ज्यांना रात्री 3 ते 5 दरम्यान जाग येते, त्यांनी एकदा बघाच…

नमस्कार मित्रांनो,

खूप लोकांना रात्री 3 ते 5 च्या मध्ये सतत जाग येत असते, या वेळेत झोप मोडते, तर याचा अर्थ काय असतो? मित्रांनो हिंदू धर्मशास्त्राने पहाटे तीन ते पाच या वेळेचा अमृत वेळ असा उल्लेख केलेला आहे.

खूप ठिकाणी अगदी चुकीची आणि मनात भीती म्हणजेच आपल्या मनात भ्र म निर्माण करणारी माहिती मुद्दाम हुन पसरवली जात असते. अनेक लोकांचा असा दावा करतात की पहाटे 3 ते 5 यावेळेत जाग येणे किंवा झोप मोड होणे हे अत्यंत अशुभ असते. त्याचे अनेक दुष्प्रभाव आपल्या जीवनावर पडतात.

पण हिंदू धर्मशास्त्रात कुठेही पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे अशुभ मानलेले नाही. तर हिंदू धर्मशास्त्र हे मानतो की अनेक दैवी शक्ती या पहाटे तीन ते पाच या वेळेच्या दरम्यान या पृथ्वीतलावर सक्रिय असतात.

खूप लोक या सर्व गोष्टीना सामान्य मानतात. या वेळेमध्ये जर त्यांना जाग आली तर ही गोष्ट सर्वसामान्य मानून पुन्हा झोपी जातात. खरंतर आपण अशी प्रकारची चूक करू नका. मित्रांनो या दैवी शक्ती, पारलौ किक शक्ती आपल्याला काही महत्वपूर्ण संकेत देत असतात की जे अत्यंत असाधारण असतात. या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. या संकेतांमध्ये जे अर्थ लपलेले आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा.

कारण कोणतीही गोष्ट विनाकारण, कारणाशिवाय घडून येत नसते. असे मानले जाते कि या पारलौ किक शक्ती पहाटे तीन ते पाच या वेळेत केवळ त्याच व्यक्तींना जागवतात, त्याच व्यक्तींची झोप मोड करतात ज्यांना त्यांना आनंद प्रदान करायचा असतो.

थोडक्यात पहाटे वारंवार जर झोप मोड होत असेल तर आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आनंदाची निर्मिती होणार आहे हे अगदी त्रि काल बा धित सत्य आहे आणि म्हणून ही वेळ अशुभ नाही.

यावेळेस जाग येणे आपल्या जीवनामध्ये आनंदाचा प्रवाह निर्माण होणार आहे याचा संकेत असतो. सोबतच आपल्या घरामध्ये धनधान्यात वाढ होणार आहे याकडे या गोष्टी संकेत करत असतात.

मित्रांनो, दोन महत्त्वपूर्ण गोष्टी एक म्हणजे आपल्या जीवनात आनंदाची निर्मिती होणार आहे, आनंदप्राप्ती होणार आहे आणि सोबतच आपले घर धनधान्याने भरणार आहे याचा संकेत या अलौकिक शक्ती आपल्याला देत असतात.

आणि तुम्हाला माहीत असेलच ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांना पूर्ण दिवसाच व्यवस्थित नियोजन करता येतं. कुठेही घाई गडबड होत नाही आणि नियोजन व्यवस्थित झाल्याने प्रत्येक कामात यश मिळू लागतं.

पहाटे लवकर उठल्याने आपलं मन, आरो ग्य हे चांगलं राहतं आणि अनेक प्रकारचे धार्मिक लाभ सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. ज्या व्यक्ती पहाटे दररोज उठतात त्यांना ताजंतवानं वाटू लागतं.

निसर्गाचा लाभ सुद्धा त्यांना चांगल्याप्रकारे प्राप्त होतो आणि म्हणूनच की काय हिंदू धर्मशास्त्राने पहाटे लवकर उठणाऱ्या या लोकांना नशीबवान आणि भाग्यशाली मानलेले आहे.

तर मित्रांनो जर आपण पहाटे लवकर उठत नसाल तर ही सवय लावून घ्या आणि जर आपली वारंवार झोपमोड होत असेल तर ते अशुभ न मानता त्याचा सदुपयोग आवश्य करून घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *