गुरुवारी करा हा उपाय घरात येईल धनाचा पाऊस.

नमस्कार मित्रांनो,

आपल्याकडे भरपूर पैसा असावा, भरपूर धन असावे, आपले जीवन सर्व सुखसोयींनी मुक्त असावे असे सर्वांना वाटते. त्यासाठी आपण खूप कष्ट करतो. परंतु कष्टाच्या मानाने आपल्याला जर उत्पन्न मिळत नसेल तर मग आपला हिरमोड होतो.

त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. त्यात काहीअंशी फरक पडतो ही परंतु नंतर परत ये रे माझ्या मागल्या ही परिस्थिती निर्माण होते. याचे खरे कारण हे आहे की ज्यावेळी आपण संकटात असतो त्यावेळीच आपल्याला देव आठवतो.

म्हणजेच जेव्हा आपण जास्तच आर्थिक अडचणीत असलो त्यावेळी आपण उपाय करतो व त्यात थोडासा बदल झाला आणि आपल्या हातात पैसा खेळू लागला की मग आपण उपाय थांबवतो. पण हे चुकीचे आहे.

एकदा जर नियम केला तर तो नित्यनियमाने पाळलाच गेला पाहिजे. तेव्हाच त्याचा खरा उपयोग होतो. आज आपण पाहणार आहोत गुरुवारी करण्याचे काही खास उपाय. ज्यांच्या मुळे आपल्याला चारही दिशांनी सफलता मिळेल.

गुरुवार हा आठवड्यातील पाचवा दिवस. गुरुवारी श्रीविष्णूचे व गुरूंचे पूजन केल्याने आपल्याला लाभ होतात. गुरुवार हा देवी लक्ष्मीचा ही वार असल्याने धनप्राप्तीसाठी गुरुवारी केलेले उपाय खूपच परिणामकारक ठरतात.

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल. तुमच्या हातात पैसे येत आहेत पण टिकत नसतील आणि या त्रासापासून कायमची सुटका करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या छोटे छोटे परंतु प्रभावी उपाय करून तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.

या उपायांची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता. चला तर पाहूया ते उपाय.

गुरुवारी सकाळी स्नान झाल्यानंतर तुळशीला न तापवलेले कच्चे दूध दोन-तीन चमचे अर्पण करावे. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल.

गुरुवार हा देवी लक्ष्मीचा श्रीविष्णूचा आवडता वार आहे आणि त्यांचा आवडता रंग पिवळा आहे म्हणून गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात सफलता मिळेल आणि जर पिवळे कपडे घालणं शक्य नसेल तर पिवळा रुमाल तरी बरोबर ठेवावा.

गुरुवारी कोणत्याही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई आणून तिचा नैवेद्य श्री विष्णूंना व लक्ष्मीना द्यावा व तो प्रसाद खाऊन मगच घराबाहेर पडावे. त्यामुळे तुमचे काम नक्कीच यशस्वी होते.

जर शक्य असेल प्रत्येक गुरुवारी श्रीविष्णूच्या मंदिरात जावे व त्यांचे दर्शन घ्यावे. श्री विष्णूंना गुरुवारी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. जर श्री विष्णूंचे मंदिर आसपास नसेल तर इतर कोणत्याही देवी-देवतांच्या मंदिरात पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत.

आपले काम करता करता मनातल्यामनात ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करीत रहावे. म्हणजे आपल्या प्रत्येक कामात भगवंत आपल्या बरोबर असतील. आपल्याला धनाची अपेक्षा असते आणि धनाची देवी माता लक्ष्मी आहे.

परंतु जर आपण श्री विष्णूंचे ध्यान व पूजन केले तर श्रीविष्णू आपल्यासोबत असतील व जेथे स्वतः श्रीविष्णु असतील तेथे लक्ष्मी असणारच.

मित्रांनो, हे छोटे-छोटे उपाय करून आपल्या घरी धनाचा वर्षाव करा.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.