हा एक दागिना महिलांनी अजिबात घालू नये, नाही तर खूपच वाईट घडू शकते.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदु धर्मशास्त्रात वास्तुशास्त्राला फार महत्व दिले गेले आहे. आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी वास्तुशास्त्राची माहिती घेतो व त्याप्रमाणे आपले कार्य करतो. म्हणजे आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास व अडचणींचा सामना करावा लागत नाही.

आज कालची जीवनशैली आधुनिक झाले आहे. फॅशनेबल युग आहे. आपण पाश्चात्त्य अनुकरण करून त्याप्रमाणेच वागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुली, स्त्रिया फॅशन म्हणून कोणतेही दागिने व कोणतेही कपडे वापरत आहेत. हे पण ठीक आहे कारण काळाबरोबर चालावच लागेल.

परंतु शास्त्रांमध्ये काही वस्तू विवाहित स्त्रियांना वर्जित सांगितलेले आहे. त्या वस्तू विवाहित स्त्रियांना माहीत नसल्यामुळे त्यांचा वापर केला जातो. म्हणून त्यांच्या जीवनात नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडतो. याबरोबरच त्यांच्या कुटुंबालाही कितीतरी प्रकारच्या अडचणी व संकटांचा सामना करावा लागतो.

त्याशिवाय त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊन त्यांचे संबंध तुटण्याचे संकट येते. जर आपण विवाहित स्त्रियांबद्दल बोललो तर त्यांच्याबद्दल शास्त्रात अश्या बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या आहेत ज्या त्यांच्या आयुष्यात विश्वासाने स्वीकाराव्या लागतील.

तथापि आजच्या काळात या गोष्टींवर विश्वास ठेवणारे फारच कमी लोक आहेत. मुली प्रत्येक गोष्टीत खूप पुढे गेले आहेत. तर दुसरीकडे विवाहित स्त्रियाही आजच्या फॅशन नुसार वस्तू घालतात. या वस्तूंमुळे विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

विवाहित स्त्रियांनी नक्कीच फॅशन केली पाहिजे परंतु त्याबरोबरच संस्कृतीची व शास्त्राची काळजी घेतली पाहिजे. तसे तर आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल काहीवेळा विवाहित स्त्रियादेखील अशा गोष्टी घालताच यामुळे त्यांचे नातेही तुटू शकते.

शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या विवाहित स्त्रियांनी परिधान करू नये. त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काळ्‍या बांगड्या. लक्षणीय म्हणजे विवाहित स्त्रियांनी चुकूनही काळ्या बांगड्या घालू नये.

यामुळे त्यांना शनिदेवाच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थिती त्यांचे वैवाहिक जीवनही खराब होऊ शकते. घरात नकारात्मक शक्ती येऊ शकते. याशिवाय आपल्या मुलांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून विवाहित स्त्रियांनी चुकूनही काळा बांगड्या घालू नये.

पायामध्ये सोन्याचे दागिने घालू नयेत. आजच्या काळात बराच स्त्रिया पायात सोन्याने बनविलेले चैन किंवा जोडवी घालतात. शास्त्रानुसार हे विवाहित स्त्रियांसाठी अशुभ मानले गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पायात सोन्याचे दागिने घातल्याने कुबेर महाराज नाराज होतात.

यामुळे आपल्या जीवनात दारिद्र येऊ शकते. यामुळे आपल्या पतीची प्रगती थांबू शकते आणि आपल्याला आर्थिक सामना करावा लागू शकतो. म्हणूनच विवाहित स्त्रियांनी पायात नेहमी चांदीचे दागिने घालावेत.

तिसरी वस्तू म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी. विवाहित महिलांनी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी घालू नये. सध्याच्या काळात महिला पांढऱ्या रंगाची साडी घालताना अजिबात संकोच करत नाहीत. ज्यामुळे त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

शास्त्रानुसार पांढरी साडी परिधान केल्याने विवाहित स्त्रियांच्या धार्मिक धर्म संपतो. यामुळे आपल्या विवाहित नात्यात नकारात्मक शक्ती टिकून राहते. पांढरी साडी हे वैराग्याचे प्रतिक आहे. त्यामुळे विवाहित स्त्रियांनी कधीही पांढरी साडी घालू नये.

मित्रांनो, आता आपल्या लक्षात आले असेलच की विवाहित स्त्रियांनी कोणत्या वस्तू घालू नयेत. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *