या वृक्षाचे एक पान जवळ ठेवा सर्व कामे पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छित कार्यात यश येईल. आणि जर आपल्या घरामध्ये कलहाचे वातावरण निर्माण झाले असेल घरातील सदस्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या संबंधांना कटुता निर्माण झाली असेल. घरात अशांतता असेल तर या गोष्टींचे निवारण होईल. मित्रांनो आपण सर्व जण काम करतो. धनही कमावतो. कारण आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी.

आपल्या घरात आनंदाचे वातावरण असावे. आपल्या घरातील प्रत्येक सदस्य सुखी आणि समाधानी असावा. परंतु मित्रांनो असे घडले नाही तर आपल्या कडे सर्व काही आहे. पण घरात वारंवार भांडणे होत असतील. घरातील वातावरण दूषित झाले असेल व त्यामुळे एकमेकांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला असेल. मुलांचे वडिलांशी पटत नसेल, सासूचे सूनेशी पटत नसेल किंवा पती पत्नी मध्ये सतत भांडण होत असेल, घरात मुले सतत भांडत असतील.

कुटुंब प्रमुखाचे लक्ष्य त्याच्या कामात लागत नाही. आपल्या उद्देशाला कमजोर करतात. आपल्या प्रगतीला आळा घालतात. अशा गोष्टींमुळे आपली मानसिक अवस्था उकरून जाते. सततच्या चिडचिड पणामुळे कामात चुका होऊ लागतात. आपला परिवार अस्थव्यस्थ असेल तर आपले जीवन सुखी होणार नाही. आपण आपल्या कामावरून दमून येता तेव्हा आपल्याला घरातील वातावरण क्लेशने भरलेले पाहायला मिळते.

त्यामुळे आपण सुखी राहणार नाही. आपल्या असे वाटायला लागते की घरातून बाहेर निघून जावे. असे का होते आपल्याकडे सर्व काही आहे. आपल्याकडे मानसिक सुख का नाही? मानसिक सुख हे जीवनाचा आधार आहे. ज्याला जीवनात पारिवारिक सुख मिळते. त्याच्या घरात धनाची वृद्धी निरंतर राहते. आणि हे येणारे धन हे सात्विक प्रकारचे धन येते. अशा धनाला कोणाची नजर लागत नाही. आपले पारिवारिक संबंध चांगले असणे, मधुर असणे हे महत्वाचे असते.

या सर्व समस्यांवर प्राचीन उपाय आम्ही सांगणार आहोत. उपायमुळे आपल्या घरातील वातावरण शांत तर होईलच पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या कामात पूर्ण यश मिळेल. मित्रानो आपल्या सर्वांना बेलपत्र माहीत आहे. जे बेलपत्र शिवलिंगावर वाहतात. या बेलपत्रचा आपण विशिष्ट अशा विधीने उपयोग करायचा आहे. की ज्यामुळे आपल्या सर्व समस्यांचे निवारण होईल. आपणही शिवलिंगावर बेलपत्र जरूर वाहत असाल.

बेलपत्र हे खास अशा प्रकारचे पान असते. या बेलपत्रच्या पानांना विशेष विधी करून जर का ते आपल्याजवळ ठेवलं आपल्या घरातील तिजोरीत ठेवलं गाडीमध्ये ठेवलं याची स्थापना आपल्या घरात केल्याने याच्या प्रभावाने आश्चर्यकारक बदलाव अनुभवायला मिळतात. आज या बेलपत्राचा असा उपयोग पाहणार आहोत की याचे उपाय केल्याने चमत्कारिक फायदे अनुभवाल यासाठी काय करायचे आहे.

सैल, ढिले कपडे घालून घरातील देवाऱ्या जवळ किंवा कुठेही जिथे तुम्हाला एकांत मिळेल. अशा जागी बसायचे आहे. अशा रूम मध्ये बसायचे आहे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्ची किंवा सोफ्यावर बसू शकता. त्यानंतर शूक्रि मुद्रा करायची आहे. शूक्रि मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर सरळ ठेवावे. आपले तळहात आकाशाच्या दिशे ला असतील असे. यानंतर हाताची पाची बोटं एकत्र जुळवावी.

