हा गुण आत्मसात करा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही.

श्री स्वामी समर्थ,

भक्त हो एक माणूस असतो. तो एवढा गरीब असतो की त्याला दोन वेळचे जेवण देखील नीट मिळत नसते. तो एका ठिकाणी बसलेला असतो. तेव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठा साधू महाराज चाललेले असतात. त्यांना बघून तो म्हणतो महाराज तुम्ही तर महान साधू दिसत आहात. माझ्या नशिबात नक्की काय लिहिले आहे?

मला दोन वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही. आयुष्यात नुसते दुःखच दुःख आहे. तेव्हा महाराज म्हणतात. ठीक आहे. आणि डोळे बंद करुन थोडी साधना करतात. आणि थोड्यावेळाने डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला म्हणतात. इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त वीस भाकरी लिहिल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही.

वीस भाकरी मिळतील त्यानंतर तू राहशील नाही राहणार. हे मी तुला सांगू शकत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहात. विज्ञान आहात. भविष्य बघता तेव्हा असे काहीतरी करा. की या वीस च्या वीस भाकरी मला आता मिळायला हवी. कारण मी आतापर्यंत कधी दोन भाकरी सुद्धा बघितल्या नाहीत. अरे तुला वीस भाकरी तर मिळून जातील.

पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही या शेवटच्या भाकरी असणार आहेत तेव्हा तो माणूस म्हणतो महाराज ठीक आहे नंतर काही नाही मिळाले तरी चालेल. पण आता वीस भाकरी मिळाल्या तर बरं होईल. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे आणि कसे तरी आपल्या शिष्यांना मदत घेऊन त्या माणसा साठी वीस भाकरींची व्यवस्था करतात. आणि सांगतात.

या तुझ्या वाट्याच्या वीस भाकरी आहेत. असे म्हणून ते महाराज निघून जातात. आणि तो माणूस भाकरी खायला सुरुवात करतो. तो खूप खुश असतो. त्याने दोन भाकरी एकसाथ खाल्या नाही त्याला एकदम वीस भाकरी मिळालेल्या असतात. मग अर्धी भाकरी खातो. मग एक खातो. मग दोन खातो. आयुष्यात त्याने एवढे जेवण कधीच केलेले नसते. दोन भाकरी खाल्यानंतर त्याचे पोट भरते.

आता पोट भरल्यावर तो विचार करतो. की या राहिलेल्या अठरा भाकरींचे मी काय करू? तेव्हा तो बघतो की त्याच्यासारखा माणूस समोरून चाललेला असतो. ती सुद्धा खायला काही मिळेल का या शोधात असतो. मग त्या दुसऱ्या माणसाला बोलतो. की आज माझ्याकडे अठरा भाकरी आहेत. त्यातल्या दोन तू घे. जसे तो दोन भाकरी त्याला देतो. तसे तो माणूस पळत जातो.

त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की आज त्या माणसाकडे भाकरी आहेत. तेव्हा ते सगळे गरीब त्या माणसाकडे येतात. मग तो राहिलेल्या सगळ्या भाकरी त्या गरीब लोकांमध्ये वाटतो. काही वर्ष उलटल्यानंतर ते साधू महाराज असतात तर त्याच रस्त्याने चाललेले असतात. ते विचार करतात मी काही वर्षांपूर्वी इथे एका माणसाला वीस भाकरी दिल्या होत्या.

ज्या त्याच्या नशिबात शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत. ते जेव्हा त्या जागे जवळ येतात. तेव्हा ते बघतात तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो. त्याने खूप मोठा मांडव घातलेला असतो. तिथे हजारो लोक जेवत असतात. जेवणात सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न असतात. ते साधू महाराज हैराण होतात. त्या माणसा जवळ येतात.

आणि विचारतात हे असं कसं झालं तुझ्या हाताच्या रेषांवर, मस्तकाच्या रेषांवर वीस भाकरी लिहिल्या होत्या यांच्याव्यतिरिक्त तुझ्या हातावर काहीच नव्हते. पण आज तर ती धनवान झालास. तुझ्यामुळे आज हजारो लोक जेवत आहेत. महाराज तुम्ही जेव्हा वीस भाकरी देवून गेलात तेव्हा त्यातल्या दोन भाकरी मी खावू शकलो. बाकीच्या अठरा भाकरी माझ्या सारख्या गरीब लोकांना वाटल्या.

जसे मी भाकरी वाटल्या. माझ्याकडे अजून लोक भाकरी घेऊन येवू लागले. जसे तुम्ही मला वीस भाकरी आणून दिल्या तसेच बाकीचे लोक सुद्धा मला जेवण देवू लागले. परत मी त्यातले थोडे खायचो आणि बाकीचे वाटायचं असे करत करत लोक माझ्याकडे जेवण घेवून यायचे. आणि एक दिवस एवढे जेवण झाले की मी खावून सुद्धा १०० लोकांना वाटू शकलो. जेवढे वाटू लागलो.

कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येऊ लागले. माझं हे काम बघून खूप मोठ्या लोकांनी मला घर घेवून दिले. त्यांनी मला व्यवसाय चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते. आणि मी दिवसभर जेवण वाटायचं काम करतो. आज हजारो लोक रोज जेवण करतात. मला माहित नाही कुठून हे येत. जेवढं जास्त वाटतो. अनेक पटीने माझ्याकडे येत. हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे.

जेवढे तुम्ही दुसऱ्याला द्याल. निसर्ग तुम्हाला अनेक पटीने देतोच देतो. आणि हा नियम १०० टक्के काम करतो. जर तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहिल्या असतील तर तुम्ही देण्याचे कर्म सतत करत असाल तर तुमच्या नशिबात लिहिलेल्या पेक्षा दहापट जास्त तुम्हाला मिळते. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की द्यायचे म्हणजे फक्त पैसे द्यायचे पण तसे नाही.

तुमचा जवळ देण्या सारख्या अनेक गोष्टी असतात तुम्ही तुमच्या जवळ असलेले कौशल्य शिकवू शकता. तुम्ही एखाद्याला चांगले मार्गदर्शन करू शकता. तुम्ही एखाद्याला आधारासाठी खांदा देवू शकता. छानसे हास्य देवू शकता. ज्यावेळी तुम्ही एखाद्याला देता तेव्हा निसर्गाला तुम्हाला द्यावेच लागते. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपली अपेक्षा असते ज्याला मदत केली त्यानेच मदत केली पाहिजे. आणि मग आपण म्हणतो मी त्याला एवढी मदत केली. आणि नंतर त्याने धोका दिला.

मित्रानो जरुरी नाही की तुम्ही ज्याला मदत केली त्याने तुम्हाला मदत केली च पाहिजे. ते तुम्हाला वेगळ्या रूपात सुद्धा मिळू शकते. जसे तुमचे नोकरीत प्रमोशन मिळेल. तुमची अडकलेली कामे व्यवस्थित पार पडतील. अजून एक गोष्ट स्वतः चे नुकसान करून दुसऱ्याला काही देवू नका. त्या गरीब माणसाने पहिलं स्वतः चे पोट भरले. नंतर दुसऱ्याला वाटले. तसेच तुम्ही सुद्धा स्वतः चे नुकसान होऊ न देता दुसऱ्याची मदत करा. जो दुसऱ्याला मदत करतो. त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *