घरात शांतता, सुख, समृद्धी नांदण्यासाठी करा हा कर्पूरहोमचा एक उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज आपण तंत्रशास्त्रात एक अत्यंत महत्वाच्या उपायाबद्दल या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

“घर असावं घरासारखं… नकोत नुसत्या भिंती.., तिथे असावा प्रेम जिव्हाळा.. नकोत नुसती नाती.

या कवितेला ओळीप्रमाणे प्रत्येकाला आपलं घर असावं असं वाटत. फक्त चार भिंतीच घर नको तर त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व एकमेकांना समजून घेण्याची कोत असावी लागते.

पण बरीच घर अशी असतात त्या घरामध्ये सगळं काही असत. अतिशय सुंदर घर असत, उत्तम फर्निचर असत, घरात सजावटी साठी उच्च दर्जाची सामने असतात, त्याचबरोबर काही घरामध्ये मिळकत हि चांगली असते.

पण या घरामध्ये नसते ती एकमेव शांतता. घरात आलं कि कटकटी, भांडण चालू असतात. एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नाहीत. सेवा करायची म्हटलं तर अश्या वातावरण मन लागत नाही. कुटुंबातील व्यक्ती सदैव नैराश्येत जगतात. सतत नकारात्मक भावना सगळ्यांकडे असते. आणि जर असे असेल तर त्या घराला फक्त सोयीसुविधा आहेत, माणूस सुखी समाधानी म्हणता येणार नाही.

तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरात शांतता हवी. एकमेकांना समजून घेणारे हवे. समोरचा व्यकितीचा आदर करण्याची भावना हवी. पण हल्ली बऱ्याच कुटुंबामध्ये हि सगळ्यात मोठी समस्या आहे. सद्याच्या वातावरण घरामध्ये सगळं आहे पण शांतता नाही. सेवेत मन लागत नाही. काय करावं?

तर मित्रांनो.. काळजी करू नका. तुमच्या घरी स्वामींचं अतिष्टान असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. तर आज आपण यासाठी तंत्रशास्त्रात एक अत्यंत महत्वाचा, साधा व सोपा उपाय पाहणार आहोत. त्याला कर्पूरहोम असे म्हणतात. त्याला घरातील कोणीही व्यक्ती अगदी सहजपणे पण श्रद्धेने हा उपाय करू शकतो. चला तर मग आपण या कर्पूरहोमची माहिती घेऊया.

तंत्र शास्त्रातील कर्पूरहोम हा अत्यंत महत्वाचा उपयोगशाली उपाय आहे. सुरुवातीला एक नारळ पूर्ण सोलून घ्या. आता हा नारळ देवा पुढे बसून, देवाकडे बसून त्या नारळाची शेंडी करून ठेवा व त्या नारळावर एक कापराची वडी पेटवून ठेवावी. हि पहिली वडी संपण्यागोदर दुसरी कपूरची वडी त्यावर ठेवावी. अश्याप्रकारे ७ ते ८ कपूरच्या वड्या त्याववर ठेवाव्या. आपल्या घरात दररोज सकाळी व संध्याकाळी केला तर उत्तम होईल. या उपायामुळे तुमच्या घरात शांतता नांदेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या नारळावरील ज्योत आहे तो पर्यंत मनातल्या मनात “श्री स्वामी समर्थ” हा जप श्रद्धेने करावा. ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे, हा विधी मुले व्यक्तीच्या मनातील नैराश्य कमी होऊन मन स्थिर होते व विवेक बुद्धी जागृत होते.

एखादी अडचण व समस्या असेल तर हि विधी केल्याने हि समस्या सोडवण्यासाठी उत्तर मिळण्यास मदत होते. आता हा नारळ आपण प्रत्येक पौर्णिमेला व अमावसेला बदलून घ्यावा. जो जुना नारळ असेल त्याचा घरी प्रसाद करून खावा. हा जुना नारळ जर खराब निघाला तर तो सरळ प्रवाहात विसर्जित करावा.

हा उपाय करण्याअगोदर स्वामींची नित्य सेवा, जप करून श्रद्धेने केला तर नक्कीच याच फळ तुम्हाला मिळेल. हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबात एकमेकांची काळजी घ्या. एकमेकांच्या मताचा आदर करा. त्यामुळे निम्मे प्रश्न आपोआप सुटतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *