नमस्कार मित्रांनो,
जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, पैसा कितीही आला तरी खर्च होत असेल किंवा घरात पैसाच येत नसेल तर माता लक्ष्मीला कसं आकर्षित करायचं आणि घरात आलेल्या माता लक्ष्मीला स्थिर कसं ठेवायचं यासाठी हा उपाय आहे.
अगदी पुरातन काळापासून कवडीला लक्ष्मी मानलं जातं आहे. कवडी पांढऱ्या रंगाच्या किंवा पिवळया रंगाच्या असे अनेक कवडीचे प्रकार आहेत. आपण कोणत्याही देवळाजवळ कवडी खरेदी करू शकता.
कवडी खरेदी करून आपल्या देवघरात ठेवायची आहे. त्यानंतर मनोभावे हात जोडून माता लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि आपल्या घरात मातेचे आगमन होण्यास तिला प्रार्थना करावी.
त्यानंतर देवपूजा करून ही कवडी आपल्या तिजोरीत, गल्ल्यात ठेवायची आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी सुकर होतो.
तसेच आलेली लक्ष्मी जर टिकवून ठेवायची असेल तर त्यासाठी 5 कवड्या घेऊन एक पिवळ्या रंगाचे वस्त्र घेवून ते देवघरासमोर अंथरून त्यावर ह्या 5 कवड्या ठेवायच्या आहेत. प्रत्येक कवडीला केसर लावायचे आहे.
त्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करून या कवड्यांची पुरचुंडी बांधून आपल्या तिजोरी किंवा गल्ल्यात ठेवू शकता.
लक्षात ठेवा जिथे आपण ही पुरचुंडी किंवा कवडी ठेवाल ती जागा स्वच्छ असावी. कोणत्याही प्रकारची जळमटे नसावीत.
या अश्या दोन उपयांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात येईल आणि टिकून राहील. त्यामुळे हा कवड्यांचा उपाय नक्की करून पहा.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.