म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदका सारखा होईल. याला वराहि मुद्रा असेही म्हणतात. शूक्रि मुद्रा करून शांत बसायचे आहे. नंतर दहा वेळा प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा. जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा. आणि मग सावकाश हळु हळु सोडायचा आहे. अशा प्रकारे दहा वेळा श्वासोच्छ्वास करावे. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते.

<
यानंतर आपल्या समोर एक लाल रंगाचे कापड अंथरावे. त्यावर एक प्लेट ठेवून त्या मध्ये चार ते पाच बेलपत्र ठेवायचे आहेत. आपल्या गरजेनुसार आपल्याला हवे तितके बेलपत्र घेवू शकता. ही प्लेट देखील आपण कसलीही घेवू शकता. पितळेची, तांब्याची किंवा स्टीलची घेवू शकता. या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आहे. !! ह्रोउम् !! या मंत्राचा उच्चार करायचा आहे. शिवशंकर यांचा हा बीज मंत्र आहे. भगवान शिव शंकर हे गृहस्थ जीवनाचे देवता मानले जातात.

आपण या मंत्राचा उच्चार दोन पद्धतीने करू शकता. आपण याला मकार लावू शकता. किंवा गकार लावू शकता. जसे आपल्याला जमेल त्या पद्धतीने या मंत्राचा जप करा. जितका आपल्याला जमेल तितका जप करायचा आहे. ह्रोउम् , ह्रोउम् , ह्रोउम् असा जप करायचा आहे. एक माळ दोन माळ तीन माळ पण कमीत कमी एक माळ होईल म्हणजे अकाशे आठ वेळा तरी आपण या मंत्राचा जप करावा.

जप करण्यासाठी माळ घेण्याची आवश्यकता नाही आहे. आपण फक्त शूक्रि मुद्रा करून बसावे. आणि या मंत्राचा जप करावा. ह्रोउम् , ह्रोउम् अशा प्रकारे अकशे आठ वेळा तरी जप करावा. मंत्र जप करून झाल्यानंतर एखाद्या व्यक्ती ला फळ किंवा भोजनाचे दान करावे. त्या दिवशी करू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी करावे. पण पैशांचे दान करू नये. हा फक्त एकच दिवसाचा प्रयोग आहे.

तर हा उपाय आपण कोणत्याही सोमवारी किंवा कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला करू शकता. कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला छोटी शिवरात्री मानली जाते. हा उपाय करून झाल्यानंतर त्या उपयमधील जी बेलपत्र आहेत त्यातील एक बेलपत्र आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकता. एक बेलपत्र आपण आपल्या हिशोबाच्या डायरीत ठेवू शकता.

अशा प्रकारे जिथे आपल्याला वाटते तिथे आपण हे बेलपत्र ठेवावे. एक बेलपत्र हवं तर आपण आपल्या ऑफिस मध्ये ठेवू शकता. एक बेलपत्र आपण आपल्या पाकिटात ठेवू शकता. अशा प्रकारे बेलपत्र ठेवावे. व सर्व ठिकाणी बेलपत्र ठेवून झाल्यावर उरलेली बेलपत्र आपण आपल्या देवाऱ्यात ठेवावे. उघड्यावर ठेवू शकत नसाल तर एखाद्या लिफाफ्यात घालून ठेवू शकता. आणि जेव्हा कामासाठी बाहेर जाणार असाल तर तेव्हा या बेलपत्राना नमस्कार करून जावे.

या बेलापत्रची खास गोष्ट अशी आहे की ज्या घरात हे बेलपत्र असतात त्या घरात क्लेश दूर राहतात. नकारात्मक ऊर्जा दूर राहते. कोणत्याही प्रकारची नजर या बेलापत्रचे अशा प्रकारे विधीने दूर राहते. मित्रानो हे बेलपत्र आपल्या जीवना ला सर्व प्रकारे परिवर्तित करून टाकते. आपल्या मध्ये एक प्रकारची संयमी शक्ती येते, शांती येते. एखादा विवाद आपल्या समोर आला तर त्या विवादला आपण सहज पद्धतीने घेतो.

त्यामुळे तणाव निर्माण होत नाही. वाद वाढत नाही. घरात शांतीचे वातावरण राहते. घरातील इतर सदस्यही अशा पद्धतीने वागायला लागतात. व त्यांचे जीवन सुखमय बनून जाते. मित्रानो हा फारच अचूक उपाय आहे. आपल्याला जीवनात याचा अत्याधिक लाभ मिळेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *