कुंकवात नेहमी ठेवा ही १ वस्तू.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू धर्मात कुंकू भांगात भरण्याचे फार महत्व आहे. लग्न झाल्यानंतर सर्व सवाष्ण स्त्रिया भांगात कुंकू भरून आपला शृंगार पूर्ण करतात. भांगात कुंकू भरणे हे सवाष्ण असण्याचे चिन्ह आहे. हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. विवाहाच्या वेळी वर आपल्या वधूच्या भांगात कुंकू भरतो.

असा एक विधी दिलेला आहे. त्यानंतर विवाह विधी संपन्न झाला असे मानले जाते. म्हणून विवाहानंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या भांगात कुंकू जरूर भरावा. परंतु आजकाल आधुनिकता, फॅशन यांच्या नावाखाली हे सर्व जुने रीती परंपरा मानले जातात.

आजकालच्या मुलींना कपाळावर टिकली आवडत नाही तर त्या कुंकू काय लावणार. परंतु भांगात कुंकू भरणे यात फक्त जुन्या रीती भाती, धार्मिक आस्था नसून त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रियानी भांगात कुंकू भरण्याचे काही नियम सांगितलेले आहेत.

आपण जर या नियमांचे पालन केले नाही तर पतीला धन संबंधी व आरोग्य संबंधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या नियमांबद्दल: कुंकू नेहमी स्वतः च्या पैशांनी विकत घेऊन तेच आपल्या भांगात भरावे. इतरांनी विकत घेतलेले कुंकू कधीही आपल्या कपाळावर लावू नये.

कितीही अडचण असेल तरीही सवाष्ण स्त्रियांनी दुसऱ्या स्त्रीचे कुंकू घेऊन ते आपल्या भांगात भरू नये. असे करणाऱ्या स्त्रियांचे पती नेहमी आर्थिक अडचणींनी घेरलेले असतात. दुसऱ्या स्त्रीचे कुंकू आपल्या भांगात भरणे हे फारच अशुभ मानले जाते.

तसेच कुणी जर भेट म्हणून कुंकुची डबी दिली असेल तर ते कुंकू कधीही भांगात भरू नये हेही खूप अशुभ मानले जाते. स्नान केल्याशिवाय भांगात कधीही कुंकू भरू नये. स्नान करून भगवंतांचे पूजन करावे व त्या नंतरच आपल्या भांगात कुंकू भरावा.

भांगात कुंकू भरताना नेहमी आपल्या पतीचे दीर्घायुष्य व त्याचे सुखी संपन्न जीवन मागावे. यामुळे पतीचे जीवन बहरून निघेल. व तसेच कुंकू लावताना जगत जननी देवी पार्वती मातेचे ध्यान जरूर करावे. कारण जगत जननी देवी पार्वती ही नेहमी सौभाग्य प्रदान करते.

जर घरात सुतक असेल त्यादरम्यान स्त्रियांनी कुंकू लावू नये. तसेच पिरियड दरम्यान ही कुंकू लावू नये. कारण यामुळे कुंकवाचा अनादर होतो. कुंकू खाली सांडने फार अशुभ मानले जाते. म्हणून कुंकू कधीही लहान मुलांच्या हाताला लागणार नाही अशाप्रकारे ठेवावे.

<
कुंकू खाली पडणे म्हणजे अपशकून घडणे होय. स्त्रियांनी कुंकू लावताना त्यांना कोणी पाहणार नाही असे लावावे. कोणासमोर आपण आपल्या भांगात कुंकू भरला तर आपल्या पती पत्नी च्या नात्याला त्यांची दृष्ट लागू शकते. आणि त्यामुळे पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण होतो.

म्हणून जर कोणी समोर असेल तर डोक्यावर पदर घेऊन मग कुंकू लावावे. भांगात कुंकु भरताना शक्यतो कोरड्या कुंकवाचा वापर करावा. कधी कधी भांग भरताना आपल्या नाकावर कुंकू सांडते. याचा अर्थ आपल्या पतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे व ते प्रेम उत्तरोत्तर वाढत जात आहे असा होतो.

जर चुकून आपल्या हातून कुंकू खाली पडले तर सर्वात आधी देवी पार्वती ची क्षमा याचना करावी. त्यानंतर त्यातील थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर व त्यानंतर ते सर्व कुंकू जमा करून एखाद्या झाडाखाली ठेवावे. कोठेही केर कचऱ्यात टाकू नये.

काही स्त्रिया भांगामध्ये कुंकू भरतात पण ते कोणाला दिसू नये म्हणून केसांमध्ये लपून देतात. यामुळे त्या स्त्रीचा पतीही समाजात कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे वावरतो. त्याचा समाजात मान सन्मान कमी होतो. त्यांना जे यश व प्रगती मिळवायची असते ते त्यांना मिळत नाही.

समाजात व नातेवाईकांमध्ये ते लपलेले व मागे राहतात. स्त्रियांनी कुंकू लावताना जितके इतरांना दिसेल अशा प्रकारे व मोठे लावावे. तितकी त्यांच्या पतीची प्रगती वेगाने होते. कारण कपाळावर कुंकु लावल्याने स्त्रियांची शक्ती जागृत राहते. शास्त्रात दिलेले आहे की भांग भरताना तो नाकाच्या शेंड्याच्या सरळ रेषेत असावा.

काही स्त्रियांना तिरपा भांग भरण्याची सवय असते. पण यामुळे पती पत्नी चे जीवनही कटू व ताण तणावाचे बनते. आपल्या कुंकवाच्या डबीत एक रुपयाचे एक नाणे जरूर ठेवावे. यामुळे देवी पार्वती चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या भांगात कुंकू स्वतः भरावे किंवा आपल्या पतीला भरायला सांगावे.

कधीही इतर तिसऱ्या व्यक्तीकडून आपल्या भांगात कुंकू भरू नये. पतीने पत्नीच्या भांगात कुंकू भरल्यास पती पत्नीच्या प्रेमात वाढ होते. स्वप्नात कुंकू दिसणे खूपच शुभ मानले जाते. स्वप्नात भांगात कुंकू दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या माहेराहून आनंदाची खूप मोठी बातमी समजणार आहे.

तसेच तुमच्यावर जे काही अनिष्ट संकट येणार होते ते येण्यापूर्वीच टळून गेले आहे. कुमारिकेला जर स्वप्नात तिच्या भांगात कुंकू भरले आहे असे दिसले तर समजून जावे की तिचा विवाह तिच्या पसंतीच्या मुलाशी होणार आहे. पती पत्नी चे पटत नसेल नेहमी भांडण तंटे व वादविवाद होत असतील.

तर राईच्या तेलात थोडेसे कुंकू मिक्स करून त्या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दाराला ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह काढावे. यामुळे पती पत्नीच्या प्रेमात वाढ होते आणि त्यांचे दाम्पत्य जीवन मधुर बनते. भांगात कुंकू भरताना ते नेहमी अनामिका बोटानेच भरावे.

आता आपल्या लक्षात आलेच असेलकी कपाळावर कुंकु का व कसे भरावे? आणि कुंकू भरण्याचे काय काय फायदे आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *