नमस्कार मित्रांनो,
जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, जीवनात गरिबी असेल तर अशा वेळी एक छोटासा उपाय आपण बुधवारच्या दिवशी नक्की करू शकता. त्यासोबत ज्यांच्यावर कर्ज फेडणं आहे किंवा कर्ज फिटतच नाही अशी परिस्थिती आहे असे लोक सुद्धा हा उपाय करू शकतात.
बुधवारच्या संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केला तरी चालेल. या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत. दोन हिरव्या रंगाचे कागद जर हिरवा रंगाचा कागद नसेल तर पांढरा रंगाचा कागद घेऊन आपण त्यावर हिरव्या रंगाच्या शाईने 5 हा अंक लिहायला विसरायच नाही.
मग तो आपण वापरू शकतो. त्यानंतर आपण या कागदावर थोडेसे धनी ठेवायचे आहेत. धने हे लक्ष्मी कारक मानले जातात. धने हे आपल्या जीवनात धन निर्माण करून देतात आणि बुध ग्रहाचे देखील कारक आहेत. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि शक्ती आपल्यामध्ये यामुळे येते.
त्यानंतर या कागदाची आपणास पुडी बांधायची आहे. त्यानंतर त्या कागदांपैकी एक पुडी आपण स्वतःवरून ओवाळायचे आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची आपण दृष्ट काढतो तशी या पुडीने आपली स्वतःची दृष्ट काढायची आहे.
अशाच प्रकारे आपल्या घरात जितके लोक आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरून ही पुडी वओवाळायची आहे. त्यानंतर आपण देवघरात जाऊन आपल्या देवावरून सुध्दा ही पुडी ओवाळायची आहे. तसेच ती संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे.
त्यानंतर आपल्या घरामध्ये जो माता लक्ष्मीचा फोटो किंवा तस्वीर असेल त्या फोटोच्या पायाशी म्हणजेच माता लक्ष्मी चरणांजवळ ही पुडी आपण ठेवायचे आहे. त्यानंतर आपण ही पुडी आपल्या घरातील शेगडीच्या पायाशी नेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर आपण एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि
दुसरी पुडी जी आपण तयार केली आहे ती आपण बुधवारी रात्री झोपताना उशीखाली ठेवायचे आहे. मनोमन प्रार्थना करायची आहे की, आपली जी काही समस्या असेल ती दूर होऊ दे अशी प्रार्थना करत झोपावे.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपण ती पुडी आपल्या हातात घेऊन घराबाहेर जाऊन तिला जाळायचे आहे. ज्यांना घराबाहेर जाऊन ती पुडी जाळणं शक्य नसेल त्यांनी घराच्या मुख्य दारावर ही पुडी जाळी तरी चालते. ते एखाद्या पात्रांमध्ये जाळायची आहे.
ती जळत असताना आपण आपली इच्छा बोलायची आहे. त्यानंतर त्याची झालेली राख शेगडीजवळ ठेवलेल्या पुडीमध्ये ठेवायचे आहे आणि ती पुडी घराबाहेर एखाद्या झाडाच्या बुंध्याशी नेऊन पुरायचे आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकट असेल तर आपण जी गॅस किंवा शेगडीखाली ठेवलेली पुडी आहे ती पुढील बुधवारपर्यंत तसेच ठेवा आणि पुढच्या बुधवारी एका झाडाच्या बुद्यांजवळ पुरा. या उपायाने तुमचे आर्थिक संकट निघून जाण्यास मदत होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.