गुरुवारी चुकूनही करू नका ही पाच कामे नाहीतर अनर्थ घडेल.

नमस्कार मित्रांनो,

गुरुवारी चुकूनही करू नका ही पाच कामे नाहीतर देवी लक्ष्मी साथ सोडून जाईल. आपल्या ब्रह्मांडात नवग्रह आहेत. यामध्ये गुरु ग्रह म्हणजे मोठा व वजनदार ग्रह आहे. जर गुरुवारी आपण ही पाच कामे केली तर आपला गुरू ग्रह हलका होतो.

म्हणजे आपले शरीर थकते व घरातही पैशांच्या बाबतीत कमी येते. महिलांनी या दिवशी चुकूनही केस धुऊ नयेत. तसेच कटिंग करू नयेत. आयब्रो ही करू नये. पुरुषांनी दाढी करू नये. नखे ही कापू नयेत. यामुळे आपले आयुष्य कमी होते व आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो.

गुरुवारी घराची साफसफाई करू नये. तसेच या दिवशी फरशी पुसू नये. वास्तु शास्त्रानुसार या दिवशी घराची स्वच्छता केल्यास लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. वरचेवर रोजची स्वच्छता तुम्ही करू शकता. परंतु घर आवरायला काढणे, भंगार काढून विकणे अशा प्रकारची कानाकोपऱ्यातली घाण गुरुवारी काढू नये.

लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही विष्णू पुराणाचे पाठ करू शकता. परंतु प्रत्येक गुरुवारी एकदा विष्णू पुराणाचे वाचन नक्की करावे. जर हे शक्य नसेल तर मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही विष्णुपुराण लावू शकता. कारण आजकालच्या धावपळीच्या युगात सकाळी सर्व जण बिझी असतात म्हणून मोबाईल मध्ये विष्णूपुराण लावावे आणि आपले काम करत राहावे.

म्हणजे तुमचे काम आहे होत राहील आणि विष्णू पुराणाचे श्लोक ही तुमच्या कानी पडतील. याचा फायदा तुमच्या स्वयंपाकातही होईल. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन ही आनंदी होईल व जर तुमच्या कुंडलीत गुरू ग्रह कमजोर असेल तर तोही स्ट्रॉंग होईल.

आंघोळीनंतर एका तांब्यात पाणी घेऊन आज एक चिमूटभर हळद टाकावी व ते पाणी सुर्यदेवांना अर्पण करावे. यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल. तुम्हाला काही काम धंदा नसेल, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात परंतु तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर एक विड्याचे पान घेऊन एका वाटीत हळदीचे पाणी करावे आणि घरात दर गुरुवारी ते पाणी विड्याच्या पानाने शिंपडावे.

यामुळे सर्व नकारात्मकता निघून जाईल व जर काही बाधा असेल तर ती सुद्धा नष्ट होईल. त्याबरोबरच सकाळी तीन वेळा व संध्याकाळी तीन वेळा असा गुरुवारी सहा वेळा शंख वाजवावा.

गुरुवारी स्वयंपाकात एखादी पिवळी वस्तू बनवावी जसे की खिचडी, वरण, लाडू किंवा पिवळी मिठाई यासारख्या गोष्टींचा तुमच्या भोजनात समावेश करावा. गुरुवार हा लक्ष्मीचा वार आहे व विष्णूजीना पिवळा रंग प्रिय असल्याने पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा जास्त वापर केल्याने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.

या दिवशी भगवंताला नैवेद्यातही एखाद्या पिवळ्या वस्तूचा वापर करावा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.