नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहे. आज कोजागिरी पौर्णिमेची रात्र असून हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
मान्यता आहे कि या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी युक्त असतो. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो आकाराने नेहमीपेक्षा मोठा दिसतो. मान्यता आहे कि या दिवशी आकाशात अमृतवर्षा होते.
या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेबरोबरच चंद्राची पूजा देखील केली जाते. मान्यता आहे कि हा सोहळा पाहण्यासाठी साक्षात माता लक्ष्मी धर्तीवर प्रकट होते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपून वैभवाची सुरवात होते.
सुख समृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन बहरून येते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शुभ्र प्रकाशाने धरती न्हाऊन निघते.
आजपासून या 5 राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने अचानक चमकून उठेल आपले नशीब. आता जीवनातलं दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार असून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.
जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. प्रगतीची एक नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष रास
मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. जीवनात चालू असणारा दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. पैशांची तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. जे काम हाती घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात.
वृषभ रास
वृषभ राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.
आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. उद्योग ,व्यापार आणि व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत.
कन्या रास
कन्या राशीच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. नवीन कामाची सुरवात यशदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा घडून येणार आहे. एखादी नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. नव्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
तूळ रास
तूळ राशीवर कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन समीकरण जुळून येतील. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते.
व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयन्त सफल ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातून कमाई मध्ये वाढ दिसून येईल. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. ऐश्वर्य सुखाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.
कुंभ रास
कुंभ राशीवर कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनात चालू असणारी संघर्षाची स्थिती आता बदलणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. आता यशाचे मार्ग मोकळे होतील.
हाती घेतलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. या काळात अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.