सुद्धा करू शकता. कोणत्याही रविवारी दुपारी बारा पूर्वी एका पाटावर लाल कपडा अंथरावा त्या लाल कपड्यावर मूठभर गहू वापरून सूर्याची गोल आकृती काठावी सूर्याला सात किरणे काढावीत आणि त्यानंतर एक लाल फुल वाहून पूजा करावी.

ही पूजा संपन्न झाल्यानंतर ज्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह होत नसेल, विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नसेल. त्या मुलाने अगर मुलीने खालील मंत्र एकवीस वेळा म्हणावा. “ओम नमो भगवते श्री सूर्याय सहस्त्रकिरणाय इष्टाथ सिद्धिका राय मनोवांछीत पुरय पूरय कक्ष्टंम चुराय चुराय श्री ओंम न्हीं श्री सूर्याय नमःओंम” या मंत्राचा आपण एकवीस वेळा जप करायचा आहे.

हा मंत्र एकवीस वेळा म्हंटल्यानंतर अजून एक मंत्र की जो मुलींनी म्हणायचा आहे मुलांसाठी हा मंत्र वेगळा असेल. पुढील मंत्र सात वेळा केवळ मुलींनी म्हणायचा आहे “पति मनोहरं देहि मनोवृत्तानुसारींणम तारण मे संसारसागरस्य सौभाग्यताम” आणि मुलांनी पुढील मंत्र सात वेळा म्हणावा “पत्नी मनोरमंम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणी दुर्गा संसारसागरसस्य किलोद्भवाम् “अशा प्रकारे पहिला मंत्र 21 वेळा.

आणि दुसरा मंत्र सात वेळा म्हटल्यानंतर ही सर्व पूजा लाल कपड्यात गुंडाळून देवाच्या तस्वीरी मागे देव्हाऱ्यात ठेवावी. जर तेव्हा च्या पाठीमागे ठेवण्यास जागा नसेल, तर आपल्या कपाटात कोणालाही दिसणार नाही ज्यांची दृष्टी त्यावर पडणार नाही, अशाप्रकारे लाल कपड्यात गुंडाळून ही पूजा ठेवावी. एका महिन्याच्या आत हमखास स्थळ नक्की मिळते.

आणि विवाह जुळून येतो. जे लोक आपल्या मुलीसाठी, आपल्या कन्येसाठी हा उपाय करत आहेत त्यांनी विवाह संपन्न झाल्यानंतर, म्हणजेच मुलगी सासरी गेल्यावर ती सर्व पूजा एखाद्या गरजूला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान द्यावी. आणि ती दान देताना त्यामध्ये अकरा रुपये ठेवायला विसरू नये. हा जो तोडगा आपण पहात आहोत.

हा उपाय आपण पहातोय! त्याचं वैशिष्ट्य असं की हा तोडगा केल्यानंतर कित्येक स्थळे येतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अशी अती उत्तम स्थळे चालून येतात. योग्य स्थळ जुळते. या ठिकाणी मुलींसाठी विशेष गोष्ट मुलींनी विवाह जुळल्यानंतर एक ते तीन कॅरेट माणिक रत्न अंगठीत बसवून करंगळीच्या बाजूच्या बोटात त्याला आपण रिंग फिंगर असे म्हणतो.

त्या करंगळीच्या बाजूच्या बोटात घालावी आणि दोन पोवळ्या रत्नांचे मणी मंगळसूत्रात गाठून घ्यावेत..!! याने काय होईल तर तुमच्या पतीच तुमच्या वरील प्रेम वाढेल, आणि नेहमी चांगले होत राहील, तुमची तब्येत,तुमची प्रकृती सुधारत जाईल. आणि संसारात दिवसेंदिवस बरकत म्हणजेच प्रगती घडून येईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *