नमस्कार मित्रांनो,
शोध कुलदेवतेचा, घरामध्ये सुख नसणे घरातील वातावरण मरगळलेले असणे, घरात पैसा टिकत नाही पैसा पळ वाटेने निघून जाणे, घराचा कर्ता धरता आजारी असणे, घरातील व्यक्ती आजारी असल्यास डॉक्टर कडे गेले असता आजाराचे निदान करणे व सगळे रिपोर्ट नॉर्मल येणे, व उपचारासाठीचा पैसा फुकट जाणे, बापाचे व मुलाचे न पटणे सतत हातापाई होत राहणे, मुलगा सुशिक्षित असला तरी बेरोजगार असणे, घरातील मुलगी सतत कोणत्यातरी आजाराचा दबावात असणे, घरात भांडणे होत राहणे, मुलीचे लग्न न जमणे, जमल्यास मूलबाळ न होणे किंवा बाळाचा एक-दोन महिन्यातच मृत्यू होणे, ही सर्व लक्षणे घरात कुलदेवतेचा दैविक सुरक्षा चक्र नसल्यास घडतात या समस्यांमुळे अनेक लोक भरडली गेली आहेत.
म्हणून हे सर्व कुठेतरी थांबावे म्हणून लोकं भटा कडे जाऊन कुलदेवतेचा शोध घेताना ते दिसतात कुळाचा व कुलदेवतेचा उद्धार करणारी आहेत कुळ वंशाचे वृद्धी करणारे व सगळ्याचे रक्षण करण्याचे दायित्व हे कुलदेवते कडे असते.
कुलदेवता हे वडील आसमान व कुलदेवी ही आई समान असते ज्यांना फक्त कुलदेवी माहीत आहे.कुलदेवी ला कुलदैवत मानावे व तिची पूजा अर्चना करावी पण ज्यांना कुलदैवत माहित नाही त्यांनी काय करावे हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे तर चला कुलदेवतेचा शोध घेऊया.
आपले वडील किंवा वडिलांचे सखे चुलते व त्यांची मुले, किंवा आजोबांच्या भावाची मुले, जर ती हयात असतील तर त्यांची मुले,ह्यालाच भावकी असे म्हणतात.या भाव किथल्या कडूनच आपल्याला आपल्या कुलदेवतेची माहिती मिळते. जर तुम्हाला तुमचे मूळ गाव मूळ आडनाव माहित असेल,अथवा तुमचे आजोबा व पंजोबा या गावात पूर्वीपासून वास्तव्यात होते, जर तुम्ही तिथे जाऊन चौकशी केली तर तुम्हाला तुमच्या कुलदैवतेचा शोध लागेल.
आडनाव हे आपले कुळ असते. म्हणून आपल्या आडनावाचे व जातीचे समान आडनावाचे अनेक कुळ वेगवेगळ्या जातीत सुद्धा असतात.फक्त स्व जातीचे कुळ लोकांना विचारून कुलदेवतेचा शोध घेता येतो.
ज्या समाजाने आपल्या कुलदेवतेची माहिती जपून ठेवलेली आहे उदाहरणार्थ राजपूत, राठोड, चव्हाण, मराठा समाज अशा समाजातील कुळांची कुलदेवता शोधणे सोपे जाते. परंतु ज्या कुळाची माहिती आपल्याला माहिती नसल्यास त्यांनी कुलदेवतेचे पुस्तक स्वामी समर्थ केंद्रात किंवा पुस्तक विक्रेत्यांकडे मिळते.
त्यात जमल्यास आपले आडनाव ओळखून आपण आपले कुलदैवत समजून घेणे.ज्या गावातील लोक मोठ्या संख्येने राहतात अशा गावचा संपर्क घेणे व तेथे जाऊन आपण चौकशी करणे जेथे कुळ कुळातील व्यक्ती मोठ्या संख्येने राहतात तेथे कुळाचा व कुळदेवतेचा मंदिर सुद्धा असणे.
दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करावे. पारायण करण्याआधी संकल्प करावा. संकल्प करताना हात जोडून सांगावे की,हे जगतजननी मी कुलदेवीचा शोध घेत आहे मला मार्गदर्शन कर.मग दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. पारायणाच्या शेवटच्या दिवशी नऊ कुवारी कन्या ना भोजन देऊन त्यांची ओटी भरावी व जवळच्या एका सुवासिनीची ओटी भरावी.
<
असे केल्यास त्या सुवासिनीच्या तोंडून कुलदेवतेचे नाव येईल,अथवा मार्गदर्शन मिळे ल अशाने कुलदेवी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होतो.
दर मंगळवारी सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावे किंवा त्यामध्ये सिद्ध कुंजिका मंत्र म्हणावे.दर मंगळवारी म्हटल्याने रात्री झोपेत कुलदेवतेची व कुलदेवीची अनुभूती येईल किंवा कुलदेवता पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो. घरात सुवासिनीने स्त्रीने कुल देवीच्या नावाने घट ठेवावा.
दर गुरुवारी वेणी घालून घटाची पूजा करावी, असे केल्यास त्या स्त्रीला दुसऱ्या सुवासिनी स्त्रीकडून कुलदैवते ची माहिती मिळते, अथवा तिला रात्री झोपेतून हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू, मोठे मंगळसूत्र घातलेली ओळखीची सुवासिनी स्त्रि येऊन तिला कुलदेवते बद्दल मार्गदर्शन करते, हे भरपूर लोकांना आलेले अनुभव आहेत.
वरील प्रमाणे कोणतेच उपाय काम करत नसतील तर वर्षातून एकदा मंगळवारी एका ताटात ओटी, नारळ, खन व हळद कुंकू व अक्षदा घेऊन देवार्यातील देवासमोर ठेवावे व म्हणावे माझे आई कुलदेवी तुझे जेथे कुठे असशील तर तुझ्या ह्या लेकीने ही जी ओटी ठेवली आहे ती मान्य करून घे व आम्हा पोराबाळांना सुखी ठेव.तुझ्या पर्यंत पोहोचण्याचा तूच मार्ग दाखव.
नंतर तुमच्या घरातील आई किंवा सासू किंवा अशी स्त्री जी तुमची सखी आहे झी तुम्हाला मदत करते किंवा मार्गदर्शन करते अशा स्त्रीची ओटी भरावी. ज्यांना कुलदैवत, ग्रामदैवत मूळ दैवत माहिती असेल. ज्यांना मूळ पुरुष माहित असल्यास त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवावे. त्यामध्ये कुळदेवी चे नाव स्थळ, मूळ पीठ लिहून ठेवावे पुढच्या पिढीपर्यंत ही माहिती पोहोचवावी.
मुलांच्या लग्नानंतर ती डायरी सुनेला तिच्या संसाराच्या सुखासाठी सोपवावी जेणेकरून कुलदेवतेचा शोधा खा तर कोणासमोर हात पाय पसरवायची गरज भासणार नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.