नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुमच्या प्रत्येक कामात अडथळा येत असतील. तर हा उपाय नक्की करा. मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरू ग्रह अत्यंत महत्वाचा असतो. जर गुरू दोष असेल तर या गुरू दोषांची शांती करण्यासाठी गुरूला प्रसन्न करावं लागतं. घाबरून जाऊ नका. अत्यंत साधे सोपे उपाय आम्ही या ठिकाणी सांगत असतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी गुरू ग्रह अत्यंत महत्वाचा आहे.
मुलींचे जर विवाह ठरत नसतील त्यासाठी सुद्धा गुरू महत्वाचा आहे. पुरुषांना जर जॉब, नोकरी मिळत नसेल उपजीविकेचे साधन प्राप्त होत नसेल तरी देखील गुरू ग्रह अत्यंत महत्वाचा आहे. आजचा विषय असा आहे की तुम्ही कोणतेही काम हाती घेता आणि त्यात अडचणीच अडचणी येतात. ते काम अर्धवट राहत पुन्हा डबल मेहनत तुम्हाला घ्यावी लागते.
तर लक्षात घ्या तुमच्या कुंडलीतील गुरू ग्रह हा खराब आहे. गुरू ग्रह हा धनु आणि मीन या राशींचा स्वामी ग्रह आहे. तो खर तर शुभ ग्रह आहे. परंतु कधी कधी हा गुरू ग्रह पापी ग्रहांसोबत गेला राहू असेल, केतू असेल, मंगळ असेल या ग्रहांसोबत हा गुरू ग्रह गेला. किंवा हा गुरू ग्रह जर आपल्या कुंडलीत नीच स्थानी असेल तर हा गुरू ग्रह आपल्यासाठी परेशानीच कारण ठरतो.
अशुभ फळ आपल्याला त्यामुळे प्राप्त होतात. मग यावर उपाय काय? आपल्या कामात ज्या अडचणी येतात त्या कशा दूर करता येईल. गुरूला कसं प्रसन्न करता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. गुरू जो ग्रह आहे याची जर तुम्ही पूजा केली, प्रसन्न केलत तर तुम्हाला कधी उपयश मिळणार नाही.
वारंवार जर अपयश येत तर गुरूला प्रसन्न करा. धनलाभ ज्यांना हवा आहे अशा लोकांनी सुद्धा गुरुची भक्ती करायला हवी. गुरू ग्रह हा धनाचा कारक ग्रह आहे. ज्यांचा गुरू प्रसन्न असतो. त्यांच्याकडे धन आपोआप आकर्षित होत. आर्थिक स्थिती जर उत्तम बनवायची असेल तर गुरू ग्रहाची कृपा अत्यंत महत्वाची आहे. आपण गुरुवारच्या दिवशी गुरुवार हा गुरू ग्रहाला समर्पित वार आहे.
गुरुवारच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर आपण उठायचे म्हणजे सूर्योदयापूर्वी एक ते दीड तास आधी आपण उठायचे आहे आणि उठल्यानंतर आपली नित्याची कर्म अंघोळ वगैरे आटपायची आहे. स्वतः ला शुद्ध वस्त्र परिधान करायची आहेत. आणि त्यानंतर देवघरात जाऊन भगवान विष्णुंची आपण पूजा करायची आहे पूजा करत असताना शुद्ध तुपाचा दिवा लावायला विसरू नका.
हे तूप आहे ते गावरान गाईचे देशी गायीचे असावे. नसेल तर इतर गाईचे ही चालेल. मात्र गायीचे असावे. म्हैशीच किंवा तत्सम प्राण्याचं नको. भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. आणि ही पूजा करून झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. याचा यू टुब वर व्हिडिओ मिळून जातील तुम्ही प्ले करू शकता. त्याठिकाणी मोबाईल ठेवू शकता.
अशा प्रकारे पूजा केल्यानंतर तुम्ही स्वतः ला पूजा केल्यानंतर केशर ने तिलक लावायचा आहे. हळदीने किंवा केसर ने तिलक लावायचा आहे. आणि आपल्या आई वडील आणि जे जेष्ठ व्यक्ती आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. जर तुमच्या घरात तुम्ही स्वतः च जेष्ठ असाल केवळ भगवंताचे नामस्मरण करून त्यांना वंदन करायचे आहे.
<
ज्येष्ठांचा आशीर्वाद घेवून आपण ज्येष्ठांना पिवळ्या रंगाचे वस्त्र भेट म्हणून द्यायचे आहे. आपण भगवंतांना सुद्धा हे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करू शकता. आई वडील आणि ज्येष्ठांचे रोज तुम्ही जर आशीर्वाद घेतले तर तुमचा गुरू ग्रह अत्यंत प्रबळ बनतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा उपाय करायचा आहे. भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करून घराच्या लोकांचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत.
पिवळे वस्त्र त्यांना भेट दिलेले आहेत. आता सायंकाळी आपण काय करायचे आहे. मित्रानो सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घराजवळ केलीच झाड असेल किंवा शेतामध्ये असेल तर त्या केळीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. काही हरकत नाही. एक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. आणि त्याठिकाणी प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू असतील किंवा बेसन पासून बनलेली कोणतीही मिठाई असेल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. दर्शन घ्यायचे आहे.
आणि हीच मिठाई आपण आपल्या घरातील लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना द्यायची आहे. मित्रानो इतके साधे सोपे उपाय केल्याने गुरू ग्रह प्रसन्न होतो. गुरू दोष निघून जातो. गुरुची शांती होते. कोणतंही काम असू द्या. मुलींचे विवाह जुळत नसतील पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळत नसेल कोणतीही समस्या असो, हाती घेतलेले कोणतेही काम असो. १००% यश नक्की मिळेल. मेहनतीवर विश्वास ठेवा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.