घरात या ठिकाणी जाळा कापूर… घरी सांभाळता येणार नाही एवढा पैसा येईल…

नमस्कार मित्रांनो,

वर्षातील कोणत्याही दिवशी सायंकाळी आपण हा उपाय करू शकता. अचानक धनप्राप्तीसाठी अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे. हा उपाय जी व्यक्ती विश्वासाने करते त्या व्यक्तीला या उपायांचा लाभ होतो.

हा उपाय आपल्याला आपल्या घरात, वास्तूत करायचा आहे. ह्या उपायासाठी जी सामग्री लागेल त्यातील महत्वाची गोष्ट आहे कापूर. साधारण 2 ते 3 कापराच्या वड्या लागतील. सोबतच दोन गुलाबाचे लाल रंगाचे फुल आणि दुर्गामातेचे फोटो किंवा मूर्ती असल्यास अतिउत्तम, एक छोटी वाटी आणि एक खायचे पान.

जर दुर्गामातेचा फोटो नसेल तर तो विकत आणू शकता. हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी स्नान करून एका पाटावर दुर्गामातेचा फोटो ठेऊन त्याची पूजा करून दिवा लावा. गायीच्या तुपाचा दिवा लावा.अगरबत्ती लावा. नंतर मनोभावे एक गुलाबाचे फुल वहावे.

मनोभावे हात जोडून आपल्या जीवनात अचानक धनप्राप्ती व्हावी अशी मनोमन प्रार्थना करावी. एक गुलाबाचे फुल प्लेटमध्ये ठेऊन त्यावर कापूर ठेवायचे आणि तो कापूर जाळायचा आहे.

ही सर्व प्रक्रिया दुर्गामातेच्या समोर बसून करायचे आहे. स्वतः आसनावर बसून हे करावे. कापूर जळल्यानंतर ते गुलाबाचे फुल मातेच्या चरणी अर्पण करावे. पुन्हा मातेसमोर प्रार्थना करावी.

असे उपाय करताना मनात कोणतेही नकारात्मक विचार किंवा शंकाकुशंका आणू नये. तसेच आपण अजून एक उपाय करू शकता. दुर्गामतेसमोर खायचे पान ठेवून त्यावरती गुलाबाच्या सात पाकळ्या ठेवायच्या आणि त्यावर एक बत्तासा ठेवावा.

हे पान मातेस अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी. तर हे उपाय नक्की करून पहा आपल्याला लाभ नक्कीच होईल. फक्त असेल उपाय, टोटके करताना मनोभावे, विश्वासाने करावे.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *