नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो ज्योतिषशास्त्र आणि ग्रह नक्षत्रांची दिशा समजणे थोडे अवघड असते. मात्र हातांच्या रेषां वाचण्याचही एक शास्त्र असते. या पद्धतीने तुमच्या हातावरच्या रेषांचा अभ्यास आपण करू शकता. त्यामुळे आपल्याला हाताच्या रेषा केवळ भविष्याबरोबर, तुमच्या स्वभावाबाबत तसेच तुमच्या जोडीदाराशी संबंधित अनेक गोष्टी उघड होतात. तसेच धनराशी व आयुर्मान देखील उमगते.
मित्रांनो अशीच हातावर एक रेषा असते ती अर्धचंद्राची. दोन्ही हातांना जोडल्यानंतर रेषांनी बनलेला अर्धचंद्र पूर्ण दिसतो तर कधी याचा आकार समांतर, सरळ अथवा काहींचा वक्र असतो. या अर्धचंद्रावरून अनेक तारक लावले जातात. मात्र या रेषा अनेक रहस्ये उलगडतात.
याशिवाय आपल्या तळहातावरील रेषा पाहून ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ सांगता येते. ज्योतिष माहितीनुसार तळहातावरील रेषा आपले भाग्य, नियती आणि जीवनकाल सांगण्याचा प्रयत्न करतात.
मित्रांनो जर तुमच्याकडे हातावर अर्धचंद्र असल्यास त्या व्यक्ती खूप सुंदर आणि ॲक्टिव स्वभावाच्या असतात. त्याचबरोबर हे लोक आपली मैत्री कायम ठेवतात. कधीही धोका देत नाहीत. तसेच अशा व्यक्ती खूप बुद्धिमान असतात. प्रत्येक गोष्ट आठवण्याची क्षमता यांच्यात अधिक असते.
अशा व्यक्ती स्वतःहून कोणाशी बोलण्यास पाहत नाहीत कारण या व्यक्ती अत्यंत लाजाळू स्वभावचे असतात. तसेच या व्यक्ती खूप हुशार असतात व प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करतात.
मित्रांनो ज्या लोकांचे दोन्ही हात जोडूनही अर्धचंद्र होत नसेल तर अशा प्रकारच्या व्यक्ती अत्यंत शांत आणि दयाळू स्वभावाची असते. असे म्हणतात की, या लोकांना आपलं प्रत्येक काम अतिशय शांतपणे व आरामात करण्याची सवय असते. त्यामुळे या प्रकारच्या व्यक्ती अत्यंत शांत ठिकाणी जास्त राहणे पसंत करत असतात.
तसेच एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात जोडल्यास या रेषा जुळत नसतील किंवा खाली-वर तसेच वक्र असल्यास, अशा व्यक्तींना आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींबरोबर राहायला आवडते असे सांगितले जाते.
या व्यक्ती समाजाचा अजिबात विचार करीत नाहीत. हे लोक स्वतंत्रपणे जीवन जगत असतात. त्यामुळे या प्रकारच्या व्यक्ती समाजाचा जास्त प्रमाणात विचार करीत नाही. अशा प्रकारे ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या रेषा या तीन प्रकारे असल्यास या स्वभावाचे लोक साधारणपणे आपल्याला पहावयास मिळत असतात.
मित्रांनो तसेच आपल्या जीवनात ज्योतिष शास्त्राचा खुप प्रभाव असतो असे सांगितले जाते. असा हा अर्धचंद्र होत असल्यास तुम्ही भाग्यवान असता, सर्व गोष्टी इच्छेप्रमाणे होत राहतात. नेहमी आनंदी राहण्याची सवय या व्यक्तींना असते.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.