कपाळावर असे कुंकू कधीच लावू नये, नाहीतर नवऱ्यासोबत वाईट घडू शकते…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मात कुंकूला खूप महत्त्व आहे. कारण प्रत्येक शुभकार्यात कुंकूचा वापर केला जातो. विवाहित महिलेच्या आयुष्यातील कुंकूचे महत्त्व अनन्य साधारण आहे.

स्त्रीने कपाळावर लावलेले कूंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळख, सौभाग्याचं देणं मानले जाते. सौभाग्याचे आयुष्य भरपूर राहावे, यासाठी महिला कपाळावर कुंकू लावतात. विवाहित स्त्रीच्या माथ्यावर लावलेले चिमूटभर कुंकू तिच्या जीवनातील सुख समृद्धीची ओळख करून देते.

मित्रांनो एका विवाहित स्त्रीसाठी सर्व सोळा शृंगारमध्ये कुंकू अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक महिला कपाळभर कुंकू लावतात. मात्र आता या कुंकवाची जागा टिकलीने घेतली असली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. याशिवाय हिंदु धर्मात प्रत्येक सण, उत्सव घरगुती कार्यक्रमात अजूनही कुंकूचाच वापर आजही केला जातो.

पण हे कुंकू वापरत असताना किंवा वैवाहिक महिलांच्या माथ्यावर लावताना कोणती काळजी घ्यावी हे हिन्दू शास्त्रत सांगितले आहे. हिंदु धर्मात वैवाहिक स्त्रीने भांगात कुंकू भरणे, अत्यंत शुभ असते. पण त्या महिलेने कधीच सर्वांसमोर भांग भरू नये. नेहमी आपल्या खोलीत एकटे असताना कुंकू भांगात भरावे, याशिवाय आपली कुंकवाची डबी इतरांबरोबर शेअर करू नये.

मित्रांनो वैवाहिक स्त्रीया त्यांच्या भांग किंवा माथ्यावर कुंकू लावताना कोरडे कुंकू किंवा सिंधूर पेन्सिलचा अशा वस्तूंचा वापर करत असतात. कोरडे कुंकु भांगात भरणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जर कुंकु लावताना थोडेसे आपली नाकावर किंवा चेहऱ्यावर पडले तर ते खूपच शुभ मानले जाते. कारण नाकावर कुंकू पडणे याचा अर्थ पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे.

कुंकु नेहमी लहान मुलांच्यापासून लांब ठेवावे. परंतु जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून चुकून कुंकु जमिनीवर पडले तर आधी त्याला नमस्कार करून, थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर लावावे. राहिलेले जास्त खराब झालेले कुंकु कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी टाकावे.

मित्रांनो वैवाहिक महिलेने आंघोळीपूर्वी कधीच भांग भरू नये. याशिवाय अनेक स्त्रियांना एका बाजूला तिरपे कुंकू लावण्याची सवय असते, त्यामुळे तिचा पतीही तिच्यापासून बाजूला होत असतो, असे सांगितले जाते.

मित्रांनो याच बरोबर जी स्त्री भांग भरून, केसांच्यामध्ये झाकून ठेवते, तिचा पती समाजापासून अलिप्त होतो आणि एकटा पडत असतो. म्हणून सिंदूर नाकाच्या सरळ रेषेत वर लावा व ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने लावले पाहिजे. कोरडं कुंकू हे नेहमी आपल्या हाताच्या मधल्या बोटाने लावावे.

हिंदू समाजामध्ये भांग भरण्याचा अधिकार फक्त स्त्रीला लग्नानंतरच प्राप्त होत असतो. त्यामध्ये लग्नाच्या वेळी पहिल्यांदा पतीने आपल्या पत्नीच्या भांगेत कुंकु भरत असतो. म्हणून स्त्रीच्या जीवनात कुंकूचे खूप महत्त्व आहे. भांग भरलेली स्त्री असल्यास विवाहित असण्याचे हे प्रमाण आहे.

मित्रांनो कुंकू देवी देवतांना अर्पण केल जाते व त्या स्त्रीलाही वापरण्यासाठी दिले जाते, म्हणजे तिला देवी इतकाच मान दिला जातो. तसेच वैवाहिक स्त्रीयांच्या  सौंदर्यातही भर टाकण्याचे काम सिंधूर करत असते.

कुंकू नेहमी चांगल्या दर्जाचे लावावे नाही तर त्यापासून आपल्या त्वचेला हानी होऊ शकते. हे सिंधूर किमान एका आठवड्यातून दोन दिवस तरी आवश्य लावावे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवायच्या असतील तर आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *