गोमती चक्राचे उपाय करेल दुःखाचा विनाश

नमस्कार मित्रांनो,

आज काल सर्वांचे जीवन अगदी धावपळीचे झालेले आहे. ज्यांच्या जीवनात दुःख किंवा संकटें नाहीत अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही त्रास अडीअडचणी व बाधा असतातच. आजच्या माहितीमध्ये आपण या सर्व अडचणी, संकटे व बांधांपासून सुटका मिळवण्यासाठी गोमती चक्राचे कोणकोणते उपाय करता येते ते पाहणार आहोत.

गोमती चक्र म्हणजे छोट्याचा खडकाचा तुकडा असतो. जो गोल आकारात असून त्यावर चक्रासारखे गोल उमटलेले असतात. हा दगड गोमती नदीत सापडतो. श्रीकृष्ण भगवंतांच्या सुदर्षण चक्राचे सूक्ष्म रूप मानला जातो. गोमती चक्र ज्या व्यक्तीकडे असते त्या व्यक्तीच्या आसपास एक सुरक्षित वलय निर्माण होते.

गोमती चक्र घरात ठेवल्यात घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात. गोमती चक्र हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजनामध्ये गोमती चक्र अवश्य ठेवावे. गोमती चक्राचे खूप फायदे आहेत. गोमती चक्राचे उपाय करून आपण आपल्या जीवनातील दुःख व दारिद्र्याचा नाश करून सुख व संपन्नता मिळवू शकतो.

चला तर जाणून घेऊयात गोमती चक्राचे उपाय. जर आपल्याला व्यापार व्यवसायात सतत नुकसान होत असेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत आर्थिक नुकसान होत असेल तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 गोमती चक्र घेऊन त्यांना अभिमंत्रित करावे. त्यानंतर हळदीने टिळा लावावा.

त्यानंतर महादेवांचे ध्यान करता करता एका पिवळ्या कापडामध्ये सर्व गोमती चक्र ठेवून गुंडाळून घ्यावे आणि संपूर्ण घरात फिरवावे आणि मनातल्या मनात महादेवांचे ध्यान करीत राहावे. त्यानंतर ते गोमती चक्र त्या पिवळ्या कापडासह वाहत्या पाण्यात विसर्जन करावे यामुळे निश्चितच फायदा होतो.

जर आपले वैवाहिक जीवन ताण तणावात जात असेल पती-पत्नीचे एकमेकांशी पटत नसेल, एकमेकांबद्दल मतभेद असतील तर 11 सिद्ध गोमती चक्र घेऊन ते दक्षिण दिशेला फेकून द्यावेत. यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडी अडचणी नष्ट होतील आणि दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. घराचे बांधकाम करताना इमारतीच्या पायामध्ये 11 गोमती चक्र अभिमंत्रित करून ते टाकून द्यावे. त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो.

तसेच घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य सुख-समृद्धीची प्राप्ती होते. जर घरातील एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल तर 21 अभिमंत्रित गोमती चक्र घेऊन ते त्या व्यक्तीच्या डोक्यावर ओवाळावे म्हणजेच उतारा करावा आणि ते सर्व गोमती चक्र एका कापडात बांधून त्या व्यक्तीच्या पलंगाला बांधून घ्यावेत. यामुळे ती व्यक्ती लवकर बरी होते.

जर तुम्ही नोकरी-व्यवसायासाठी कुठे बाहेर जाणार असाल किंवा एखादा मोठा सौदा करायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल अशा वेळी 11 गोमती चक्र आपल्या पर्स किंवा पाकिटात किंवा खिशात ठेवावे आणि सतत जवळ ठेवावे. या उपायामुळे तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल आणि अपेक्षेप्रमाणे यशही मिळेल.

7 सिद्ध गोमती चक्र लाल कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवल्यास आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आपल्या पैशाचा उत्तरोत्तर वाढ होत जाते. तसेच व्यापार-व्यवसायात नफा होत राहतो. जर घरातील एखादी व्यक्ती खूप भीत असेल त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसेल तर अशा व्यक्तीच्या गळ्यात गोमती चक्राची माळ घालायला द्यावी.

सिध्द गोमती चक्रामुळे मनातील भीती दूर होते. त्याबरोबरच आपल्या निर्णय क्षमतेत वाढ जाते. आपला आत्मविश्वास वाढतो. घरामध्ये गोमती चक्र ठेवल्यास धनामध्ये वाढ होतेच त्याशिवाय घरातील सदस्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. गोमती चक्र सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला वारंवार नजर लागत असेल तर एखाद्या निर्जन स्थळी जाऊन त्या व्यक्तीने स्वतः 3 गोमती चक्र स्वतःवरून ओवाळून सातवेळा ओवाळून मागच्या बाजूला टाकून द्यावेत आणि मागे न बघता सरळ घरी परत यावे. त्यामुळे नजरदोष नक्कीच दूर होतो. जर आपला प्रमाणाबाहेर वायफळ पैसा खर्च होत असेल,

नको तिकडे पैसा वाया जात असेल तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्र एका पिवळ्या कपड्यात बांधून त्यांचे लक्ष्मीचे ध्यान करता करता विधिपूर्वक पूजन करावे आणि ते तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्यातील 4 गोमती चक्र उचलून घराच्या चारी कोपऱ्यात एक एक ठेवून द्यावेत.

त्यातील 3 गोमती चक्र लाल कापडात गुंडाळून आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवावे आणि 3 गोमती चक्र आपल्या देवघरात ठेवावे आणि उरलेले गोमती चक्र एखाद्या मंदिरात आपली समस्या भगवंतांना सांगून भगवंतासमोर ठेवून द्यावे. यामुळे आपल्या खर्चावर नक्की बंधने येतात आणि पैशात बचत होऊन पैसा टिकू लागतो.

आपली मुले खूप घाबरत असतील तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अभिमंत्रित गोमती चक्रावर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदूर लावून ते गोमती चक्र एका लाल कापडात बांधून त्या मुलाच्या गळ्यात बांधावे. यामुळे त्या मुलांमधील भीती नष्ट होऊन मुलांमधील आत्मविश्वास वाढीस लागेल.

आपल्या व्यापार व्यवसायाला कोणाची दृष्ट लागली असेल किंवा आपल्या व्यापार व्यवसायाला कोणाची दृष्ट लागू नये यासाठी 11 अभिमंत्रित गोमती चक्र आणि तीन लहान नारळ घेऊन त्यांचे पूजन करावे आणि एका पिवळ्या कापडात बांधून ते मुख्य दारावर टांगून ठेवावे. यामुळे आपल्या व्यापार व्यवसायाला कोणाचे वाईट नजर लागत नाही. तर मित्रांनो हे आहेत गोमती चक्राचे फायदे आणि उपाय.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *