नमस्कार मित्रानो
मित्रानो कितीही प्रयत्न करा मात्र यश मिळत नसेल तर अशा वेळी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हा एक उपाय नक्की करा. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात.
मित्रांनो या रात्री केवळ सात तांदळाचे दाणे अक्षद म्हणजे न तुटले फुटलेले अखंड असणारे तांदूळ केवळ सात दाणे आपण घ्यायचे आहेत आणि जर आपल्या जवळपास एखादं शिवालय एखादं भगवान शिवशंकराचे महादेवाचं एखाद मंदिर खुलं असेल तर त्या मंदिरामध्ये किंवा जर मंदिर खुले नसेल तर बेलाच्या झाडाखाली बेलाच्या वृक्षाखाली हे सात दाणे मनोभावे अर्पण करून यायचे आहेत.
मित्रांनो यासाठी थोडंस अत्तर सुद्धा लागेल , अगदी कोणतेही अत्तर चालेल परंतु जर केशरचे अत्तर असेल तर अतिउत्तम. केशरच नसेल तर कोणतंही अत्तर हे थोडंसं त्या सात दाण्यांवर शिंपडायचं आहे.
हे दाणे अत्तर युक्त करायचे आहेत ,आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक सफेद पुष्प सफेद फुल आणि हे सात तांदळाचे दाणे घेऊन जवळपासच्या शिवालयात शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहेत ,आणि आपली इच्छा आपली मनोकामना बोलायची आहे.
हे अर्पण करताना ओम नमः शिवाय , ओम नमः शिवाय आणि महिलांनी नमः शिवाय ओम , नमः शिवाय हा मंत्र नक्की बोला. मनोभावे ते अक्षद अर्पण करा आणि आपली इच्छा आपली मनोकामना बोलून दाखवा.
ज्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळत नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त करून देण्याची प्रार्थना करा. जर शिवालय खुलं नसेल मंदिर उघडी नसतील तर या कोजागिरीच्या रात्री कोणत्याही बेलाच्या झाडाखाली कोणत्याही बेलाच्या वृक्षाखाली जाऊन चंद्र देवांकडे पाहायच आहे.
आपली इच्छा बोलून आपली मनोकामना व्यक्त करत हे तांदळाचे दाणे आणि पुष्प आपल्या उजव्या हाताने बेलाच्या झाडाखाली आपण समर्पित करायचे आहेत. मित्रानो हा छोटासा उपाय नक्की करून पहा. कोजागिरीच्या निमित्ताने भोले बाबांची कृपा नक्कीच तुमच्यावर बरसेल. धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.