नमस्कार मित्रांनो,
मित्रानो बऱ्याचशा स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातात हिरव्या बांगड्या घालतात. तसेच बऱ्याचशा स्त्रिया हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसतात. यापाठीमागे काही कारणे आहेत का? हिंदू धर्म शास्त्र या विषयी नेमक काय सांगत हे आपण पाहणार आहोत. पहिली महत्वाची गोष्ट ज्या स्त्रिया लग्नानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात.
त्यांच्या सौभाग्य मध्ये वाढ होते. म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. अस धर्म शास्त्र मानत. आणि म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्या. हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसायला हवी. केवळ पतीच आयुष्य वाढते इतकचं नव्हे. तर पतीचं आणि त्यांच्या सासरच नशीब सुद्धा उजळते. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे.
ती म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठी जो आशीर्वाद आहे तो निसर्ग देवतेकडून आपणास मिळत असतो. लक्षात घ्या हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा अगदी जवळचा संबंध आहे. आणि आपण जेव्हा अशा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालता हिरव्या रंगाची साडी नेसता त्यावेळी आपल आणि निसर्गाचं एक नात जोडलं जातं.
आणि म्हणून निसर्गाकडून आपणास आपला पती सुरक्षित रहावा. आपल सौभाग्य सुरक्षित राहावं. अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो. ज्या लोकांना करियर आणि उद्योग व्यवसाय मध्ये प्रगती करायची आहे. अशा घरातील स्त्रियानी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्या कारण हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतीक आहे.
करिअर मध्ये उद्योग धंदा मध्ये यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे. कारण बुधाच सबंध हा व्यापराशी येतो. आणि म्हणून तुम्हाला जर बुध ग्रह ला प्रसन्न करायचं असेल तर आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायला हवी. अजून एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालता.
त्यावेळी भगवान शिव शंकर आपल्यावर प्रसन्न होतात. शिव शंकर आणि निसर्गाचं खूप जवळच नात आहे. विशेष करून श्रावण महिन्यात आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली अशा स्त्रियांवर भगवान शिव शंकराची कृपा बरसते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्री हरी विष्णू ची कृपा सुद्धा आपल्यावर होते.
जर आपल्या वैवाहिक जीवनात अडी अडचणी असतील पती पत्नी मध्ये सौख्य नसेल वाद विवाद होत असतील तर अशा वेळी आपण आपल्या घराचा आग्नेय कोपरा आहे. ती जर आपण हिरव्या रंगाने रंगवला. तर आपल्या वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण होऊ शकते. पती पत्नी मध्ये प्रेम वाढावं यासाठी हा उपाय करू शकता. हिरवी साडी का घालावी? हिरव्या बांगड्या का घालाव्या? याबद्दल आपल्याला माहिती समजली असेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.