मराठीतून सांगितलेलं कळत नाही..’; रिंकू राजगुरुचा डायलॉग म्हणताना Jacqueline Fernandez चा Video Viral

Attack Movie: ‘मराठीतून सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू का?’ हा अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिचा गाजलेला डायलॉग म्हणताना जॅकलिन पाहायला मिळाली. यावेळी तिचं अस्खलित मराठी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.


मुंबई, 04 एप्रिल: अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग स्टारर ‘अ‍ॅटॅक’ (John Abraham, Jacqueline Fernandez, Rakul Preet Singh Attack) हा सिनेमा 1 एप्रिल रोजी शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या सिनेमाची स्टारकास्ट विविध प्लॅटफॉर्म्सवर ‘अ‍ॅटॅक’चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या मुव्हीतील अभिनेत्री जॅकलिन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Jacqueline Fernandez Marathi Dialogue) व्हायरल होतो आहे.

ज्यामध्ये ही ‘श्रीलंकन ब्युटी’ चक्क मराठीत डायलॉग म्हणताना दिसत आहे. ‘मराठीतून सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू का?’ हा अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिचा गाजलेला डायलॉग म्हणताना जॅकलिन पाहायला मिळाली. यावेळी तिचं अस्खलित मराठी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

तर हा व्हिडीओ ‘अ‍ॅटॅक’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. लाइव्ह इव्हेंट्समध्ये, रिअ‍ॅलिटी शोमध्ये तसंच सोशल मीडियावर ही टीम सिनेमाचे प्रमोशन करते आहे. या सिनेमाच्या नायिका जॅकलिन आणि रकुल इन्स्टाग्रामवरील कंटेट क्रिएटर्सस देखील व्हिडीओ बनवताना दिसल्या आहेत. जॅकलिनचा हा ‘मराठी स्पेशल’ व्हिडीओ Focusindian अर्थात करण सोनावणे या कंटेट क्रिएटरने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर केला आहे. ज्यामध्ये जॅकलिन, रकुल आणि करण यांनी एका इन्स्टाग्राम ट्रेंडवर विनोदी व्हिडीओ बनवला आहे.

चक्क जॅकलिनला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याने या कंटेट क्रिएटरचं अनेकजण कौतुक करत आहेत. ‘फक्त तूच बॉलिवूड स्टार्सना मराठीत बोलायला लावू शकतोस’, अशा कमेंट्स या व्हिडीओवर अनेकांनी केल्या आहेत. करण सोनावणे या कंटेट क्रिएटरने याआधी जॉन अब्राहम, विद्या बालन, आलिया भट्ट, परेश रावल, राहुल देशपांडे, राजकुमार राव, भूमि पेडणेकर या कलाकारांसह देखील रील्स बनवले आहे. शिवाय यापैकी अनेकांना त्याने मराठीत बोलण्यासही भाग पाडले आहे.

दरम्यान Attack या सिनेमामध्ये सुपर सोल्जरची कहाणी दाखवण्यात आली आहे, जो एकटाच संपूर्ण सैन्याला हरवू शकतो. दरम्यान प्रेक्षकांनी मात्र या सिनेमाकडे पहिल्या तीन-चार दिवसांतच पाठ फिरवल्याचे दिसून आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धीम्या गतीने सुरुवात केली आहे. ‘अ‍ॅटॅक’ या सिनेमाचा सामना SS राजामौली दिग्दर्शित RRR सिनेमाशी आहे आणि निश्चितच यामध्ये आरआरआर जिंकताना दिसत आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *