नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदूंच्या प्रत्येक घरात देवघर असते आपण दररोज मनोभावे पूजा ही करतो. परंतु देवघरात कोणकोणते देव असावेत, देवपूजा करताना काय करावे, काय करू नये याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नसते.
मग आपण देवपूजा तर करतो परंतु आपल्याला आपल्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही. म्हणून देवपूजा करताना काय करावे व काय टाळावे याविषयी संपूर्ण माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
देवघरात कधीही दोन शिवलींग असू नयेत. तसेच गणपती बाप्पांच्या तीन मुर्त्या असू नयेत. देवपूजेसाठी अखंड तांदूळ घ्यावेत. तांदळाचे तुकडे असू नयेत. तुपाचा दिवा देवघराच्या डाव्या बाजूला ठेवावा. तसेच दिवा ठेवताना कधीही खाली ठेवू नये. त्याच्या खाली थोडेसे तांदूळ जरूर ठेवावेत.
होम करताना त्यात अग्नी प्रज्वलित असेल त्यावेळी त्यात आहुती द्यावी. एका हाताने देवांना नमस्कार करू नये. दिव्याने दिवा कधीही लावू नये. महादेवांना बेलाचे पान, विष्णूंना तुळशीचे पान, गणपतीला दुर्वा आणि श्री लक्ष्मी देवीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे म्हणून शक्यतो या वस्तू अर्पण कराव्यात.
अक्षता देवाला तीन वेळा आणि इतरांना एकदा अर्पण कराव्यात. जर नवीन बेलाचे पान मिळाले नाही तर एकदा वाहिलेली बेलाची पाने धुवून आपण पुन्हा महादेवांना अर्पण करू शकतो. फुले, पाने व फळे झाडावर जशी उगवतात तशीच भगवंतांना अर्पण करावे.
बेलाचे पान उलटे वाहावे. खराब झालेले फळे व किडलेली, सुकलेली फुले देवाला अर्पण करू नयेत. कमळाचे फूल पाच रात्रीपर्यंत शिळे होत नाही. तुळशीचे पान दहा दिवस शिळे होत नाही. पूजन करण्यापूर्वी कपाळाला गंध लावून नंतरच पूजेला सुरुवात करावी.
देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी. कारण आपण केलेली पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्यामार्फतच होते. बाळकृष्णाची मूर्ती घरात असणे शुभ असते किंवा राधाकृष्ण एकत्र, श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची उभी मूर्ती आपण घरात ठेवू शकतो.
ज्यांच्या घरात एकाक्ष नारळ ठेवून त्यांची पूजा केली जाते त्या घरात देवी लक्ष्मी सदैव निवास करते व तेथे अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. कुटुंबामध्ये एकोपा व आपलेपणा टिकून राहावा म्हणून श्रीरामाचा राम दरबाराचा फोटो घरात लावा.
सुर्यदेवांची तांब्याची प्रतिकृती घरात लावावी. गणपतीची मूर्ती आणताना त्यांची सोंड उजवीकडे असावी व सोंडेत लाडू असावा. गणपतीची मूर्ती किंवा फोटो आणताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की त्यांच्या सोंडेत लाडू व पायाजवळ उंदीर जरूर असावा.
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उभे असलेले गणपतीची मूर्ती लावावी. त्यात त्यांचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत. ही मूर्ती दुकानाच्या उत्तर-पूर्व कोनात म्हणजे ईशान्य दिशेला लावणे खूप शुभ असते. ज्या घरात शंखाची पूजा होते त्या घरात स्वतः लक्ष्मी निवास करते.
ज्या कुटुंबात विधीवत शंखाची स्थापना केली जाते तेथे भूत, प्रेत, पिशाच्च यांची बाधा होत नाही. त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासाचे आपोआप समाधान होते. देवी लक्ष्मी बरोबरच कुबेर महाराजांची पूजन केल्यास पैश्यासंबंधित सर्व प्रकारच्या अडचणीपासून आपली सुटका होते.
म्हणून इतर देवी-देवतांना बरोबर कुबेर महाराजांची अवश्य करा. जर आपल्या कर्तव्याची व्यवस्थित पालन करून आपण कुबेर महाराजांचे पूजन केले व कुबेर यंत्राची देवघरात स्थापना केली तर ते निश्चितच प्रसन्न होतात व व्यापारात आणि धनात वृद्धी होऊन सुख व समाधान प्राप्त होते.
त्या शिवाय आपले कुलदैवत जे असतील या देवी देवतांच्या मूर्ती सुद्धा देवघरात जरूर असाव्यात. त्याशिवाय देवघर पूर्णही होत नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता