नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्येष्ठ पौर्णिमेस आपण वटपोर्णिमा साजरी करू. वटपोर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक फार मोठा सण आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात.
सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करून वडा भवती प्रदक्षिणा घातल्या जातात. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या वटपौर्णिमेस आपण प्रभावशाली उपाय करू शकतो. असे उपाय जे आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता, कंगाली, अलक्ष्मी यांना दूर करते.
तुम्ही जो काही उद्योग धंदा करता, काही व्यापार व्यवसाय करताय, नोकरी किंवा जे काही काम तुम्ही करताय त्या कामातून मोठ्या प्रमाणात पैशांची आवक सुरू होईल.
मित्रांनो, एक गोष्ट अगदी सुरवातीलाच स्पष्ट करतो केवळ हा उपाय केल्याने तुम्हाला पैशाची प्राप्ती होणार नाहीये. पैसा मिळवण्यासाठी परिश्रम,कष्ट हे करावेच लागतात. हा उपाय केवळ तुमच्या कष्टांना बळ देणार आहे.
तुम्ही जितकी मेहनत कराल तितका जास्त पैसा तुम्हाला हा उपाय केल्यास प्राप्त होऊ लागेल. तर वटपौर्णिमेस हा कोणता उपाय आपण करावा हे पाहूया.
हिंदूधर्मशास्त्रानुसार वटपौर्णिमेला केलेले गुप्तदा न ही माता लक्ष्मीस प्रसन्न करत आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा येतो. गुप्तदा न करायच आहे. हा उपाय वटपौर्णिमेच्या पहाटे करावा.
वटपौर्णिमेची जी पहाट आहे, ब्रह्म मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर आपण हे गुप्तदा न करायचे आहे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सुर्योदयापूर्वीचा, सूर्य उगवण्याचा आधीचा एक ते दीड तास पुर्वीचा जो काळ असतो उदाहरणार्थ जर सूर्योदय सकाळी सात वाजता असेल साडेपाच वाजायच्या आत आपण हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो, हा उपाय एक गुप्तदा न आहे. दानधर्माचा हिंदू धर्मशास्त्रात फार महत्त्व आहे. गुप्त म्हणजे आपण कोणालाही या दाना बद्दल सांगायचं नाहीये. हा उपाय करण्यापूर्वी सुद्धा आणि उपाय करून झाल्यानंतर सुद्धा या गुप्तदानाचे चर्चा किंवा वाच्यता होणार नाही याची काळजी घ्यावी.
हे गुप्त दान करण्यासाठी आपल्याला तीन नवीन झाडू लागतील. हे झाडू तुम्ही आदल्या दिवशी खरेदी करू शकता. आदल्या दिवशी झाडू खरेदी करुन वटपौर्णिमेच्या पहाटे आपल्या गावातील किंवा आपल्या भागातील ज्या ठिकाणी लक्ष्मी आईचे देऊळ आहे, लक्ष्मीचे मंदिर आहे त्या ठिकाणी देऊळात ते झाडू गुपचूप ठेवायचे आहे.
यालाच आपण गुप्तदान म्हणतो. या गुप्त दानाचा महिमा जितका वर्णावा तितका कमी आहे. हे गुप्त दान केल्यामुळे घराची भरभराट होऊ लागते. घरातील लोकांना आरोग्याची प्राप्ती होते. घरातील नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होतो.
सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी गुप्त दान केले जाते. तुम्हाला हे तीन झाडू देऊळात ठेवताना कोणीही पाहणार नाही याची काळजी घ्यावी आणि हे तीन झाडू ठेवून आल्यानंतर आपण विधिवत वटपौर्णिमेची, माता लक्ष्मीची पूजा करा.
त्यांच्याकडे प्रार्थना करा की आपला हा उपाय यशस्वी होऊ दे. लक्षात घ्या आपण हे तीन झाडू देवळात ठेवण्यापूर्वी स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून हा उपाय करावा आणि त्यानंतर संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची आराधना करा.
आयुष्यभर तुम्हाला पैसा कमी पडणार नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.