नमस्कार मित्रांनो,
सेल्फ मेड मी लेनियर आणि लेखक स्टी व्ह सी बोल्ड यांनी अनेक श्रीमंत लोकांचा अभ्यास केला. गेल्या तीस वर्षांमध्ये त्यांनी बाराशेपेक्षा जास्त कोट्याधीश आणि अब्जाधीश लोकांचे इंट रव्यूह घेतले. या संशोधनामध्ये त्यांनी प्रत्येकाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या मुलांना आर्थिक दृष्ट्या प्रगती करण्यासाठी काय शिकवता?
या कोट्याधीश अब्जाधीश लोकांकडून त्यांना जी काही उत्तरे मिळाली त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिले सिक्रेट सेल्फ मेड मिलेनियर टीच देअर किड्स, या पुस्तकामध्ये त्यांनी श्रीमंत लोक आपल्या मुलांना श्रीमंत होण्यासाठी कोणते धडे देतात हे सांगितले आहे. त्यापैकी मला आवडलेले सात महत्वाचे धडे. मला वाटते ही शिकवण जर आपण आपल्या मुलांना दिली तर त्यांना पैशाची कधीच कमी पडणार नाही चला तर मग सुरू करूयात.
पहिली शिकवण आहे. यश फुकट मिळत नाही, आयुष्यात यश आणि समृद्धी मिळवायची असेल तर जबरदस्त काम करावे लागेल. फायनान्शिअली इंडिपेंडंट होणे. म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे. आयुष्यातले सर्वात मोठे युद्ध आहे. तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल, तर बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.
जसे की झोप, विश्रांती मज्जा मस्ती करणे हे खूप अवघड आहे. कारण तुम्हाला दिसेल की तुमच्या वयाचे लोक मजा करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहे, आणि अशा वेळेस तुम्ही काम करत आहे, पण पैशाच्या बाबतीत उज्वल भविष्य हवे असेल तर तुम्हाला हे करावेच लागेल.
दुसरी गोष्ट आहे, लोकांच्या समस्या सोडवा. आणि श्रीमंत व्हा स्टीव्ह सिबॉल्ड म्हणतात तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर लोकांच्या समस्या सोडवा. तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचे असेल तर लोकांच्या मोठ्या समस्या सोडवा, श्रीमंत लोकांना माहिती असते की आपल्याकडे पैसे तेव्हाच येणार आहे जेव्हा आपण नवीन नवीन कल्पना अमलात आणून लोकांच्या समस्या सोडवू. तुम्ही बारकाईने बघा.
जगामध्ये श्रीमंतांची यादी मध्ये जे लोक आहे त्यांनी लोकांची कोणती ना कोणती समस्या सोडवली आहे. बिल गेट्स यांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम ची निर्मिती केली ज्यामुळे घराघरांमध्ये कम्प्युटर पोहोचला. फेसबुकच्या मार्क झुकरबर्गने लोकांना ऑनलाइन एकत्र आणण्याचे काम केले. ज्या वस्तू लोकांना बाहेर जाऊन आणायला लागायच्या त्या वस्तू ॲमेझॉनच्या जेफ बेसोस यांनी डायरेक्ट घरात पोहचवयाल सुरुवात केली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. गणित एकदम साधे आहे लोकांच्या मोठ्या समस्या सोडवण्याचे काम करा. लोक पैसे घेऊन तुमच्या मागे लागतील.
तिसरी आहे कामाच्या प्रेमात पडा ,कामावर प्रेम करा. तुम्ही निवडलेले करिअर तुमच्या आयुष्यातल्या सर्व स्तरांवर परिणाम करते, त्यामुळे खूप सावधगिरीने तुमच्या करिअरचा मार्ग निवडा. स्टीव्ह सीबॉल्ड म्हणतात तुमची वेळ आणि उर्जा अशा कामावर खर्च करणे, जिथे तुमचे मन लागत नाही, मूर्खपणाचे आहे. रोज सकाळी उठताना तुम्हाला कामाला जाण्यासाठी उत्साह वाटला पाहिजे.
