नवरा तुमचं ऐकत नाही का? नवरा दुसऱ्या स्त्रिच्या ताब्यात गेला आहे? हे तीन उपाय करा.

नमस्कार मित्रानो,

आज आपण जाणून घेणार आहोत असा एक उपाय की पती आपल्या पत्नीचं म्हणणं नेहमी ऐकत जाईल. आज आपण पाहतो की बरीचशी कुटुंब विखुरली जात आहेत. कुटुंबामध्ये ताण तणाव आहे पती हा वाम मार्गाला लागलेला आहे. चुकीच्या मार्गाने चालला आहे. त्याच्या पत्नीचं म्हणणं तो ऐकत नाही. त्याच्या पत्नीकडे तो दुर्लक्ष करतो. पती आणि पत्नी मध्ये तिसरी कोणतरी व्यक्ती आली आहे जर अशा प्रकारचा प्रसंग आपल्याही जीवनात आलेला असेल तर ज्या माता भगिनी आहेत त्यांनी हे तीन उपाय मी जे सांगणार आहे. त्यातील एक उपाय जरी नक्की केलात तरी आपला पती आपल्या जवळ राहील.

पहिला उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे. जर तुमच्या पतीच्या बोटात चांदीची अंगठी असेल आणि तुमच्याही हातात जर चांदीची अंगठी असेल तर तुम्ही हा उपाय करा. जर नसेल तर काळजी करू नका. मी अजून दोन उपाय सांगणार आहे. तुमच्या हातातील चांदीची अंगठी आणि तुमच्या पतीच्या हातातील चांदीची अंगठी या आपण घ्यायच्या आहेत आणि लाल दोऱ्याने घट्ट बांधायचे आहे.

बांधताना सात गाठी मारायच्या आहेत. मोजून सात गाठी मारायच्या आहेत. नंतर जी आपली सिंदुरची डबी असते ज्यात आपण कुंकू ठेवतो सौभाग्याचं लेण आपण मानतो. तर कुंकवाची डबी घ्यायची आहे. आणि या कुंकवाच्या डबीत या दोन्ही ज्या रींग्ज आहेत त्या अंगठ्या आपण सिंदुरच्या डबीत ठेवायच्या आहेत. अशी ही डबी आपल्या तिजोरीत ठेवून द्या.

हा उपाय करताना तो तुमच्या पतीला सांगून केला तरी चालेल किंवा नकळत केला तरी चालेल. असा उपाय केल्याने दिसून येईल की आपला पती जो तुमच्या पासून दूर गेला होता तो आपल्या जवळ येईल. आणि आपल म्हणणं तो ऐकू लागेल. तुमच्यातील दुरावा हा संपुष्टात येईल. असा उपाय केल्यानंतर ती अंगठी तुम्ही त्याच ठिकाणी ठेवू शकता कायमची काहीही हरकत नाही.

दुसरा उपाय आहे अतिशय सोपा उपाय आहे. आपण एक गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे. आणि आंब्याच्या झाडाची काठी किंवा काडी घ्यायची आहे. लाकूड जे असतं आंब्याच्या झाडाच त्याची काठी किंवा काडी घ्यायची आहे. गुलाबी कागदावर त्या काडीच्या मदतीने कुंकवाने ते कुंकू ओल करून घ्यायचे आहे. त्या कुंकवाने तुमचं आणि तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे.

लिहिल्यानंतर या कागदावर सात ठिकाणी थोडी थोडी चिमुटभर हळद टाकायची आहे. जराशी जास्त हळद घेवून सात गोल त्या ठिकाणी बनवायचे आहेत. हे सात गोल बनवल्यानंतर जराशी हळद त्या ठिकाणी टाकल्यानंतर तो कागद आपण दुमडायचा आहे. त्या कागदात तुमचे नाव आहे आणि हळद सुद्धा आहे. कुंकवाने तुम्ही नाव लिहिलं आहे हळद सुद्धा पसरवली आहे. असा हा कागद घडी करायचा आहे.

तुमच्या घरात भगवान विष्णू ची मूर्ती नक्की असेल किंवा श्री कृष्णाची मूर्ती नक्की असेल त्या मूर्तीच्या खाली आपण हा कागद ठेवून द्यायचा आहे. 21 दिवस हा कागद त्याच ठिकाणी ठेवायचा आहे. हे 21 दिवस विष्णूंची पूजा करायची आहे. या दरम्यान पाच दिवसाचा तुमचा जो कालावधी आलाच तर पुढे पाच दिवस हा कालावधी वाढवायचा आहे. म्हणजे 26 दिवस हा उपाय करायचा आहे.

मधले पाच दिवस तुम्ही वगळू शकता. असं केल्यावर तुम्हाला दिसेल की तुमचा पती तुमच्यावर पहिल्या सारखाच प्रेम करायला लागला आहे. किंवा त्याच जर कधीच तुमच्यावर प्रेम नव्हतं तरी प्रेम निर्माण होईल. त्याला तुमच्याविषयी आकर्षण वाटेल. 21 दिवसानंतर हा कागद काढून वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे. वाहतं पाणी नसेल तर एखाद भांड घ्या. आणि त्या भांड्यात पाणी घ्या. त्यात हा कागद तुम्ही बुडवा अतिशय साधा सोपा उपाय आहे.

<
तिसरा उपाय आहे त्यासाठी आपल्याला कपडे लागणार आहेत. कोणत्याही प्रकारचे तुमच्या पतीचे पाच वस्त्र तुम्ही घ्यायचे आहेत. पँट घेवू शकता, रुमाल घेवू शकता, बनियान घेवू शकता कोणताही वस्त्र जे तुमच्या पतीने वापरलेले आहे. तुम्ही स्वतः वापरलेल्या सात साड्या किंवा सात ड्रेस आपण घ्यायचे आहेत. तुमचे तीन वस्त्र तुम्ही खाली ठेवणार आहात तुमच्या पतीचे पाच वस्त्र वर ठेवनार आहात.

आणि त्याच्यावर तुमची उरलेली चार वस्त्र ठेवायची आहेत. लक्षात घ्या सर्वात आधी तुमची तीन वस्त्र त्याच्यावर पतीची पाच वस्त्र वर तुमची उरलेली चार वस्त्र ठेवायची आहेत. हा जो गठ्ठा आहे तो लाल कपड्यात ठेवायचा आहे. किंवा एखादी लाल ओढणी सुद्धा घेवू शकता. जिथे आपण आपले कपडे ठेवतो त्याठिकाणी कपाटात ठेवून द्यायचा आहे. उपाय संपलेला आहे. तुम्हाला दिसून येईल की तुमच्या संबंध पूर्ववत होतील. तुमच्यावर तुमचा पती पूर्वी सारखाच प्रेम करू लागेल असे हे तीन साधे सोपे उपाय तुम्ही करून पहा. नक्की तुम्हाला फरक जाणवेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *