नमस्कार मित्रांनो,
श्रीमन नारायण नारायण हरी हरी ओम नमो नारायणा. या जगाचे पालन हार भगवान श्रीहरी श्रीविष्णू यांचा सर्वाधिक प्रिय महिना प्रिय मास म्हणजे मार्गशीर्ष सुरू झालेला आहे. या मार्गशीर्ष महिन्यात अनेक माता-भगिनी महालक्ष्मीची गुरूवारच व्रत करतात. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आलेले आहेत.
9 डिसेंबर, 16 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबर या महालक्ष्मी व्रतासोबतच आपण एक छोटासा दिव्याचा उपाय नक्की करून पहा. आपल्या घरात धन सुख संपदा ऐश्वर्य, वैभव या सर्व गोष्टी भगवान श्रीहरी श्रीविष्णूंच्या रूपाने कृपेने नक्की निर्माण होतील.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 दिवा लागेल. अगदी कोणताही दिवा कणकेचा घेतला, मातीचा घेतला, पितळेचा घेतलात कोणताही दिवा 1 दिवा स्वच्छ कशाप्रकारे आपण तो घ्यायचा आहे. जर तो तुपाचा असेल तर अतिउत्तम आहे. गाईचे तूप आणि जर गाईचं तूप नसेल तर आपण कोणत्याही पशुच तूप वापरू शकता.
मात्र त्यामध्ये चिमूटभर हळद टाकण्यास विसरू नका. जेणेकरून त्या तुपाची शुद्धता घडून येईल. मित्रांनो हे दीपदान आपण रात्री करायचं आहे किंवा सायंकाळी सुद्धा आपण करू शकतात. जेव्हा सूर्यास्त होईल सूर्य मावळेल आपण हे दीपदान करा. केवळ 4 मार्गशीर्ष गुरुवार हे दीपदान केल्यास भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. 2 प्रकारे आपण हे दीपदान करू शकता.
पहिली गोष्ट आपण आपल्या घरातच जेव्हा आपण महालक्ष्मी व्रत करत आहात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत करत आहात हे व्रत करताना भगवान श्रीहरी श्रीविष्णूंच्यासमोर आपण 1 तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. केवळ 1 दिवा मात्र या दिव्याची वात पेटवताना ती कापराच्या सहाय्याने पेटवायची आहे.
जो कापूर आहे त्याला संस्कृतमध्ये करपूर अस म्हणतात. या कापराच्या मदतीने आपण या दिव्याची वात प्रज्वलित करायची आहे. केवळ 4 गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार हा उपाय केल्यास भगवान श्रीहरी श्रीविष्णू प्रसन्न होतात. माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहेच मात्र भगवंत प्रत्यक्ष जगाचे पालनहार श्रीहरी श्रीविष्णू प्रसन्न होणार आहेत.
मित्रांनो आपल्या घरासोबतच आपण आपल्या गावांमध्ये आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी श्रीविष्णूंच मंदिर आहे, नारायनांच मंदिर आहे, लक्ष्मीनारायनांच मंदिर आहे किंवा भगवान श्रीकृष्णांचा मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन तिथे सुद्धा 1 दीपदान नक्की करायचा आहे.
एक दिवा नक्की प्रज्वलित करायच आहे. प्रज्वलित करण्याची विधी तीच आहे. दिवा कोणताही घ्या मात्र आपण तो प्रज्वलित करताना तो कापराच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो ज्या प्रकारे कार्तिक महिन्यात दिपदानाच मोठ महात्म्य आहे अगदी त्याचप्रकारे मार्गशीर्ष महिन्यात सुध्दा दीपदान अत्यंत महत्व पूर्ण मानण्यात आलेलं आहे.
हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर मनोभावे हात जोडून या जगाचा पालनहाराकडे प्रार्थना करायचे आहे की, आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी निर्माण होऊ देत. मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजूनही अनेक उपाय आपण घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.