अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
करूणात्रिपदीचे पठण करण्याचे महत्व आणि लाभ. श्री गुरु मूर्ती चरित्रात करूणात्रिपदीचे भाविकांना अतिशय अद्भुत असे वर्णन दिसून येते. मंत्र रूप, प्रासादिक, दत्तभक्तास प्रत्यक्ष प्रमाण असणा ऱ्या श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्र ग्रंथात ओळी क्रमांक ४० ते ५३ अध्याय ९२ या कारूणात्रिपदीचे महत्व विशद केले आहे.
काही आपत्ती येता जो नित्य २१ वेळा श्रद्धा युक्त अंतःकरणाने मनात कोणतीही शंका न आणता या त्रिपदीचे पठण करेल. त्याच्या आपत्तीचे पूर्ण निरसन होईल. तसेच पूर्ण श्रद्धा अंत करणने जो या त्रिपदिचे २१ वेळा श्रवण करेल. त्याची व्याधी दूर होऊन तो निरोगी होईल. भक्तांसाठी करूणात्रिपदीचे हे तात्कालिक फल निवेदन केले आहे.
परंतु सौख्य व सद्गुरू कृपा यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्व काळ या त्रिपदीच्या पाठाने दत्तगुरूंचे स्तवन करा. म्हणजे त्रिपदी नियमितपणे म्हणत जात ही कृपावंत सद्गुरूंची आज्ञा आहे. आणि नाना महाराजांचे आग्रहपूर्वक सांगणं आहे. म्हणून आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करुया. व सद्गुरूंना प्रिय होण्याचा प्रयत्न करूया.
राष्ट्र संत श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या श्री क्षेत्र नृसिंह नामदेव जिल्हा हिंगोली येथे शके १८२७ इसवी सन एकोनाविसाशे पाच मध्ये परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांचा पंधरावा चातुर्मास संपन्न झाला. याचवेळी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली.
हा अघटीत प्रकार पाहून वाडीची मंडळी घाबरून गेली. आता वाडीवर मोठं संकट येणार असे सर्वांना वाटले. या संकटाच्या निरसणार्थ ही मंडळी परम पूज्य सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांना भेटण्यासाठी नृसिंह येथे मुक्कामास आले. नरसोबा वाडीत येथे श्री दत्त सभेत काही चुका झाल्यामुळे हा प्रकार झाल्याचे स्वामीना समजले.
तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपा संपादन साठी श्री क्षेत्र नृसिंह येथे स्वामिंकडून सिद्ध मंत्र करूणात्रिपदीत काव्याची रचना झाली. तिच्या नित्य पठणातून सर्व विघ्ने दूर होतील. असा आशीर्वाद मिळाला. पुढे ही करूणापदी सर्व भक्तीपासनेत समाविष्ट झाली. मित्रहो आपण कुठेही असा प्रवासात घरी, दारी न चुकता आपल्या पठणात ठेवा. अंतर्भाव ने त्रीपदी पठण करा. मग बघा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्की धावून येतील. दत्त गुरूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत करूणात्रिपदीचा प्रचार प्रसार करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
शांत हो श्री गुरू दत्ता! मम चित्ता शमवी आता!
तू केवळ माता जनिता! सर्वथा तू हितकर्ता!
तू आप्त स्वजन भ्राता! सर्वथा तुची त्राता!
भयकर्ता तू भयहार्ता! दांडधरता तू परिपाता!
तुजवाचूनी न दुजी वार्ता!
तू आर्ता आश्रय दत्त्ता! शांत हो श्री गुरू दत्ता!
अपरधास्तव गुरूंनाथा! जरी दंडा धरिसी यथार्थ!
तरी आम्ही गावुनी गाथा! तव चरणी नमवू माथा!
तू तथापि दांडीसी देवा! कोणाचा मग करू धावा!
सोडविता दुसरा तेव्हा!
कोण दत्ता आम्हा त्राता? शांत हो श्री गुरू दत्ता!
तू नटसा होऊनी कोपी! दंडी ताहि आम्ही पापी!
<
पूनरपिही चुकत तथापि! आम्हावरी नच संतापी!
गच्छत: स्खलनं क्वापी! असे माणूनी नच हो कोपी!
निजकृपालेशा ओपी!
आम्हावरि तू भगवंता! शांत हो श्री गुरू दत्ता!
तव पदरी असता ताता! आडमार्गी पाऊल पडता!
संभाळूनि मार्गा वरता!
आनिता न दुजा त्राता!
निजबिरुदा आणुनी चित्ता!
तू पतितपावन दत्ता!
वळे आता आम्हावरता!
करूनाधन तू गुरूंना था!
शांत हो श्री गुरू दत्ता!
सहकुटुंब सहपरिवार!
दास आम्ही हे घरदार!
तव पदी अर्पू असार! संसाराहित हा भार!
परिहरिसी करूनासिंधो! तू दीनानाथ सुबंधो!
आम्हा आघलेश न बाधो!
वासुदेव प्रार्थित दत्ता! शांत हो श्री गुरू दत्ता!
मम चित्ता शमवी आता!
श्री गुरुदत्ता जय भगवंता!
ते मन निष्ठुर न करी आता!
चोरे द्विजासी मारिता मन जे!
कळवळले ते कळवलो आता!
श्री गुरुदत्त!
पोट शुळाने! द्विज तडफडत!
कळवळले ते कळवलो आता!
श्री गुरुदत्त!
द्विज सुत मरता वळले ते मन!
हो की उदासीन न वळे आता!
श्री गुरुदत्त!
सतीपती मरता काकुळती येता!
वळले ते मन न वळे की आता!
श्री गुरुदत्त!
श्री गुरुदत्त त्वजी निष्ठुर ता!
कोमल चित्ता वळवी आता!
श्री गुरुदत्त!
जय करूनाघन नज जनजीवन!
अनुसुया नंदन पाही जनार्दन!
नीज अपरधे उफराठी दृष्टी!
होऊनी पोटी भय धरू पावन!
जय करुणा घन!
तू करुणा कर कधी आम्हावर!
रुससी न किंकर वरद कृपा घन!
जय करुणा घन!
वारी अपराध तू मायबाप!
तव मनी कोपलेश न वामन!
जय करुणा घन!
बाल कापरा गणे जरी माता!
तरी कोण त्रा ता देईल जीवन!
जय करूनाघन!
प्रार्थी वासुदेव पदी ठेव भाव!
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन!
जय करुणा घन!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.