नमस्कार मित्रांनो,
आज पर्यंत याचा वाईट अनुभव हजारो लोकांनी घेतलेला आहे. मित्रानो काहीही झालं तरी ही तीन झाड आपल्या घरात किंवा अंगणात चुकूनही लावू नका. ही तीन झाड घरात बरबादी आणतात. माता लक्ष्मी आपल्या घरातून उलट्या पावलांनी निघून जाते. मित्रानो धनप्राप्ती साठी आपण माता लक्ष्मी ची पूजा करत असाल. काही झाड सुद्धा माता लक्ष्मी स अत्यंत प्रिय असतात. जसे की तुळस, मनी प्लांट, केळीच रोपट हे झाड माता लक्ष्मी स अतिशय प्रिय आहेत. आणि ही झाड लावल्याने आपल्या घराची प्रगती होते.
वास्तु शास्त्रानुसार काही झाडे मात्र अत्यंत अशुभ असतात. ही झाडे आपल्या घरा भोवती घरा घरात नकारात्मक वातावरण निर्माण करतात. परिणामी आपल्या घरात पैसा टिकत नाही. हळू हळू गरिबी आणि दारिद्र्य निर्माण होत. काही झाडांच्या बाबतीत ही झाड भूत आणि प्रेत यांचं निवासस्थान मानली जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांच्या अवती भवती भूत प्रेत यांचा वावर असतो. अशा अनेक कथा ऐकावयास मिळतात. जाणून घेऊया ही तीन झाड कोणती आहेत.
१. चिंचेचं झाड – चिंचेचं नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र मित्रानो चिंचेचं झाड आपल्या घरात किंवा अंगणात चुकूनही लावू नका. कारण भल्याभल्यां च्या तोंडच पाणी या चिंचेच्या झाडाने पळवलेले आहे. वास्तु शास्त्रानुसार हे झाड अत्यंत अशुभ मानलं जात. चिंचेचं झाड हे नकारात्मकता चे प्रतीक आहे. हे झाड ज्या घरामध्ये किंवा घरासमोर असते. त्या घरात गरिबी निरंतर वास करते.
हे झाड वाईट शक्ती ना आकर्षित करतं. विशेषत रात्रीच्या वेळी या झाडावर भूत प्रेतांचा वास असतो. त्यासंबंधीच्या अनेक रोचक कथा सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या घरासमोर चिंचेचं झाड असतं त्या घराची प्रगती थांबते. त्या घरातील लोकांनी कितीही प्रयत्न करू द्या. त्यांची प्रगती होत नाही.
२. नागफनी – मित्रानो हे झाड केवळ हे झाड वाळवंटात आढळत असे. आजकाल हे झाड फॅशनच्या नावाखाली हे झाड लावण्याची प्रथा निर्माण झाली आहे. नागफणी चे झाड ज्या घरात असेल किंवा घरासमोर असेल त्या घरात अशांतीच वातावरण निर्माण होत. त्या घरातील लोक विनाकारण क्षुल्लक कारणावरून भांडू लागतात. अनेक जणांनी तर हे झाड लावल्यापासून दुर्घटना वाढल्याच प्रमाण नमूद केलेले आहे. हे झाड लावल्याने घरातील लोक वारंवार आजारी पडतात. थोडक्यात काय तर त्या घराची प्रगती थांबते. त्या घरात सुख नावालाही उरत नाही.
३. बोराच झाड – चिंचे प्रमाणेच बोराच्या झाडावर सुद्धा भूत प्रेत यांचं वावर मान्य करण्यात आलेला आहे. त्या संबंधीच्या अनेक कथा आपणास ऐकावयास मिळतील. नकारात्मक शक्तीचा मोठा वास या बोराच्या झाडावर असतो. आणि म्हणूनच हे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मित्रानो मोठमोठ्या दुर्घटना घडू लागतात. आणि त्या घरात माता लक्ष्मी कधीच राहत नाही.
विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो. पैशांची बचत होत नाही. आणि तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात. म्हणून हे झाड सुद्धा आपण आपल्या घरात आणि अंगणात लावू नये. सुकलेली कोणतीही झाड ही नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात. म्हणून अशी झाडही आपण आपल्या आजूबाजूला लावू नयेत. किंवा ती असू देऊ नयेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.