नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो लसूण प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतो. त्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासोबतच हा लसूण तुमचे नशीब देखील उजळवू शकतो.
खरं तर, ज्योतिषशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात ठेवलेला प्रत्येक मसाला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो. तुम्ही हे मसाले कसे वापरता ते ग्रहाची दिशा ठरवते. लसणाचा संबंध राहू ग्रहाशी आहे. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत राहु मजबूत करायचा असेल तर लसूण तुम्हाला मदत करू शकतो.
तुम्हाला फक्त शनिवारी लसणाशी संबंधित काही खास उपाय करावे लागतील. असे केल्याने तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. तुमची आयुष्यात झपाट्याने प्रगती होईल. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. याशिवाय तुम्हाला इतर अनेक फायदे मिळतील.
शनिवारी पर्समध्ये लसणाची एक पाकळी ठेवावी. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्याच वेळी, तुमच्या पर्समध्ये पैशांची आवक अधिक असेल आणि जावक कमी होईल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील.
जर तुमच्या घरात जास्त भांडणे होत असतील तर लसणाचा हा उपाय शनिवारी करा. लसणाच्या 7 पाकळ्या घ्या आणि त्यांना लाल धाग्याच्या साहाय्याने छोट्या काठीला बांधा. आता हि काठी घराच्या गच्चीवर किंवा छतावर ठेवा. काही दिवसांत घरातील कलह संपुष्टात येतील.
जर तुम्हाला नोकरीत बढती हवी असेल किंवा ऑफिसमधील कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर हा उपाय करा. लसणाच्या 5 पाकळ्या घ्या आणि तुमच्या ऑफिसच्या डेस्कमध्ये लपवून ठेवा. कार्यक्षेत्राशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.
व्यवसायात नफा हवा असेल तर लसणाच्या 5 पाकळ्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. यातून व्यवसाय चांगला होईल. व्यवसायातही नुकसान होणार नाही. शनिवारी तीळासोबत लसूण दान करा. यामुळे राहूची वाईट नजर नाहीशी होईल. तर लसूण बारीक कुटून पाण्यात टाकल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
जर तुम्हाला कोणाची वाईट नजर लागली तर शनिवारी एक लसूण काळ्या कपड्यात गुंडाळा. आता हा कपड्यात गुंडाळलेला लसूण रात्री पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाका. घरी येताना मागे वळून पाहू नका. हा उपाय केल्याने कोणताही नजर दोष निघून जाईल.
जर तुमच्या घरात लोक जास्त आजारी पडत असतील तर लसूण मोहरीच्या तेलात भिजवून शनिवारी घराच्या दक्षिण दिशेला ठेवा. आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरापासून दूर राहील.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.