जुन्या जेजुरी गडावरून खंडोबा देव नवीन गडावर कसे आले?..काय आहे रहस्य?

नमस्कार मित्रांनो,

मी आज आपल्याला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधील जेजुरी मध्ये असणाऱ्या आपल्या खंडोबाची गोष्ट सांगणार आहे. महाराष्ट्रात पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरचा जोतिबा, जेजुरीचा खंडोबा यांना मानणारे लाखो भक्त आहेत.

सर्वानाच माहीत आहे का? जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी आहे. जून स्थान हे कडे पठारावर आहे. आणि जुन्या स्थानावरून देव नवीन स्थानावर कसा आला. ही सत्यकथा आहे.

कित्येक वर्षांपूर्वी सुतेपरगण्या मध्ये खैरे नावाचे एक भक्त राहत होते. खंडोबावर त्यांची अपार भक्ती, श्रद्धा होती. ते दररोज करेच पाणी घेऊन जुन्या गडावर म्हणजे कडे पठारावर देवाला घालायचे म्हणजे देवाची पूजा करत असत.

असा नित्यक्रम होता. आणि शेवटी अस करता करता त्यांचं खूप वय झालं त्यांना जायला जमत नव्हतं खूप तकलीफ होत होती. एक दिवस ते देवाकडे पाणी घेऊन गेले आणि म्हणाले हे देवा आता मला तुझ्याकडं येणं होत नाही.

तू आता माझ्या घरी चल देवाने मान्य केलं. देव म्हणाले मी तुझ्या घरी येईन पण तू कुठेही माग बघायचं नाही. ज्या ठिकाणी मागे बघशील त्याचं ठिकाणी मी थांबेल. खैरेनी मान्य केले.

खैरे पुढे पुढे होते आणि देव मागे मागे. ज्याठिकाणी आता नवीन गड आहे त्याठिकाणी आल्यावर खैरेंना शंका आली. की देवाने आपल्याला फसवल तर नाही ना म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले.

तर देव त्यांच्या मागेच होता पण म्हटल्याप्रमाणे देव तिथेच गुप्त झाले. त्याठिकाणी नंतर मंदिर झालं. आज त्या ठिकाणी नवा गड आहे. खंडोबा त्याचं ठिकाणी आला. अजून एक गोष्ट ऐकुया.

खंडोबा देव जेजुरी मध्ये का आला. कडे पठारावर खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. लवथळेश्वर ठिकाणी डोंगरावर काही ऋषीमुनी राहत होते. दोन राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केली.

<
त्यांचं नाव आहे मनी आणि मल्ल. त्यांना ताकतीचा खूप गर्व झाला होता. त्यांनी साधू ना मारायला सुरुवात केली. यज्ञ मोडायला सुरुवात केली. साधू मुनी आपल्या बायका मुलांना घेऊन लपून बसले.

त्यांनी शंकराचा धावा केला. शंकराने काळभैरव अवतार घेतला आणि कडे पठारावर मनी आणि मल्ल यांचा वध केला. म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत म्हटलं जातं.

मनी आणि मल्ल यांचा वध केला म्हणून मल्हारी हे नाव प्रचलित झालं. मार्तंड भैरव यांना दोन पत्नी आहेत. एक म्हाळसा ही लिंगायत समाजातील आहे.

नेवासा येथे मोठा व्यापारी होता त्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की त्यांच्या मुलीचे लग्न खंडोबरोबर होणार आहे. म्हाळसा आणि खंडोबाचं लग्न ठरलं. पाली या ठिकाणी पौर्णिमेला लग्न झाले.

काही दिवसांनी देवाला धनगर समाजातील एक मुलगी बानाई आली होती. बाणाई ने खंडोबाला पाहिलं. खंडोबाने बानई ला पाहिलं. त्यांनी म्हाळसासोबत सरीपाठाचा डाव रचला.

त्यात ते हरले आणि १२वर्षे वनवास भोगावा लागला. ते बाणा ई ला भेटायला गेले. बाणाई क्या बाबांकडे खूप मेंढरे होते. देवाने रूप घेऊन मेंढर सांभाळायला लागले.

एके दिवशी देवांनी सगळी मेंढरे मारली आणि बानाई बरोबर लग्न करायचे वचन मागितले. बानाई च्या बाबांनी वचन दिले. देवांनी भंडारा टाकून सर्व मेंढरे जिवंत केली. नंतर बनाई च लग्न खंडोबा सोबत झालं. अशी ही कहाणी आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *