नमस्कार मित्रांनो,
तुमच्या डोक्यावर खूप मोठे कर्ज आहे का? कर्जामुळे तुम्ही त्रासले आहात काय? कितीही प्रयत्न केले तरी कर्ज फिटत नाही अशी तुमची परिस्थिती आहे का? मग ही माहिती शेवटपर्यंत वाचा. सुख दुःख, नफा-तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही.
अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो. तुमच्यावर कर्जाचा भार जरी असला तरी अशा उपाय योजनांमुळे दिलासा मिळतो. हे उपाय काही दिवस सातत्याने केले तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.
या उपायांची सुरुवात होलिका दहनाच्या रात्रीपासून तुम्ही करू शकता. त्यातीलच एका उपायांबद्दल आज आपण पाहणार आहोत. होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावल्यास कर्जाचे ओझे लवकर नाहीसे होते. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो असे सुद्धा म्हंटले जाते. या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे नक्की दूर होतात.
या शिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो. पण हा दिवा कसा लावायचा कधी लावायचा चला जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात मोहरीचे तेल भरावे. त्यात थोडे काळे तिळ बत्तासे, थोडा शेंदूर आणि तांब्याचे नाणे ठेवा.
त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीने प्रज्वलित करा आणि होळीची आरती करा. नंतर तो दिवा एका निर्जन रस्त्यावर ठेवा आणि दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नका. त्यानंतर घराच्या दिशेने तोंड आणि हात धुवा मग घरात प्रवेश करा. कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा उपाय खूप कारगर ठरतो आता म्हटलं जातं.
सगळ्यात महत्वाचं कुठलाही उपाय करताना आधी आपला त्यावर विश्वास असायला हवा. जर तुमचा त्या गोष्टीवर विश्वास असेल तरच ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. जर तुमचा त्या गोष्टीवर विश्वास नसेल तर ती गोष्ट कधीही करू नये. कारण कुठलेही काम करताना ते पूर्ण श्रद्धेने केलं तर त्याचे उत्तम फळ मिळते असे म्हणतात.
त्यामुळे हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर संपूर्ण श्रद्धेने करा नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम मिळतील. मित्रांनो 17 मार्चला होलिका दहन आहे. होलिका दहनामध्ये आपण आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचे सुद्धा दहन करायचे असते. कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी येते. आपले विचार जेवढे सकारात्मक तेवढी आपली कृती सकारात्मक होते.
आपल्याकडून चांगली कृती घडली तर अर्थातच आपल्या आयुष्यात सुद्धा सगळ्या चांगल्या घटना घडतात. त्यामुळे आपण मनातून सकारात्मक असणं आवश्यक असतं. म्हणूनच होलिका दहन महत्व आहे. आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांना या होळीमध्ये दहन करायचे आहे.
त्याबरोबरच होळीला पुरणाची पोळीचा नैवेद्य सुध्दा नक्की दाखवा. तसेच होळीमध्ये एक नारळपण नक्की अर्पण करा आणि सगळ्यात महत्वाचं होळीआधी आपल्या घराची स्वच्छता करा.
घरांमध्ये ज्या नकारात्मक वस्तू असतील अर्थात फाटलेले कपडे, तुटके फुटके भांडे किंवा तुटलेली फूटलेली खेळणी, वापरात नसलेल्या वस्तू या सगळ्या वस्तू तुम्ही होळीआधी घरातून बाहेर नक्की काढा. घर स्वच्छ झालं तर तुमचं मन स्वच्छ होईल.
मन स्वच्छ झाला तर विचारही तुमच्या मनामध्ये चांगले येतील आणि त्यामुळे तुमचे आयुष्य सुद्धा चांगला होईल. म्हणून होळीमध्ये तुम्ही हे काही उपाय नक्की करून बघा आणि तुमचा आयुष्य आनंदाने भरा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.