नमस्कार मित्रांनो,
मैत्रिणींनो तुमचा नवरा ऐकत नाही, तो घरी राहत नाही. बाहेर त्याचं लफडं सुरू आहे. बाहेर त्याचं मन गुंतलेलं आहे. आपल्या मुला बाळांकडे तक्रार करतात. अनेक महिलांची ही तक्रार असते.
मित्रांनो अशा प्रकारे आपण ज्या व्यक्तीला जीव लावला, जिच्यावर आपण प्रेम केलं तीच व्यक्ती आपल्याला धोका देत असेल तर वाईट वाटतं.
काही ठिकाणी महिला सुद्धा आपला नवरा, मुलं बाळं यांना सोडून बाहेर गुंततात. मित्रांनो स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोघेही बाहेर गुंतू शकतात.
तुम्ही पती पत्नी असाल किंवा प्रियकर प्रेयसी असाल. पूर्वी तुम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असेल. पण आता अशी परिस्थिती अशी आहे की कोणी तरी तिसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे आणि आपला जोडीदार हा त्या तिसऱ्या व्यक्ती कडे आकर्षित झाला आहे.
तर अशा आपल्याला सोडून दुसरीकडे आकर्षित झालेल्या जोडीदाराला आपल्याकडे पुन्हा आकर्षित कसं करायचं. मित्रांनो आपण जो उपाय करणार आहोत तो मनात चांगली भावना ठेऊन करणार आहोत. मनात चांगली भावना असेल तर त्या तोटक्याला यश हे मिळतंच.
मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक लवंग लागणार आहे. अत्यंत साधा सोपा तोटका आहे. पण तुम्हाला हात जोडुन विनंती आहे की याचा गैरवापर करू नका.
एखाद्या सुखात असलेल्या पती पत्नीच्या संसारात वि ष कालवण्या साठी या उपायाचा वापर करू नका. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींना दूर करण्यासाठी याचा वापर करू नका.
हा उपाय जर उलटला तर त्याचे खूप गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे याचा गैरवापर चुकूनही करू नका. चांगल्या हेतू साठीच या उपायांचा वापर करावा.
मित्रांनो आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. ही लवंग आपल्या तोंडात ठेवायची आहे. जिभेखाली ठेऊ शकता. तोंडात कुठेही ठेवा.
आणि एक वेळ आपल्या जोडीदाराला आपल्या सोबत संबंध ठेवण्यासाठी तयार करा. तुमचा जोडीदार त्यासाठी कसं तयार होईल हे तुम्ही पहा. फक्त एक वेळेची गोष्ट आहे.
आपल्या जोडीदाराला तयार करून तिच्या सोबत पूर्ण रूपाने एकरूप व्हायचं आहे. शरीराने आणि मनाने सुद्धा. आणि त्या व्यक्तीला चुं बन करायचं आहे. चुं बन करताना आपल्या तोंडात असलेल्या लवंग चा गंध हा त्या समोरच्या व्यक्तीच्या तोंडात जाईल याची काळजी घ्या.
मित्रांनो लवंग ही ऊर्जेची वाहक आहे. आपण जेव्हा हा उपाय करू तेव्हा आपल्या मनात असलेलं त्या व्यक्ती बद्दलच प्रेम, जिव्हाळा हा त्या व्यक्ती पर्यंत पोहचेल.
समोरच्या व्यक्तीला, तुमच्या जोडीदाराला जाणीव होईल की तुमचं त्या व्यक्तीवर किती प्रेम आहे. आपण बाहेर गुंतत चालले आहोत ही चूक आहे हे त्या व्यक्तीला म्हणजेच तुमच्या जोडीदाराला समजेल. आणि ती तुमच्या मनासारखं वागायला लागेल.
मित्रांनो तुम्हाला या उपयाचा फायदा नक्की होईल. पण जर याचा फायदा झाला नाही तर आपले जे कुलदैवत आहेत त्यांची रोज पूजा करा, त्यांना आपली समस्या सांगा. तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.
मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.