80 वर्षात पहिल्यांदा 23 जुलै गुरुपौर्णिमेला होणार महासंयोग… या 5 राशींचे चमकेल भाग्य… पुढचे 11 वर्ष जोरात असेल नशीब…

नमस्कार मित्रांनो,

काही माणसं जन्मभर मेहनत करूनही त्यांना यश मिळत नाही तर काही माणसांना अगदी सहजरित्या काही गोष्टी पटकन मिळतात. अशा माणसांना भाग्यवान अर्थात नशीबवान समजण्यात येते. अशाच काही राशींमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर 23 जुलैपासून आपलही भाग्य बदलू शकत.

मित्रांनो या दिवशी म्हणजे दिनांक 23 जुलै गुरुपौर्णिमेला या पाच राशींच्या लोकांचा भाग्योदय होईल. पुढील 11 वर्षे लोकं खूप यश मिळतील. कारण ही गुरुपौर्णिमा काही राशीच्या स्वामी ग्रहात चांगली स्थिती निर्माण करणार आहे.

आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या यांना एक विशेष प्रकारचे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या महिन्यात येणारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस गुरुपौर्णिमेशी संबंधित असल्याने या दिवशी गुरुची पुजा करून शुभाशीर्वाद घेतले जातात. कारण गुरूला मानवी जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त असते.

गुरूला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा ही म्हणतात. आषाढ शुक्लपक्ष पूर्वाषाढा नक्षत्र दिनांक 23 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 10.45 वाजता पौर्णिमेला सुरुवात होऊन दिनांक 24 जुलै सकाळी 8.07 मिनिटांनी ही गुरुपौर्णिमा समाप्त होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी गुरु कुंभ राशीत राहणार आहेत. त्यामुळे या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या 5 राशीच्या लोकांवर होणार आहे.

यामुळे या 5 राशीच्या लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होऊन, आपल जीवन प्रकाशमान होण्यास सुरुवात होईल. याशिवाय राशीला या गुरुचे पाठबळ असल्यामुळे आता प्रगती वेगाने होण्यास मदत होईल. त्यामुळे गुरुपौर्णिमे पासून पुढे येणारा सर्व काळ आपल्या जीवनातील अतिशय उत्तम यश संपादन करण्यासाठी उपयुक्त असेल.

मित्रांनो या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात गुरूंची साथ मिळणार आहे. त्यामुळे गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल होईल. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.

मेष रास

मित्रांनो यामध्ये सर्वात जास्त प्रभाव मेष राशीच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्व कामांना यश प्राप्त होणार आहे. याशिवाय कोणी व्यावसायिक असल्यास, त्याचा व्यवसाय प्रगतीपथावर येऊन त्याच्या सर्व आर्थिक अडचणी नष्ट होतील.

मिथुन रास

दुसरी महत्त्वाची राशीं म्हणजे मिथुन रास. या राशीच्या लोकांना विशेष सहकार्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आपल्या गुरूचा आशीर्वाद लाभणार आहे. यांची आर्थिक क्षमता मजबूत होईल. याशिवाय मिथुन राशीचे लोक प्रत्येक कार्यक्षेत्रातून आपली कमाई करत असल्याने दिसून येईल. त्यामुळे धनसंपत्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मित्रांनो या राशीच्या लोकांची संपत्ती पहिल्यापेक्षा जास्त वाढणार आहे. परिणामी घर, परिवारात आनंदात राहतील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचे जीवनात आनंदाचे दिवस येतील. हा काळ त्यासाठी अनुकूल असून, या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची समस्या दूर होईल. करियर विषयी आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य ठरतील.

तुळ रास

या गुरू पौर्णिमे पासून तुळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळण्यास मदत होईल. या राशीसाठी हा काळ अतिशय शुभ असून, अचानक धनलाभाचे योग आहेत. याशिवाय या राशीच्या लोकांचे उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक होतील. आपल्या कार्यक्षेत्रातून आर्थिक प्रगती समाधानकारक असेल. परिवारासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतील. तसेच आर्थिक मदतीचे अनेक साधनं उपलब्ध होतील.

कुंभ रास

यानंतर गुरुपौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ज्या लोकांनी उद्योग स्थापन केले असतील त्यांची प्रगती होऊन जीवनात भरभराट होईल.

व्यवसायाच्या दृष्टीने हा शुभ काळ असल्याने, ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती काम यशस्वीरित्या पूर्ण होतील. त्यामुळे परिवारास सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

मित्रांनो अशाच प्रकारच्या रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.