हाच समृद्ध होण्याचा मार्ग आहे. करिअर निवडण्याचे आधी स्वतःला प्रश्न विचारा. मला असे कोणते काम करायला आवडते. ज्याचे मला पैसे नाही मिळाले तरी चालतील आणि त्या कामाची मार्केटमध्ये डिमांड आहे का? म्हणजे त्या क्षेत्रातील समजा तुम्ही करिअर निवडले तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील का सांगायचा मुद्दा करिअर निवडताना सजग राहा.
<
चौथी शिकवण आहे पैसे आयुष्यातल्या सर्व समस्या सोडवतात, श्रीमंत लोक हे मान्य करायला अजिबात कचरत नाही की पैसे आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स सोडवतात. अनेक लोकांचे म्हणणे आहे की पैसे तुम्हाला आनंदी ठेवू शकत नाही पण दुसरीकडे हेही तेवढेच खरे आहे की पैसा आयुष्यातल्या 90 टक्के समस्या सोडवतो त्यामुळे पैशाबद्दल चुकीचे विचार मनात ठेवू नका, पैशांचा आदर करा. पैशांना मित्राप्रमाणे सांभाळा. तेव्हाच तो तुमच्याकडे येईल.
पाचवा आहे मी श्रीमंत होण्यास पात्र आहे हा विचार पक्का करा. आज जे सर्वसामान्य लोक आहे त्यांची अशी समजूत असते की श्रीमंत लोक नशीबवान असतात. लकी असतात म्हणून त्यांच्याकडे पैसा जातो किंवा त्यांना असे वाटते श्रीमंत लोकं दोन नंबरचा धंदा करतात त्यामुळे आपली काही श्रीमंत होण्याची पात्रता नाही. आणि हाच विचार सर्वसामान्यांना श्रीमंत होऊ देत नाही.
मित्रांनो निसर्गाचा नियम आहे जसा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार आता तुम्ही स्वतः स्वतःला श्रीमंती साठी पात्र समजत नसाल तर तुम्ही श्रीमंत होणार ही अपेक्षा कशी ठेवता त्यामुळे आजपासून हा विचार बदला. मी श्रीमंती साठी समृद्धीसाठी पात्र आहे हे सतत स्वतःला सांगा.
सहावी आहे ह्या जगात पैसे आणि संधी मुबलक आहे. श्रीमंत लोकांना माहिती असते या जगात पैसे आणि संधी भरपूर प्रमाणात आहे कारण जसे मी सांगितले जेवढं तुम्ही लोकांच्या समस्या सोडवता तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवता आणि लोकांच्या समस्या अमर्याद आहे. त्यामुळे पैसेसुद्धा अमर्याद आहे. त्यामुळे श्रीमंत लोकांमध्ये मत्सर द्वेष फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. जेव्हा आपण हा मुबलकतेचा दृष्टिकोन ठेवतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या संधी दिसायला सुरुवात होते ज्या बाकीच्या लोकांना दिसत नाही.
सातवी आपण श्रीमंतीमुळे आपण फ्रीडम म्हणजे स्वातंत्र अनुभवतो काही लोक म्हणतात पैशाने तुम्ही आनंदी होऊशकत नाही. पण श्रीमंती मुळे आपल्याला स्वातंत्र्य अनुभवायला मिळते. आपल्याला मोकळा वेळ मिळतो आपल्याला सतत माझं कसं होणार? माझ्या परिवाराच्या कसं होणार? याची चिंता करावी लागत नाही या आर्थिक स्वातंत्र्यामुळे आपण आवडीच्या गोष्टी करू शकतो. आपणच आपले बॉस असतो. आपण कुठल्याही बंधनांमध्ये नसतो त्यामुळे स्वतंत्र अनुभवायची असेल तर आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. मित्रांनो हे होते ते सात धडे चे श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.