जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देते, तुमचे मन दुखावते, तेव्हा ही एक गोष्ट करा. पुन्हा कधीच त्रास होणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे नाती. आपल्या एकदम जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावते, आपल्याला त्रास देते. तेव्हा काय करायचे?

जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपले मन दुखवते त्यावेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात एकतर सहन करणे किंवा बोलून टाकणे. पण दुर्भाग्य असे की आपण बऱ्याच वेळा गोष्टी सहन करत असतो. कारण आपल्याला भीती असते की मी जर समोरच्याला काही बोललो किंवा बोलले तर आपले नाते तुटणार तर नाही ना?

आमचे संबंध तर बिघडणार नाही ना? समोरचा माझ्यावर रागवेल त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करत राहतो. आपल्याला वाटते समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल. आणि तो बदलेल. तो एक दिवस मला समजून घेईल. चांगले दिवस येतील पण चांगले दिवस काही येत नाहीत मात्र सहन करून करून आपला त्रास वाढत जातो.

आणि परिस्थिती चिघळत जाते. मित्रानो असे का होते? याचे कारण म्हणजे ज्यावेळी आपण गोष्टी सहन करत जातो त्यावेळेस आपण समोरच्याला एक संधीच देत असतो. की तुम्ही असेच वागत जा. आम्ही सहन करत जाऊ. तुम्ही तुमची वाईट वागणूक चालू ठेवा.

आम्ही सहन करणे चालू ठेवतो. पण प्रत्येकाची सहन करायची एक क्षमता असते. कोणाची थोडी असते कोणाची जास्त असते. पण एक दिवस सहनशक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात. आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो. समोरच्याची वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते.

आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही. पण मित्रानो जेव्हा आपण सहन करायच्या ऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो तेव्हा तुम्हाला स्वतः बद्दल आदर आहे हे सिद्ध होते. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात आणि तुमचा एक कामगार रोज उशिरा कामावर येतो.

तेव्हा तुम्ही बोलत नाही सहन करत राहता. तेव्हा तुम्ही कामगाराला संदेश देत असता की, तुमच्या कंपनीत उशिरा आलेले चालते. आणि मग सहन केल्यामुळे समोरचा कामगार जास्त उशीर करायला लागतो. आणि वैतागून शेवटी तुम्हाला त्याला कामावरून काढावे लागते.

पण ज्यावेळेस त्याला तुम्ही बोलता की आपल्या कंपनी मध्ये सगळे वेळेवर येतात तू सुद्धा आले पाहिजे. तेव्हा कामगाराला समजते आणि तो वेळेवर यायला सुरुवात करतो. आणि तुमचे नुकसान होत नाही. समजा तुमच्या घरासमोर कोणी कचरा टाकला.

<
आणि तुम्ही सहन करत राहिला तर लोकांना तुम्ही संदेश पाठवता की, तुमच्या घरासमोर कचरा टाकलेला चालतो. आणि मग लोक तुमच्या घरासमोर कचरा टाकत जातात. आणि तुम्ही सहन करत असल्यामुळे तुमच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग होतो. त्यामुळे वेळीच जर तुम्ही बोलून टाकाल तर ही वेळ येणार नाही.

म्हणून तुम्हाला तुमचे मन दुखण्यापासून वाचवायचे असेल तर गोष्टी सहन करण्यात नसून बोलून टाकण्यात आहे. आपण गोष्टी सहन करत राहतो आपल्याला भीती असते की, आपले संबंध बिघडणार तर नाही ना? पण सहन करणे हा पर्याय नसून बोलणे हा उपाय आहे. ज्यावेळी आपल्याला एखाद्या डॉक्टरचा गुण येत नाही तेव्हा डॉक्टरला बोलून दाखवतो.

की गुण आला नाही. आणि डॉक्टर सुद्धा लगेच त्याची ट्रीटमेंट बदलतो. पण आपण बोललो नाही तर डॉक्टर तीच ट्रीटमेंट चालू ठेवतो. आपला आजार आणखी वाढेल. आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे गोष्टी बोलून दाखवण्यात शहाणपण आहे.

म्हणून मित्रानो तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणाच्या वागणुकीमुळे, शब्दांमुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होत असेल तर आपल्याला सहन नाही करायचे बोलून दाखवायचे आहे. पण ज्यावेळी गोष्टी बोलून दाखवता त्यावेळी एक मोठी अट लागू होते.

आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्याच्या आत दडलेल्या माणसाला सांगायचे असते. ज्याला भावना माहीत आहे. एखाद्याच्या आत मधील माणूस जागा करायचा आहे. तर त्याला एकच मार्ग आहे. तो म्हणजे प्रेम आणि आदर. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे आहे की तुमची वागणूक तुमचे शब्द मला टोचतात.

त्रास देतात मला सहन होत नाही. हे सांगताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. की हा संदेश तुम्ही समोरच्याला प्रेमाने आणि आदराने सांगत आहे. कारण माणूस फक्त प्रेम आणि आदराची भाषा समजतो. काही अपवाद सोडला तर. ज्यावेळी हा संदेश तुम्ही प्रेमाने आणि सन्मानाने समोरच्याला सांगता तेव्हा तुम्ही समोरच्या बरोबर जोडले जाल.

तुमचा संदेश त्याच्यापर्यंत पोहचेल. आणि तो तुमचे ऐकेल. पण तुमच्या सांगण्यात सन्मान नसेल तर परिणाम उलटा सुद्धा होऊ शकतो. समोरच्याला तुमची किंमत असेल, तुमच्याबद्दल प्रेम असेल आणि जसे तुम्ही नात्यांना महत्व देता तसे समोरचा देत असेल तर निश्चितच तुमचे ऐकेल. आणि तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील.

म्हणजे जे काही सांगायचे ते प्रेमाने आणि आनंदाने सांगा. जेवढ्या लवकर होईल तेवढे सांगा. खात्री देतो की तुम्हाला होणारा त्रास, दुःख कमी होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *