नमस्कार मित्रांनो,
देवघरात देवी देवतांची जी जुनी मूर्ती झालेल्या आहेत. त्यातील एखादी मूर्ती फुटलेली असते. फोटो फाटलेला असेल तर त्याचे काय करायचे ? अनेक लोक या मुर्त्या कचाऱ्या मध्ये टाकतात. फेकून दिल्या जातात. कचरा गाडी येते. आणि मग कालांतराने त्यांच्या जीवनात समस्या उत्पन्न होतात. अशा काही बाधा होतात की त्यातून सुटणं मुश्किल आहे. हे फोटो किंवा मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा.
तुमच्या जवळ पास असे पाण्याचे स्त्रोत नसेल तर आपण पिंपळाच्या झाडाखाली जुन्या मूर्ती आणि फोटो ठेवू शकता. एखाद्या रस्त्यावर खूप रहदारी असेल. आणि त्या रस्त्याच्या बाजूला देवी देवतांचे जुने फोटो आणि मूर्ती ठेवता. तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून अशा देवी देवतांची मूर्तीची विटंबना होऊ शकते.
आणि त्याचा जो दोष आहे शेवटी आपल्याच माथी शंभर टक्के लागतो. ज्या मूर्तीची ज्या फोटोची वर्षानुवर्ष पूजा करतो. त्या मध्ये ईश्वरी अंश येतोच. मूर्ती फुटलेली असते, फोटो खराब असतो. तरी सुद्धा त्या मुर्त्या आणि फोटो मध्ये ईश्वरी अंश असतो. त्या ईश्वरी अंशाचा विटंबना होते. येणाऱ्या जाणाऱ्या आणि पशु पक्षी कडून अशा वेळी मात्र ते दोष आपल्या माथी लागते.
त्याची सुटका सहजा सहजी होत नाही. म्हणून सर्वोत्तम मार्ग असा की फाटलेले फोटो असतील तर अग्नीत सोडून द्यायचे. त्यांना अग्नी देवतेच्या स्वाधीन करा. आणि जर मुर्त्या असतील तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा. वाहत पाणी नाही तर विहीर तलाव, सरोवर तळे याठिकाणी सुद्धा विसर्जन करू शकता. धर्म शास्त्रात त्याला मान्यता दिलेली आहे.
मित्रानो एक महत्वाचा प्रश्न स्त्रियांनी मासिक धर्म मध्ये देव पूजा करावी का?जर एखादे व्रत करत आहेत सोळा सोमवार वगैरे अशा वेळी ते कसं करावं. हिंदू धर्म शास्त्रात साधक आणि साधिका यांच्यात कोणताही भेदभाव केलेला नाही. मात्र साधिकांच्या बाबतीत पाच दिवस हे जे असतात याला ऋतुकाल म्हणतात. या ऋतू काळा मध्ये साधिकेने साधना करू नये.
ती थांबवावी आणि पाच दिवस नंतर सुरू करावी. जिथे ती साधना थांबवली होती. तिथूनच ती पुन्हा सुरू करावी. त्यामुळे साधना खंडित होत नाही. शेवटचा प्रश्न घर बंद करून जाताना काही दिवसांसाठी जर घर बंद करून जात आहोत. अशा वेळी देव पूजा कारण शक्य नाही तर त्या वेळी काय करावे. कोणत्याही कारणास्तव जर आपण घर बंद करून जात असाल तर देवघरापुढे एक नारळ आणि एक रुपया ठेवा.
आणि देवा पुढे प्रार्थना करा. की आमच्या वास्तूचा आपण सांभाळ करावा. आणि आम्ही ज्या कार्यासाठी बाहेर पडतो आहे ते कार्य निर्विघ्नपणे कोणतीही बाधा अडचण न येता पर पडावं. अशी देवाजवळ प्रार्थना करा. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला करता येण्यासारखा आहे.
अजून एक प्रश्न की आजारी माणसाने देवा पूजा काही करावी. आजारी असाल तर स्त्री असो की पुरुष असो आपल्याला अंघोळ करता येत नाही. तुम्ही स्नान केले नसेल तर तुम्हाला देव पूजेचा अधिकार नसतो. अशा वेळी आपल्या घरात जी व्यक्ती देव पूजा करत असेल तर ती देव पूजा आपण पहावी. या पूजेला आतुरी पूजा अस म्हटलं आहे. दुसऱ्याने केलेली पूजा आपण पाहू शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.