नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी सोपे तोडगे एकदा तुम्ही हे सोपे उपाय सोपे तोडगे नक्की करा. मित्रांनो जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी माता त्याला सोडून निघून जाते.
जी व्यक्ती दररोज सुर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादी तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.
घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही.
कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा योग सतत वाहत राहील. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी आणि तिला पाय लावू नये. ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर घरात झाडू मारू नये.
घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धूप दाखवावी. रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला तिसरी छतावर पक्षांसाठी ठेवावी. त्यामुळे पितृ दोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावरवर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्र संमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तू भंगाचा दोष आपल्याला लागतो. काटेरी रोपटे अथवा कॅक्ट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येते.
बारीक सारीक कारणांवरून कुटुंबियांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारची काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे. रोख रक्कम हातात पडली की, ती घरी आणून देवापुढे ठेवावी.
कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नका. मग दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.