नमस्कार मित्रांनो,
आजच्या प्रदुषणाच्या युगात आपल्या सगळ्यांना हजारो अडचणी येत आहेत. जास्त करून लोकांचे खूप केस गळतआहेत.कमी वयात केस पांढरे होत आहेत. आज आपण खूप सोपे उपाय पाहायचे आहेत कमी खर्चात घरी बनवून वापरू शकतो. तर चला बघूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
कोंडा
कोंडा घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे तुळशीचे पाने आणि कडुलिंबाची पाने तुळशीचे पाने आणि कडुलिंबाची पाने चांगली धुऊन घ्या. नंतर ती उकळवून घ्या नंतर थंड करायला ठेवा नंतर ते पाणी केसांना लावून ठेवा. आणि थोडा वेळठेवून द्या नंतर शाम्पूने केस धुऊन टाका. हे आपल्याला कोंड्यापासून सुटका करून देईल किंवा आपण तुळशी आणि कडूलिंबाची पाने वाटून लावू शकतो याच्यानंतर आहे.
केसांना नियमित तेल लावणे परंतु जास्त तेल कोंड्यासाठी चांगलं नाही केस धुवायच्याआधी तीनचार तास आधी लावा. मुलगा किंवा मुलगी या दोघांसाठी हे महत्त्वाचे आहे. आदल्या दिवशी केसांना तेल लावणं चांगलं असतं याशिवायकधी तेल नाही लावायचं आहे. आठवड्यातून दोनतीन वेळा केस धुण्याच्या आधी तेल लावावे. तेल हे केसांसाठी जसेअन्न आहे.जसं तेल न लावता चांगलं नाही तसेच तेल जास्त लावूनही चांगलं नाही.
केसांना तेल लावून कधी बाहेर जाऊ नये कारण बाहेरचे प्रदूषण असते, बाहेरची धूळ केसांमध्ये अडकते यांच्यामुळे केसघाण होतात आणि लवकर गळण्यास सुरुवात होतात.
मुलतानी माती
यात दही एक कप, दूध दोन चमचे, आवळ्याचं तेल दोन चमचे, मुलतानी माती अर्धा चमचा आणि लिंबूरस घालून चांगली पेस्ट बनवून घ्या. दह्यामध्ये विटामिन बी असते ज्याने केसांना पोषण मिळते. दह्यामध्ये विटामिन बी ५ आणि डी असते. दही ॲटीबॅक्टरियल आणि फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी उपयोगी आहे. आणि स्क्याल्प मध्ये जे डेड सेल्स असतात त्यांना रिपेअर करतात. याला युज करायच्या अगोदर केसांना तेल लावा त्यानंतर हा पॅक लावावा. त्यानंतर तीस चाळीस मिनिटाने केस धुवून टाका. दही कोंडा कमी करण्याचे काम करते यामुळे केस चांगले राहतात मुलतानी माती मुळे केस गळायचे बंद होतात आणि केस मऊ राहतात त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.
कोरफड
<
कोरफड हे त्वचा आणि केसांना खूप पोषक आहे कोरफड मुळे केस गळायचे बंद होतात कोंडा जातो खाजहीकमी होते याला कसं वापरायचं कोरफड मधील जेल खोबरेल तेल आणि लिंबू चा एकत्र रस करा हा पॅक केस धुवायच्याआधी अर्धा तास लावायचा नंतर केस धुवायचे आहेत. याचा वापर आठवड्यातून दोन तीन वेळा केल्यास कोंडा निश्चित कमी होईल.
घरी बनवलेले केसांचे तेल
यामध्ये दोन कप मोहरीचे तेल दोन कांद्याचे तुकडे आणि कलोंजी. मोहरीचे तेल कांद्याचे तुकडे टाकुन तापट ठेवायचे आहे. कांद्याचा रंगतांबूस होईपर्यंत गरम करून त्यात कलोंजी टाकायचे आहे नंतर थंड करून एका बाटलीत भरुन ठेवायचे आहे.
कलोंजी चा पॅक
एक चमचा कलोंजी एक चमचा मोहरी आणि एक चमचा मेथीचे दाणे एक कप पाण्यात रात्रभर भिजवूनठेवा दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये टाकून घट्ट पेस्ट बनवा पाणी जास्त टाकू नये. नाहीतर पातळ होईल नंतर या दोन चमचे दही टाकून ढवळणे नंतर केसांना लावून घेणे लावल्यावर तीस ते चाळीस मिनिट ठेवायचा आहे. नंतर साध्या पाण्याने धुवावे नंतर नियमित शाम्पूने धुवावे. हा पॅक लावायच्या आधी चांगले तेल लावुन घ्यायचा आहे यामुळे आपले केसगळणार नाहीत आणि कोंडा होणार नाही हे उपाय घरगुती असल्याने याचा काही दुष्परिणाम नाही यामध्ये केमिकल नाही यातील कोणतेही उपाय मुलगा किंवा मुलगी वापरू शकतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.