नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मातील हिमालयाच्या कुशीत वसलेलं केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये वर्षातील सुमारे सहा महिने बर्फाने झाकलेल हे पवित्र निवास स्थान भगवान शंकराचं निवास स्थान असल्याचं म्हटलं जात. इथे त्रिकोण शिवलिंगाच्या रूपात भगवान महादेव विराजमान आहेत.
या केदारनाथ संदर्भातल्या अनेक पौराणिक कथा आहेत. धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार महाभारत युद्धात विजय मिळवल्यानंतर पांडवांमधील युधिष्ठिर हा हस्तिनापूरचा राजा झाला. युधिष्ठिराने हस्तिनापुरवर सुमारे चार दशके राज्य केलं.
परंतु युधिष्ठिर हा धर्मराज असल्यामुळे आणि नेहमी सत्याची बाजू घेणारा असल्यामुळे एक दिवस त्याने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की, हे केशवा आम्हा सगळ्या भावंडांवर आपल्याच भाऊबंधांना युद्धामध्ये मारण्याचा कलंक आहे. हा कलंक कसा काढायचा या पापातून आम्हाला मुक्ती कशी मिळेल आम्हाला काहीतरी प्रायश्चित्त तू सांग.
तेव्हा भगवान श्रीकृष्णांना पांडवांना सांगितलं की, तुम्ही युद्ध जिंकलात खरे परंतु गुरु, भाऊ, बंधू यांना मारून पापी झाला. या पापामुळे मोक्ष मिळणे अशक्य आहे. मात्र या पापांपासून मुक्ती केवळ महादेवच देऊ शकतात. म्हणून महादेवांच्या आश्रयाला जा. त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला परतले.
त्यानंतर पांडवांना आपल्या पापापासून मुक्ती मिळण्याची चिंता वाटू लागले आणि महाल सोडून भगवान शंकरांच्या आश्रयाला केव्हा जावे याचाच विचार ते करू लागले आणि त्याच दरम्यान एक दिवशी पांडवांना कळलं की, त्यांचे परम सखा भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा आपले अवतार कार्य संपले आहे.
हे ऐकून आता पांडवांना कळून चुकले की आता पृथ्वीवर राहणे योग्य नाही. अशा स्थितीत पांडवांनी परिषदांकडे राज्य सोपविले आणि द्रौपदीसह हस्तिनापुर सोडले आणि भगवान महादेवांच्या शोधात ते निघाले. हस्तिनापूर सोडल्यानंतर पाच भाऊ आणि द्रौपदी भगवान शंकरांच्या दर्शनासाठी सगळ्यात कधी काशीला पोहोचले.
परंतु तिथे त्यांना महादेवांचे दर्शन झाले नाही. त्यानंतर त्यांनी इतर अनेक ठिकाणी भगवान महादेव यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हे लोक जिथे जिथे जात होते तिथून महादेव निघून जात असत. याच क्रमाने पांडव आणि द्रौपदी एक दिवशी भगवान शंकरांचा शोध घेत हिमालयात जाऊन पोहोचले. तिथे महादेवांनी या पाच पांडवांना पाहिले पण यांना पाहून ते लपले.
पण युधिष्ठिराने भगवान महादेवांना लपताना पाहिले आणि युधिष्ठिर म्हणाले हे महादेवा हे भोलेनाथा आम्हाला माहिती आहे की, तुम्ही आमची परीक्षा बघत आहात आणि म्हणूनच आम्ही तुमच्या सगळ्या परीक्षा देऊ पण तुमचा दर्शन घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही.
युधिष्ठिराने हे सांगितल्यानंतर पाचही पांडव पुढे जाऊ लागले. तेवढ्यात एका बैलाने त्यांच्यावर झडप घातली. हे पाहून भीमाने त्याच्याशी लढाई सुरू केली. दरम्यान बैलाने आपले डोके खडकात लपवले. त्यानंतर भीमाने शेपूट धरून त्या बैलाला ओढायला सुरुवात केली आणि बैलाचे शरीर डोक्यापासून वेगळे झाले.
त्या बैलाच्या पाठीवरील वशिंड शिवलिंगात बदलले आणि काही क्षणातच त्यातून भगवान शिव प्रकट झाले. महादेवांनी पांडवांना दर्शन दिले आणि त्यांच्या सर्व पापांसाठी त्यांना क्षमा देखील केले. इतकेच नाही तर पांडवांवर प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा महादेवांनी दाखवला आणि नंतर ते अदृश्य झाले.
त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आज ते शिवलिंग केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते. अस मानलं जातं की जर एखादी व्यक्ती केदारनाथाच्या दर्शनाचा संकल्प घेऊन बाहेर पडली आणि मरण पावली तर त्या आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. अर्थातच त्यांना मुक्ती मिळते. मित्रांनो तुम्ही देखील भोळेनाथांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ अस नक्की लिहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.