लवंगेचे पाच महा उपाय; शिक्षण, धन, आरोग्य, कर्ज, पैसा न टिकणे यावर रामबाण उपाय.

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला लवंगेचे काही उपाय सांगणार आहे. असे पाच उपाय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मिटवतील. आयुष्यात काय प्रोब्लेम असतो. धन समस्या, आरोग्य समस्या, व्यापार वृध्दी, नोकरी किंवा आपली मुलं त्रास देतात. याशिवाय आपल्याला कोणताही प्रॉब्लेम आयुष्यात नसतो.

किंवा घर नाही आहे ही एक प्रत्येकाचीच थोडीशी तक्रार आहे. हे सगळे प्रॉब्लेम या उपायातून सोडवता येणार आहेत. मार्ग यातून निघणार आहेत. कोणते उपाय आहेत चला तर बघुया. लवंगेचा उपाय आपण पुजेमध्ये करतो. हे तुम्हाला माहिती आहेच. लक्ष्मीच्या चरणाशी लवंग वाहिली तर ती फार प्रसन्न होते.

पहिला उपाय : जर तुम्हाला इंटरव्ह्यू ला जायला भीती वाटत असेल प्रमोशन या गोष्टी घडत नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे. एक संपूर्ण लवंग घ्यायची आहे. समजा तुम्ही जर इंटरव्ह्यू ला जात आहात किंवा तुमचे प्रमोशन होणार आहे. ती लवंग तोंडात घ्यायची आहे.

इंटरव्ह्यू ला जाईपर्यंत तुमच्या तोंडात ती लवंग हवी आहे. खाऊ शकत असाल तर खाऊन टाका. पण जेव्हा केबिनचे दार उघडाल. तेव्हा ती काढून टाका. आणि मग इंटरव्ह्यू ला जा. एक वेगळीच एनर्जी येईल. तुम्ही १००% पास व्हाल. हा छोटा, साधा उपाय आहे.

प्रमोशन, नोकरीसाठी हा उपयोगी पडतो. असा हा उपाय आहे. हा आहे पहिला उपाय.

दुसरा उपाय तो अशा लोकांसाठी आहे ज्यांची कामे होत नाही आहेत. बऱ्याच जणांचे असे होते की अगदी शेवटपर्यंत काम येत म्हणतात ना तोंडा पर्यंत घास येतो. पण घशात जात नाही. अशी काही कामे असतात. ती कामे पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे.

देवापाशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. गाईच्या तुपाचा शक्यतो दिवा असावा. त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत. देवघरात हे काम करू शकत नसाल तर किचन मध्ये केलत तरी चालेल. असा हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे. पिरियड असेल तर घरातील कोणाकडूनही करून घ्यायचे आहे.

तुमची 100% कामे या उपायाने पूर्ण होतील. या लवंगा काय करायचे? या लवंगा तुम्ही झाडामध्ये किंवा वाहत्या पाण्यात टाकू शकता.

<
धनाची कमी, पैसा टिकत नाही, पैसा येतच नाही. यासाठी कोणता उपाय आहे ते बघुया. मंगळवारी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत. संध्याकाळी तुम्हाला देवापाशी तुमच्या इच्छा बोलून दाखवायची आहे. धन संबंधी ज्या समस्या आहेत त्या सुटण्यास मदत होईल.

चौथा आणि फार महत्वाचा उपाय बघुया. मूल अभ्यासच करत नाही आहेत. त्यांचं लक्षच लागत नाही आहे. अशा वेळेस काय करावे. मुलं चिडचीड यावर एक साधा सोपा उपाय तुम्हाला सांगत आहे. बुधवारी अकरा लवंग तुटक्या फुटक्या कुठल्याही उपायात घ्यायच्या नाहीत.

अकरा लवंग घ्यायच्या त्या लाल कपड्यात बांधायच्या आणि आपल्या देवघरात गणपती पाशी ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला ओम गण गणपतये नमः हा जप १०८ वेळा करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पोटली उचलायची आहे.

त्यातील एक लवंग तुम्हाला मुलाला किंवा मुलीला सकाळ संध्याकाळ खायला घालायची आहे. चहात किंवा जेवणात कुटून बारीक करून तुम्ही घालू शकता. हा उपाय अकरा दिवस अकरा लवंग संपेपर्यंत करायचा आहे. इतका मुलांमध्ये फरक पडेल मुले ऐकायला लागतील. मुलांमध्ये अभ्यासात फरक पडेल. लक्षात राहील. स्वतः हुन मुले अभ्यासाला बसतील.

पाचवा आणि शेवटचा उपाय. तिजोरीत किंवा आपल्या गल्ल्यात, आपल्या पर्स मध्ये कायम पैसा टिकावा असे सर्वांना वाटते. त्यासाठी एक उपाय आहे. पाच पिवळ्या कवड्या पाच लवंगा लाल कपड्यात बांधायच्या आहेत आणि शुक्रवारच्या पूजेमध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत.
आणि प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी माता घरी तुझ माझ्या घरी कायम वास्तव्य असू दे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला ही पोटली उचलून तुमच्या गल्ल्यात किंवा तिजोरीत ठेवायची आहे. या उपायाने तुमच्या तिजोरीत, गल्ल्यात, पर्स मध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही.

यातील तुम्हाला कोणताही एक उपाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज आहे तो उपाय तुम्ही करू शकता. याच्या आधी केलेले उपाय असतील तरीही हा उपाय केलात तरी चालेल. या लवंगाच काय करायचे तर मुलांच्या लवंगा खायला द्यायाच्या. बाकीच्या लवंगा झाडात किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायच्या. हे उपाय जसे सांगितले आहेत तसेच तंतोतंत करावेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *