नमस्कार मित्रांनो,
रोज सकाळी काहीही न खाता विड्याचे पान किंवा खाण्याचे पान असतं ते खाल्लं की त्या पानाचे शरीराला असे फायदे होतात जे चमत्कारापेक्षाही खूप मोठे आहे. कारण याच्या आयुर्वेदिक फायद्यामुळे 148 प्रकारचे आजार पूर्णपणे शरीरातून निघून जातात.
बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की हे पान खाणे, याचे सेवन करणे वाईट असते आणि ते एका अर्थाने बरोबर ही आहे. मात्र हे पान वाईट नसून त्यामध्ये वापरले जाणारे जे मसाले असतात ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात.
परंतु नुसते विड्याचे पान शरीराला खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्ये या पानाचा अतिशय महत्त्वाचा उपयोग दिलेला आहे. जे श 148 आजार आपल्या शरीराला होत असतात ते हार्मोनल इमबॅलन्समुळे होत असतात.
म्हणजे तुमच्या शरीरात जर हार्मोनल बॅलेन्स व्यवस्थित नसेल तर तुम्हाला वात, कफ, पित्त हे जे तीन दोष आहेत आणि त्यामुळे जे उद्भवणारे आजार आहेत ते न होण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला उपाय करायचा आहे.
यासाठी तुम्हाला एक साधे विड्याचे पान घ्यायचे आहे आणि त्यावर एक चमचा मध टाकून हे पान सकाळी उठल्याबरोबर तोंड धुऊन खायचे आहे. फक्त हे पान उपाशीपोटी खायचे आहे आणि त्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये.
हे पान तुम्हाला बारीक चावून खायचे आहे. यामध्ये दुसरी कोणतेही गोष्ट टाकायची नाही. यामुळे शरीरातील सर्व हार्मोन्स बॅलेन्स होतात. आणखी एक फायदा याचा होतो की चेहऱ्यावर तेज निर्माण होते. ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
त्याचप्रमाणे रक्त शुद्ध होते आणि यामुळे एलर्जी सारखे आजार नष्ट होतात. ज्यांना पचन संस्थेशी निगडित आजार आहेत. अन्न व्यवस्थित पचत नसेल, छातीत जळजळ होत असेल, पोटामध्ये गॅस होत असेल तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त पान खायचे आहे.
हे जर तुम्ही तीन दिवस केले तर लगेचच तुम्हाला फरक जाणवू लागेल. यामुळे तुमची पचन संस्था नीट होऊन छातीत होणारी जळजळ, पोटात होणारा गॅस या समस्यांपासून तुमची सुटका होईल.
जर तुम्हाला कंबरदुखी, मान दुखीचा त्रास होत असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या कुठलाही त्रास असेल तर एक पान घेऊन त्यावर खायचा चुना जरासा घेऊन तीन दिवस या पद्धतीने पान सकाळी अनशापोटी खायचे आहे.
यामुळेच सांध्यावर आलेली सूज पूर्णपणे निघून जाते. शरीरामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागते व कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे आजार होतात ते होत नाहीत.
ज्यांना सतत खोकला होतो, कफ जास्त होतो यासाठी एक विड्याचे पान घेऊन त्यावर एक चमचा ओवा घेऊन हे पण हळूहळू चावून खायचा आहे. हा उपाय पाच वर्षांवरील मुलांसाठी सुद्धा करता येतो. मात्र यासाठी ओव्याचे प्रमाण थोडे कमी घ्यावे.
यामुळे शरीरामधील कफ जळून जाऊन खोकल्याचा त्रास निघून जातो. हिवाळ्यामध्ये औषधाने बरा न होणारा खोकला या साध्या उपायाने बरा होतो. अतिशय साधा व सोपा उपाय आहे.
अशाप्रकारे विड्याच्या पानाचा उपयोग करा आणि हार्मोनल इमबॅलेन्स त्याचप्रमाणे वात, कफ आणि पित्ता पासून होणाऱ्या त्रासांपासून दूर राहण्यासाठी वेड्याचे पान आणि मध यांचे सेवन उपाशी पोटी करा.
हा अत्यंत साधा उपाय तुम्ही नक्की करा. तुमची तब्येत नक्की सुधारेल. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.