9 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा… गुपचुप इथे ठेवा 1 सुपारी… लक्ष्मी धावत येईल घरी…

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो 19 ऑक्टोबर 2021 मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी याचा अर्थ कोण जागत आहे. कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण कोण जागत आहे ते पाहतात.

या कोजागिरीच्या रात्री आपण जागरण करावं , आपल्या कुल देवीच्या नावाचा तिच्या मंत्रांचा जप करावा , किंवा तुमची ज्या देवतेवर श्रद्धा आहे विश्वास आहे त्या देवतेच्या मंत्रांचा त्या देवतेच्या नावाचा जप केला तरीही चालेल.

मित्रानो कोजागिरी आहे माता लक्ष्मी येऊन पाहणार आहे की कोण कोण जागत आहे. अशा वेळी अनेक जण मसाला दूध करतात खीर करतात आणि ती चंद्रप्रकाशात ठेवली जाते. अशा खिरीचं , अशा दुधाचं सेवन केल्याने आरोग्य चांगलं होत आरोग्याची प्राप्ती होते आणि सोबतच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो.

या कोजागिरी पौर्णिमेस अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात आणि यातीलच एक उपाय हा सुपारी शी संबंधित आहे. माता लक्ष्मीस अधिक प्रिय असणार्‍या अनेक वस्तूंपैकी एक वस्तू आहे ती म्हणेज सुपारी.

या सुपारीने केलेले उपाय किंवा या सुपारीचे टोटके अत्यंत शीघ्र फलदायी असतात. म्हणजेच त्यांचे फळ हे आपणास तात्काळ मिळतं. मित्रांनो आपण हा सुपारीचा जो उपाय करायचा आहे तो आपण कोजागिरीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री अगदी कोणत्याही वेळी करू शकता.

हा उपाय करण्यापूर्वी आपण स्वच्छ स्नान करावं किंवा स्वच्छ हात पाय , तोंड धुवावे स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि त्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. विधिवत पूजा म्हणजे काय तर माता लक्ष्मीस ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत.

जर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे फोटो आहे तस्वीर आहे तर त्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा प्रज्वलित करू शकता. एक दोन अगरबत्ती , सुगंधित धूप बत्ती लावायची आहे. आणि त्यानंतर मात्र लक्ष्मीस लाल रंगाची फुले खूप प्रिय असतात.

त्यांना ती लाल रंगाची फुले अर्पण करा , हळदीकुंकू वहा . थोडेसे अक्षद सुद्धा आपण वाहू शकता. मित्रांनो दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे अक्षद म्हणजेच तांदूळ ठेवण्यास विसरू नका किंवा झाडांची पानं फुलं किंवा काहीच नसेल तर एखादी प्लेट त्या दिव्याखाली नक्की ठेवा. याला आसन असं म्हणतात. आसना शिवाय दिवा हा अपूर्ण असतो.

थोडक्यात सांगायचा उद्देश असा की आपण माता लक्ष्मीच पूजन करायच आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने. जर आपली इच्छा असेल तर आपण माता लक्ष्मी सोबत भगवान श्रीहरी श्रीविष्णूची ही पूजा करू शकता. आपल्या घरात केवळ पैसाच नव्हे धन वैभवच नव्हे तर सुख समाधान शांतता सुद्धा नांदू लागेल. आलेल्या पैशांचा तुम्ही योग्य प्रकारे उपभोग घेऊ शकाल.

मित्रांनो आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असतानाच एक अखंड सुपारी न फुटलेली खराब न झालेली अशी पूजेत वापरली जाणारी एक सुपारी आपण माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे. मित्रांनो पूजा संपन्न झाल्यानंतर जेव्हा पण माता लक्ष्मीची पूजा संपन्न करणार आहोत तेव्हा आपण ओम श्रीम श्रीय नमः या माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

मित्रानो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 108 पेक्षाही जास्त म्हणजे एक माळा दोन माळा तीन माळा अशा प्रकारे हा नामजप करू शकता आणि हा मंत्र जप केल्यानंतर या सुपारीला आपण एक लाल धागा गुंडाळा , किंवा आपण आपल्या हातामध्ये जो कलावा बांधतो जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो तो सुद्धा आपण या सुपारी भोवती गुंडाळू शकता.

जर तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर आपल्या पांढ-या रंगाच्या धाग्यास आपण कुंकू मध्ये बुडवून त्याला लाल रंग प्रदान करू शकता , तोही धागा चालतो. अशा प्रकारे या सुपारीस लाल धागा गुंडाळल्यानंतर आपण सुपारी वर थोडेसे अक्षद वहायचे आहेत. अक्षद म्हणजेच न तुटलेले फुटलेले तांदूळ. सोबतच कुंकू लावायच आहे , फुले वहायची आहेत. थोडक्यात आपण या सुपारीचे सुद्धा पूजन करत आहोत.

मित्रांनो आता हे पूजन झाल्यानंतर संपूर्ण रात्रभर ही सुपारी ती त्याच ठिकाणी महालक्ष्मीच्या चरणी असेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी आपण सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पुन्हा एकदा माता लक्ष्मी समोर यायचा आहे आणि ओम श्रीम श्रीय नमः या महा मंत्राचा जप करत ही सुपारी उचलून आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता , धन ठेवता , सोने-नाणे ठेवता त्या ठिकाणी हि सुपारी ठेवून द्यायची आहे.

सुपारी ठेवताना ती जागा स्वच्छ असावी. खाली एखादे कापड शक्यतो लाल रंगाचे कापड अंथरलेले असेल गुलाबी रंगाचे कापड अंथरलेले असेल याची काळजी घ्या आणि मित्रांनो प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आता इथून पुढे पोर्णिमा येईल त्या प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेस आपण मनोभावे माता लक्ष्मीच पूजन करा आणि माता लक्ष्मीला नैवेद्य च्या बाबतीत सांगायचं राहिलं तुमची इच्छा असेल तर आपण खिरीचा सुद्धा नैवैद्य त्या दिवशी माता लक्ष्मीस अर्पण करू शकता. साखर ठेवलीत तरी चालेल.

मित्रानो माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत प्रत्येक पौर्णिमेस आपण त्यांचे पूजन करा त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. ओम श्रीम श्रीय नमः या मंत्राचा जप विसरू नका आणि हि सुपारी तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी ठेवत ही पूजा करायची आहे.पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरूपरी उचलून पुन्हा विधिवत ती मूळ जागी आपल्या तिजोरीमध्ये , कॅश डब्यामध्ये आपण ठेवून द्यायची आहे.

मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही जितके दिवस करत राहाल माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर बरसेल. पैसा कधीच कमी पडणार नाही. लक्ष्मीचा स्थायी वास तुमच्या घरात नक्कीच निर्माण होईल. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *