नमस्कार मित्रांनो,
आता लवकरच श्रीकृष्णजन्माष्टमी येणार आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आपण श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर मुसळधार पावसात मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला होता.
श्रीकृष्णांचे पूजन केल्यास आपली सर्व संकटे व बाधा दूर होतात आणि जर श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा झाली तर मुलाबाळांविषयी काही अडचणी असतील तर ते दूर होतात.
या दिवशी दिवसभर उपवास करावा व श्रीकृष्णांचे ध्यान करावे. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मानंतर उपवास सोडावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी निराहार राहून हे व्रत करावे. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार करावा.
नैवेद्यासाठी पंजिरी जरूर बनवावी. दह्यात खडीसाखर टाकून तो नैवेद्य श्रीकृष्णांना अर्पण करावा. काही मिठाई व फळांचा ही नैवेद्य श्रीकृष्णांना दाखवावा.
या दिवशी श्रीकृष्णांना बाळ रुपात सजवावे. पाळणा फुलांनी सजवून त्यात त्यांची स्थापना करावी. पंचामृत बनवून त्यात तुळशीचे पान टाकावे.
महाभारताच्या काळात युधिष्ठिराने एकदा श्रीकृष्णाला विचारले की घरात सुख-समृद्धी येण्यासाठी काय करावे? तेव्हा श्रीकृष्णांनी या काही वस्तू सांगितल्या होत्या ज्या नेहमी घरात ठेवल्यास आपल्या घरात नेहमी बरकत राहते. घरात सुख-समृद्धी राहते.
जर तुम्हालाही तुमच्या घरात नेहमी सुख-समृद्धी रहावी असे वाटत असेल तर या वस्तू घरात नेहमी ठेवा आणि घरात बरकत आणा.
श्रीकृष्णांना गोपाल म्हटले जाते. कारण ते गाईंचे पालन करतात. म्हणून आपणही घरात गाय ठेवली पाहिजे. पण सर्वांनाच घरात गाय पाळणे शक्य नसल्याने गाय-वासराची छोटीशी चांदीची मूर्ती बनवून ती श्रीकृष्णा बरोबर देवघरात ठेवावे किंवा ड्रॉईंग रूम मध्ये ईशान्य कोपर्यात ठेवावी. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते.
दुसरी वस्तू म्हणजे मोराची पिसे. ज्या घरात मोर पंख असतात तेथे कोणत्याही प्रकारचे ग्रह दोष राहत नाही. त्याबरोबरच दुरात्मे देखील मोरपंख असलेल्या घरापासून लांब पळतात. आपल्या घरात मोरपंख असल्यास काळी जादू, करणी असे प्रकारही घडत नाहीत.
श्रीकृष्णांनी ही राहू दोषा पासून सुटका मिळवण्यासाठी मोर पंख आपल्या मुकुटात धारण केले होते. वास्तुशास्त्रानुसार ही मोरपंख घरात असेल तर कितीतरी प्रकारचे वास्तू दोष निघून जातात व घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. म्हणून घरात मोरपंख जरूर ठेवावे.
तिसरी गोष्ट म्हणजे पाणी. आपल्याला सुख समृद्धी हवी असेल तर वॉशरूम मध्ये एक निळ्या रंगाची बादली नेहमी भरून ठेवावी. याबरोबरच जर कधी यमुना नदीच्या दर्शनाचा योग आला तर यमुना नदीचे पाणी आणून देवघरात जरूर ठेवावे.
आता छोट्या छोट्या तांब्या मध्ये पॅकिंग केलेले पाणीही मिळते. तेही आणून घरी देवघरात ठेवले तरी चालेल. यामुळे श्री कृष्ण खूप प्रसन्न होतात व घरातील सर्व अमंगल, अपवित्र गोष्टी दूर होतात.
चौथी वस्तू म्हणजे मध. ज्या घरात नकारात्मकता जास्त वाढली असेल तेथे मधाचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्यामुळे सकारात्मकता वाढते. नेहमी घरात मध ठेवल्यास घरात बरकत येते व अनावश्यक खर्चापासून आपला बचाव होतो.
पुढील वस्तू आहे बासरी. बासरी शिवाय आपण श्रीकृष्णांचा विचारही करू शकत नाही. जेथे बासरी तेथे श्रीकृष्ण आणि जेथे श्री कृष्ण तेथे प्रेम आणि धनाची कधीही कमतरता जाणवत नाही.
वास्तुशास्त्रानुसार बासरी जर घरात असेल तर पॉझिटिव ऊर्जा खूप प्रभावीपणे आपले कार्य करते. बासरी घरात ठेवताना ती कधीही सरळ ठेवू नये. बासरी तिरपी करून ठेवावी व तिचे मुख नेहमी खालच्या बाजूला असावे.
श्रीकृष्णांना लोणी खूप प्रिय आहे. म्हणून थोडेसे का होईना लोण्याचा खडीसाखर घालून तयार केलेला प्रसाद श्रीकृष्णांना अर्पण करावा. तसेच त्यांच्यासमोर गाईचा शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा आणि पिवळ्या फुलांनी त्यांचे पूजन करावे.
तर अशाप्रकारे या काही वस्तू आहेत ज्या तुम्ही घरात ठेवल्यास श्रीकृष्णांची कृपा आपल्यावर सदैव राहील आणि आपण व आपला परिवार सुखी होईल.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.