नमस्कार मित्रांनो,
सकाळी आणि संध्याकाळी ६:३० ते ७:३० म्हणजेच साडेसहा ते साडेसात फक्त एक तास या वेळेत लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते अशा वेळी आपण आपली दार उघडी ठेवली पाहिजे. दारावरील गणपतीची, उंबाऱ्याची, तुळशीची पूजा करावी. धूप दीप लावावे. उदबत्ती लावावी. दुकान असेल, ऑफिस असेल तर देवाची पूजा आरती करून खडीसाखरे सारखा, साखरे सारखा, पेढे, गूळ खोबरे यापैकी जो असेल तो नैवेद्य आपण देवी देवतांना दाखवावा. व येणाऱ्या जाणाऱ्यास तो जरूर द्यावा.
त्याचप्रमाणे सकाळी आणि सायंकाळी साडे सहा ते साडे सात यावेळी शक्यतो खाण्याचे टाळावे. पैशांची देवघेव थांबवावी. मीठ आणि तेलासारखे पदार्थ इतरांना देऊ नये. बोलताना जपून बोलावे. कमी बोलावे. वाद विवाद होणार नाही असे बोलावे. याचबरोबर आपले केस कापू नये, नखे काढू नयेत. कपडे किंवा भांडी स्वच्छ करू नये. पैसे देताना पैश्यांची कात्री करू नये.
कोणासही जामीन राहू नका. नाहीतर आपल्यावर आरिष्ठ आल्याशिवाय राहणार नाही. कृपया महत्वाचे फोन टाळावेत. आणि या कालावधीत आपल्या कुल देवतेचे नाम स्मरण करावे. अथवा जप, जाप्या करावे. देवपूजा नंतर कपाळी गंध लावावा. घराबाहेर पडताना देवजवळचे एखादे तरी फुल स्वतः जवळ ठेवून मगच बाहेर पडावे. त्यामुळे आपले काम नक्कीच यशस्वी होतेच. हे सर्व नियम जर पाळले तर लक्ष्मीचा वास नक्की जाणवेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.