हे आहे जगातील सर्वात मोठे पाप या पापाला क्षमा नाही

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जगातील सर्वात मोठ पाप कोणत असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्हाला माहिती आहे याच उत्तर, कोणत्याही व्यक्तीसमोर पाप पुण्याच्या गोष्टी केल्या कोणतीही व्यक्ती जाणतेपणी पुण्य करण्याचंच काम निवडेल.

परंतु हे देखील सत्य आहे की, नकळत का होईना आपल्या हातून पाप घडत असतं. अनेक पुण्य करून देखील लोक एक अस महापाप करतात जे तुम्ही केलेल सर्व पुण्याचं फळ नष्ट करत. येवढेच काय तर या महापापाची कृत्याची शिक्षा या जन्मात तसंच पुढच्या जन्मात देखील आपल्याला भोगावे लागते.

या जगाच्या पसाऱ्यात विभिन्न व्यक्तिमत्वाची अनेक वेगवेगळ्या स्वभावाची विचारांची लोक असतात. जे आयुष्यभर पाप करत राहतात तर काही लोक खूप चांगले कार्य करत असतात. जे जाणून बुजून वाईट अथवा पाप करण्याचा विचार देखील करत नाहीत,

आपण बोलताना वाणीने, मनात विचाराने प्रत्यक्षात बुद्धीने निरंतर काम करत असतो. याच कामच फळ आपल्याला मिळत राहत. तर सर्वात मोठं पाप कोणतं आहे आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात या विश्वातील सगळ्यात मोठं महापाप म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या अब्रूसोबत खेळणं.

जी व्यक्ती कोणत्याही स्त्रीच्या अब्रूचा खेळ करते तो व्यक्ती या जगातील सर्वात महापापी आहे. गीतेनुसार नारीशक्ती ही एक अशी शक्ती आहे तिचा अंदाज घेणं मुश्किल आहे. स्त्रीला संसारामध्ये अतिशय पूज्य स्थान दिल गेलेल आहे. स्त्रीचा अपमान म्हणजे पूर्ण ब्रह्मांड उध्वस्त करायला तो त्या समान आहे.

संसार स्त्री प्रत्येक रुपात आपल्या बाळाचं पालन पोषण करत असते जिला आपण प्रेमाच्या भाषेत आई म्हणून ओळखतो. या विश्वाची आधीशक्ती नारी आहे. कोणत्याही स्त्रीला विनाकारण त्रास देणारी व्यक्ती करोडो पापाचे धनी बनते.

भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीतेमध्ये सांगितलेले आहे की जी व्यक्ती स्त्रियांचा आदर करते मान-सन्मान राखते ती व्यक्ती या जन्मी आणि पुढच्या जन्मी सुद्धा करोडो पुण्य प्राप्त करते. दुसरीकडे असे लोक जे स्त्रियांच्या अब्रूशी खेळतात, त्यांच्यावरती हात उगारतात, शिवीगाळ करतात,

त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य करतात तिथे त्यांच्या पुढील अनेक पिढ्या देखील पापाच्या भागीदार बनतात. म्हणून जगातील सर्वात मोठं पाप हे कोणत्याही स्त्रीचा अपमान करणे हे म्हटलं जातं. तुम्ही देखील असं करण्यापासून दूर राहा आणि सर्व स्त्रियांचे मनापासून आदर करा यातच सर्वांच भल आहे.

एखाद्या स्त्रीसाठी त्यांची अब्रू सर्व काही असते तिची लाज ही तीच प्राण असतात. स्त्री विना ही सृष्टी शून्यवत आहे. महाभारतातील कथेनुसार अंधः धृतराष्ट्र भीष्म पितामह तसेच दुशासन, दुर्योधन याचा शेवट कसा झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून चुकूनही कोणत्याही स्त्रीच्या अब्रूचा अपमान करू नका.

कृतीने विचाराने अथवा मनाने कोणत्याही स्त्रीला दुखवू नका. जगाला उद्गात्व कष्ट यातना सहन करून जन्म देणारी ती माऊली असते. स्त्रीच अस्तित्व खुद्द त्रिदेवांनी देखील मान्य करून सृष्टीच्या कार्यात आणि मान सन्मानाता समान दर्जा तिला दिलेला आहे. आपण तर साधी माणसे आहोत तेव्हा अस महापाप चुकूनही करू नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *