जीवनाचे अंतिम सत्य मृत्यू… वाचा स्वामी समर्थांनी काय दिले उत्तर…

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थ असं सांगतात की मृ त्यू हा सर्वांचा अटळ आहे, पण आपण मृ त्यू येण्याची वेळ लांबऊ शकतो. हे सर्व आपण स्वामींनी सांगितलेल्या एका गोष्टीतून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो प्राचीन काळी एक संत एका गावाच्या बाहेर झोपडीत राहत होते. गावात व आजूबाजूच्या ठिकाणी ते प्रसिद्ध होते. त्यामुळे लोक त्यांच्याकडे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी येत होते.

अनेकदा अनोळखी लोक सुद्धा येत असतं. कधी काळी काही लोक गावाबाहेर जाण्यासाठी रस्ता विचारत असत. ते संत त्यांना समोरच्या दिशेला इशारा करून रस्ता सांगत असत.

काही लोक एखादा दुसरा रस्ता नाही का, असेही विचारत. पण हे संत सांगायचे गावामध्ये जाण्याचा हाच एक रस्ता आहे. लोक संतांनी सांगितलेल्या रस्त्याने गेल्यानंतर ते स्म शानात पोहोचत असत.

त्यानंतर लोकांना या संतांचा खूप राग यायचा. काही लोक संतांना शि व्या पण द्यायचे. काही लोक काहीही न बोलता दुसरा रस्ता पकडत. एके दिवशी एका यात्रेकरु सोबत असेच झाले.

त्याला संताचा खूप राग आला, रागात असलेला यात्री संतासोबत बोलायला आला. संताला त्या यात्रेकरूने विचारले की मला चुकीचा रास्ता का दाखवला? त्याने संताना खूप वाईट शब्द वापरले. बोलता बोलता यात्री थकून गेला आणि शांत झाला.

त्यानंतर संताने बोलणे सुरू केले. संत म्हणाले का रे बाबा स्म शान वस्ती नाही का? तुम्ही लोक ज्याला वस्ती म्हणता तिकडे रोज कोणा न कोणाचा मृ त्यू होतो. लोकांचे येणे जाणे सुरू राहते. परंतु स्म शानाच्या वस्तीमध्ये एकदा जो येतो तो मग कुठेही जात नाही.

ही सुद्धा एक वस्तीच आहे. माझ्या दृष्टीने हीच वस्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचे अं तिम स्थान हेच असून सर्वाना इथेच यायचे आहे. यामुळे आपण चुकीच्या कामापासून दूर राहावे या कारणा मुळे तुला मी हा रस्ता सांगितला.

या गोष्टी ऐकून यात्री नतम स्तक झाला आणि आपल्या घरी निघून गेला. मित्रानो या कथेतून हीच शिकवण मिळते की जीवनाचे अं तिम सत्य हे मृ त्यू असून ज न्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृ त्यू हा निश्चित आहे.

मित्रांनो या कथेमधून संतांनी हाच संदेश दिला आहे की, सर्व लोकांनी अं तिम सत्य लक्षात ठेवून काम केले तरच वाईट गोष्टींपासून दूर राहू शकतो.

आपण स्वामी समर्थांकडे प्रार्थना करू व सुख शांतीने आयुष्य घालवू. धन्यवाद.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *