नमस्कार मित्रानो
या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी मृत्यूला सामोरं जावंच लागणार आहे. हा मृत्यू कधी होईल कसा होईल हे सांगणे महाकठीण आहे. कदाचित हे सांगणं कुणालाही शक्य होणार नाही , मात्र काही लक्षणे अशी सांगता येतात की ज्यावरून हे समजतं की एखादी व्यक्ती हि किती कालावधी नंतर मरण पावणार आहे.
मित्रांनो मृत्यू समोर दिसत असताना जी लक्षणे दिसतात ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिलं लक्षण म्हणजे मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीला त्याचं नाक दिसत नाही.
मित्रांनो तुम्ही बारकाईने पाहा तुम्हाला तुमचं नाक दिसेल. मात्र ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला असतो त्या व्यक्तीला आपलं नाक दिसणं कमी कमी होऊ लागतं याचं कारण असं की त्यांचे डोळे हे मृत्यू जवळ आल्यानंतर वरच्या बाजूला जातात.
दुसरं लक्षण म्हणजे चंद्रामध्ये चीर दिसणे. ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला असतो त्याला चंद्रामध्ये चीर दिसते किंवा चंद्राचे तुकडे झालेले दिसतात. ज्यावेळी आपण कानामध्ये बोटे घालतो त्या वेळी आपल्याला आजूबाजूचा आवाज ऐकायला येत नाही किंवा कमी ऐकायला येतो.
मात्र ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला असतो त्याला कानात बोटं न घालता सुद्धा आपल्या आजूबाजूला भयान शांतता असल्याची जाणीव होते. ज्या व्यक्तीला आपली सावली दिसत नाही किंवा ज्या व्यक्तीला तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा दिसत नाही अशा व्यक्तीने समजून जावं की त्याचा मृत्यू काळ जवळ आलेला आहे.
आपले पूर्वज आपल्या बरोबर आहेत असा भास जर आपल्याला होत असेल , एखादा आत्मा आपल्या आसपास वावरत आहे असा भास जर आपल्याला होत असेल तर समजून जा की मृत्यु देवता आपल्या समीप आलेली आहे.
ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो त्याच्या शरीराचा एक विचित्र वास येतो त्याला मृत्यूगंध अस म्हणतात. मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीला आरशामध्ये स्वतः च चित्र न दिसता दुसर्याच कुणाचीतरी प्रतिमा दिसते. मित्रांनो जर असं झालं तर अशा व्यक्तीचा मृत्यू 24 तासांमध्ये होणार आहे हे स्पष्ट असत.
भगवान शिव सांगतात की ज्या व्यक्तीचे शरीर पिवळे , सफेद किंवा फिकट लाल रंगाचं पडेल त्या व्यक्तीचा मृत्यू येत्या सहा महिन्यांमध्ये नक्की होणार. मृत्यू जवळ आल्यानंतर नाक , तोंड आणि जीभ हे दगडासारखे कठीण बनतात.
चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश पाहण्यास ती व्यक्ती असमर्थ ठरते. मित्रानो अशा व्यक्तीला आपल्या आजूबाजूला सर्वत्र आग लागल्याचा भ्रम निर्माण होतो. त्या व्यक्तीच्या दात आणि हिरड्यांतून पस निघण्यास सुरवात होते.
ध्रुवतारा प्रत्येक व्यक्तीला अगदी सहज पाहता येतो. आकाशात सहज दिसून येणारा तारा म्हणजे ध्रुवतारा. मात्र ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला असतो त्या व्यक्तीला हा ध्रुव तारा दिसत नाही. त्या व्यक्तीला आकाश भडक लाल रंगाचं दिसू लागत.
जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात घुबड किंवा उजाडलेलं गाव येत असेल तर अशा व्यक्तीने समजून जावं कि येत्या सहा महिन्यात आपला मृत्यू निश्चित आहे. तर मित्रानो हि होती काही लक्षण कि ज्यावरून व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे हि गोष्ट लक्षात येते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.