नमस्कार मित्रांनो,
पैसे मिळवण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असावी लागते, त्यासाठी घरातील काही वस्तू, वास्तुदोष आपल्या कामात यश देतात किंवा अडथळे आणतात.
आपली सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यश मिळावं यासाठी आपण काही उपाय जे आपलं हिंदू शास्त्र सांगते ते केल्यास त्याचा भरपूर लाभ होतो.
मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लाल रंगाची 20 रुपयाची एक नोट लागेल. हा उपाय करताना जी नोट आपण वापरणार आहोत ती नोट कोणत्याही प्रकारे खराब झालेली नसावी.
आपण घेतलेल्या या नोटेवर काहीही लिहिलेलं नसावं. अगदी कोरी करकरीत स्वच्छ 20 रुपयांची लाल रंगाची नोट घ्यायची आहे.
ही नोट आपण आपल्या देवघरात देवासमोर बसून या नोटे पासून पि रॅ मि ड तयार करायचे आहे. पि रॅ मि डला फेंग शुई मध्ये खूप मोठं महत्त्व आहे. पि रॅ मिड म्हणजे खूप शक्तिशाली स्थान आहे, एक स्फुर्तीस्थान आहे, अखंड ऊर्जेचा तो स्त्रोत आहे. धनप्राप्तीसाठी तसेच आरोग्य प्राप्तीसाठी पि रॅ मि डचा वापर चीनसह भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे.
मित्रांनो आपल्या देवघरासमोर बसून आपण लाल रंगाच्या नोटेचा पि रॅ मि ड तयार करायचा आहे. एकापेक्षा जास्त पि रॅ मि ड तयार केले तरी चालतील, पण करताना 1, 3, 7, 11, 21, 51, 108 या पटीत तयार करा.
अशा प्रकारे तयार केलेले पि रॅ मि ड हे आपण आपल्या देवघरात देवासमोर ठेवून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला ही विनंती करा की, आमच्या भरभराटी मध्ये वाढ होऊदे. आमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येऊ दे. पैसा येण्याचे अनेक मार्ग खुले होऊ देत.
पूजेनंतर आणि प्रार्थना केल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये किंवा बॉक्समध्ये गल्ल्यांमध्ये ही नोट तुम्ही ठेवायची आहे. ठेवल्यानंतर आपल्याला या पि रॅ मि डची कोणत्याही प्रकारे पूजा न करता केवळ वर्षभर ती नोट त्याच ठिकाणी ठेवायची आहे.
मित्रांनो एक वर्ष झाल्यानंतर हे पि रॅ मि ड म्हणजेच ही नोट एखाद्या मंदिरामध्ये दान करायची आहे. हे दान सुद्धा आपल्याला गुपचूप करायचे आहे. मंदिरात हे पि रॅ मि ड दान पेटीमध्ये किंवा एखाद्या देवतेच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि पुन्हा नवीन पि रॅ मि ड तयार करून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता.
काही उपाय वरचेवर केल्यास त्याचा लाभ अधिक मिळतो. तसेच घरातील सुख, शांती टिकून राहण्यास मदत होते. आपण जर हे उपाय मनापासून पूर्ण श्रद्धेने जर केले तर तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील. त्यामुळे जीवन आनंदी बनेल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.