उद्या मंगळवार कोजागिरी पौर्णिमा… उद्या या ठिकाणी गुपचूप जाळा 1 कापूर… लक्ष्मी माता पाडेल घरात पैशाचा पाऊस…

नमस्कार मित्रांनो,

लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिची कृपा प्राप्त करण्यासाठी विविध उपाय करतात. आपल्यापैकी बरेच लोक उपवास ठेवतात आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात. मित्रांनो माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी वर्षात फक्त काहीच विशेष दिवस असतात, जेव्हा तिचे आशीर्वाद आपण विधीपूर्वक पूजा करून मिळवू शकतो.

शरद पौर्णिमेचा दिवसही त्यातलाच एक आहे. मित्रांनो असे मानले जाते की, देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी शरद पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेचे व्रत साजरे केले जाईल. उद्या या दिवशी हा एक उपाय केल्यास तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तसेच पैसा, सुख आणि शांती, आरोग्य, आनंद कोणत्याही गोष्टीची आपल्या घरात कमी होणार नाही.

शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही जर लक्ष्मी मातेला प्रसन्न केले, तर तुमच्या घरात कायम स्वरूपी माता लक्ष्मीचा वास होईल. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरातील धन, सुख, समृद्धी कधीच कमी होणार नाही. तर 19 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुद्धा हा एक अत्यंत सोपा असा उपाय नक्की करा. या उपाया साठी तुम्हाला फक्त एक कापूर जाळायचा आहे.

मित्रांनो तर असा हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी, मंगळवार 19 ऑक्टोबर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस देव पूजा करतो, त्या वेळेस तुम्हाला एका वाटीमध्ये 1 किंवा 2 कापूराची वडी घ्यायची आहे. मग त्यानंतर थोडे तांदूळ किंवा अक्षदा टाकायच्या आहेत आणि मग त्यावर हा कापुर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही एक ताट घ्यायचे आहे. मग त्या ताटामध्ये ती वाटी ठेवा, त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाका, मग त्यावर एक किंवा दोन वेळी कापुराच्या वड्या टाका. मग त्यानंतर कापूर जाळा. मित्रांनो जेव्हा तो कापूर जळत असेल तेव्हा तुम्ही ते ताट उचलायचे आहे आणि लक्ष्मी मातेला त्या जळत्या कापुराने ओवाळणी करायचे आहे.

मित्रांनो जर तुम्हाला माता लक्ष्मी ची आरती येत असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कापूर जाळूनच आरती करायची आहे. दिव्याने नाही तर त्या जळत्या कापराने आरती करायची आहे. आरती येत नसेल तर फक्त तीन, चार आणि पाच वेळा तुम्ही तो जाळलेल्या त्या कापराने ओवाळणी केली तरी चालते. फक्त तुम्ही कापूर जाळून लक्ष्मी मातेला ओवाळायचे आहे, तर लक्षात ठेवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कापून जा ळून माता लक्ष्मीला ओवाळायचे आहे.

मित्रांनो हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी उपाय केल्यास, तुमच्या आणि तुमच्या परिवारावर माता लक्ष्मीची कृपा होईल.

तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी या पेज चा हेतू नाही. केवळ समाज मान्य असलेले उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे.

अशाच नवनवीन माहिती साठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *