नमस्कार मित्रांनो,
गुरुवार म्हणजे देवी लक्ष्मीचा तसेच बृहस्पति देवांचा वार आहे. गुरुवार हा धर्माचा दिवस असतो. आपल्याला हे माहीतच आहे की ब्रम्हांडात एकूण नऊ ग्रह आहेत. व त्या सर्व ग्रहापैकी सर्वात वजनदार व जड ग्रह गुरू आहे.
यामुळे गुरुवारी जे काम केल्याने आपले शरीर हलके होईल किंवा घर हलके होईल अशी कामे करू नये. जसे फरशी पुसणे, केस धुणे इत्यादी कामे केल्याने घरात व शरीरात हलकेपण येते. म्हणून अशी कामे गुरुवारी करू नयेत. यामुळे गुरु ग्रह हलका होतो.
गुरु ग्रहाचा वैवाहिक जीवन व नोकरी-व्यवसायात खूप मोठा वाटा असतो. गुरु ग्रह धर्मावर शिक्षेचा कारक आहे आणि आपण गुरुवारी जर ही कामे केली सर आपला गुरु ग्रह हलका होतो. धार्मिक व शैक्षणिक
बाबीत अडचणी येतात.
अभ्यासात मन लागत नाही. धार्मिक कार्यक्रमांमध्ये रुची राहत नाही. गुरुवारी जर घरातील स्त्रिया हे कामे करतात तिच्या पतीला नोकरी व्यवसायात अडचणी येतात. तसेच मुला-मुलींच्या शिक्षणात अडचणी येतात. म्हणून गुरुवारी केस धुऊ नये.
त्याबरोबरच नखे कापणे, दाढी करणे, कटिंग करणे, फेशियल करणे यासारखे शरीराला हलकेपणा येईल असे कोणतेही काम करू नये.
गुरू ग्रहाला जीवन मानले जाते आणि गुरुवारी जर आपण अशी कामे करून गुरूला हलके केले तर आपले आयुष्य कमी होते. त्याबरोबरच घरातील ईशान्य दिशा हे गुरु ग्रहाची दिशा आहे म्हणून गुरुवारी या दिशेची साफसफाई करणे टाळावे.
तसेच घरातील जाळे काढणे, भंगार सामान काढून विकणे, बेडशीट, चादरी असे जड कपडे धुणे, कोपऱ्यातील सामान काढून आवरणे, फरशी पुसणे, घर धुणे, आठवड्याची साफ-सफाई करणे अशी घराला हलकेपणा येईल ही कामे करू नये.
यामुळे घरातील सदस्य, मुले-मुली यांच्या जीवनावर, शिक्षणावर, नोकरी व्यवसायावर वाईट प्रभाव पडतो. आजकाल घरोघरी भांडी धुणे, फरशी पुसणे यासाठी कामवाल्या मावशी येतात. पण आठवणीने तिला गुरुवारी फरशी पुसण्याची सुट्टी द्यावी.
गुरुवारी शक्यतो सुर्यास्तानंतर कपडे धुऊ नये. गुरुवार हा देवी लक्ष्मीचा ही दिवस असतो. म्हणून या दिवशी लक्ष्मीनारायण या दोघांचे एकत्र पूजन केल्यास पती पत्नीतील प्रेम वाढते. त्या बरोबरच घरात धनसंपदा येते.
जर तुम्हाला नोकरी मध्ये अडचणी येत असतील, प्रमोशन मिळत नसेल तर याचे कारण गुरू ग्रह कमजोर असणे हेच असू शकते. म्हणून जर तुम्ही गुरुवारी ही कामे करत असाल तर बंद करा.
गुरु ग्रह कमजोर झाल्यास धन हानी होते. उत्पन्नाची मार्गे बंद होतात. तुमच्या कामाने गुरू ग्रह हलका होईल अशी कामे गुरुवारी करूच नये.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.