नमस्कार मित्रानो,
मित्रानो बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी वस्तू आपण आपल्या किचन मध्ये लपवून ठेवा. हा उपाय घरातील महिलांनी करावा. जर घरात महिला नसेल तर पुरुष सुद्धा हा उपाय निसंकोच करू शकतात.
बुधवारी केलेला हा छोटासा उपाय कुंडलीतील बुध ग्रहास मजबुती प्रदान करतो. त्यामुळे आपली वाणी प्रभावी बनते, आपलं बोलणं हे प्रभाशाली बनत. बुद्धी तीव्र आणि तेज बनते. नोकरी, व्यवसाय, उद्योग धंदा यातून मोठ्या प्रमाणात आवक म्हणजेच पैसा मोठ्या प्रमाणात घरात येऊ लागतो.
जर तुमच्या घरात शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकणारी मुले आहेत तर त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता. मित्रानो बुधवारच्या दिवशी आपण हा उपाय कराच मात्र सोबतच आजच्या दिवशी गोमातेला हिरवा चारा नक्की खाऊ घाला.
शक्य असल्यास गोर गरिबांना, गरजूंना हिरव्या वस्तूंचं दान म्हणजेच पालेभाज्या किंवा इतर तत्सम वस्तूच दान करू शकता. स्वतः हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करा. महिलांनी हिरव्या रंगाची टिकली आपल्या माथी नक्की लावावी.
जर हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शक्य नसेल तर कमीत कमी एखादा हिरव्या रंगाचा रुमाल तरी स्वतः जवळ नक्की बाळगा. मित्रानो हे छोटे छोटे जे उपाय असत ते आपल्या जीवनात खूप आमूलाग्र बदल घडवून आणतात.
तर आपण बुधवारच्या रात्री एक हिरव्या रंगाचा कागद घ्यायचा आहे हिरव्या रंगाचा कागद नसेल तर सफेद रंगाच्या कागदाला हिरवा रंग दिला तरी चालेल. तर अशा या हिरव्या रंगाच्या कागदात थोडीशी धन्याची पावडर ( 5 चिमूट धने पावडर ) घ्यायची आहे.
मित्रानो प्रत्येक चिमूट टाकताना ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नमः या मंत्राचा जप करा. जर हा मंत्र बोलताना अवघड वाटत असेल तर ओम बुं बुधाय नमः हा सोप्पा मंत्र म्हटला तरी चालेल.
प्रत्येक चिमूट टाकताना हा मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे 5 चिमूट धन्याची पावडर हिरव्या कागदात टाकताना 5 वेळेस हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. त्यानंतर हिरव्या रंगाच्या शाईने 5 हा अंक त्या कागदावर लिहायचा आहे. अंक आकाराने थोडा मोठा लिहा. मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत अंक चालेल.
मित्रानो 5 हा अंक बुध ग्रहाशी थेट संबंधित आहे. त्यानंतर या कागदाची आपण व्यवस्थित घडी घालायची आहे. आता आपल्या किचन मधील उत्तरेकडील जी भिंत आहे या उत्तरेकडे कुठेही हि पूड लपवून ठेवायची आहे. उत्तरेकडे कुठेही ठेवा मात्र व्यवस्थित लपवून ठेवा.
उत्तर दिशाच का? तर मित्रानो उत्तर दिशा हि धनाची दिशा समजली जाते. माता लक्ष्मीची दिशा आहे. या दिशेने मोठ्या प्रमाणात आपली आवक वाढू शकते. उद्योग धंदा, व्यवसाय अगदी तेजीत तर चालवायचा असेल तर हि उत्तर दिशा सांभाळणं फार गरजेचं असत.
तर या ठिकाणी पुडी लपवून ठेवायची आहे. मित्रानो बुधवारी रात्री केलेला हा उपाय जर आपण पूर्ण विश्वासाने केला तर त्याचे फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. कोणताही उपाय करण्याआधी त्या माऊलीवर, देवावर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण झाले तर ती व्यक्ती कितीही जवळची असुदे त्या व्यक्ती बद्दल तुमच्या मनात प्रेम शिल्लक राहत नाही. त्या व्यक्ती बद्दल सतत तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात.
कोणी कितीही चांगलं सांगुदया त्या व्यक्ती बद्दल परंतु तुम्ही ते मान्य करत नाही. अगदी तीच गोष्ट असे उपाय करताना घडते. हे उपाय तोडगे करताना जर तुम्ही प्रेम पूर्वक, विश्वास पूर्वक जर केले तर त्याच फळ तुम्हाला 100 टक्के मिळत.
जर मनात शंका कुशंका आणून जर उपाय केले तर त्याचा तितकासा लाभ त्या व्यक्तीला होत नाही. त्यामुळे मित्रानो पूर्ण भक्ती भावाने हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होईल. शुभम भवतु.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.